माझा पहीला अपराध!

05 June 2010 वेळ: Saturday, June 05, 2010
आधी ह्या पोस्टचं नाव - "When Apple and Blackberry were just fruits" देणार होतो, पुढे विश्लेषण देता देता खूप लांबड लागली असती. त्या पेक्षा एक घटना रंगवली.

माझा पहिल्यांदा झुलता-पूल झालेला. बऱ्याच वेळ आर या पार नतीजा लागत न्हावता. पुढे काय परिणाम भोगावे लागणार हे ही माहित नाही.

तशी हि घटना घडून खूप वर्ष लोटून गेलेत. त्या वेळी आम्ही वापीला राहायचो. मी सेंट मेरीज स्कूल च्या जुनियर के.जी मध्ये होतो, आणि रेणुका पाचवीत. त्यावेळचा मित्र परिवार इतकासा आठवत नाही, पण त्यातला "जिग्नेश पटेल" आठवतो. नुकतेच आमचे वर्ग शाळेच्या मुख्य इमारतीत भरू लागले होते. एकदा मैदानावर खेळतांना माझा धक्का जिग्नेश ला लागला. जिग्नेश पडला. त्याचा गुडघा फुटला. रक्त येत होतं. लगेच वर्गातल्या सगळ्या मुलांची गर्दी जमली. आ! रक्त येतंय. सगळ्यांच्या नजरेत आता मी जालीम झालो. मला अपराध्या सारखं वाटू लागलं. मग जिग्नेशला कोणाच्या तरी मदतीने उचललं. शाळेतल्या सिस्टर कडे घेऊन गेलो. त्यांना सगळी घटना सांगितली. ( आणि मी मुद्दाम काही केलं नाही, हे पण समजावत होतो.)

मग काय राव, आयुष्यात पहिल्यांदा इतकं रक्त पाहिलं होतं. त्यावेळी आजच्या सारखे सेरियल नसायचे, आणि चित्रपटात उग्गाच रक्ताच्या चील्कान्ड्या नाही उडायच्या.

सगळी वाटून जाण्याची क्रिया पट्ट-पट्ट होत होती. ह्या प्रसंगामुळे मला तर वाटलं ह्या अपराधासाठी आपल्याला पोलीस पकडून नेणार. अगदीच नकळत सिस्टरला हा प्रश्न विचारल्या गेला. मग सिस्टरने सांगितलं, आपल्या शाळेचे फादर सांभाळून घेतील. मग त्यांनी त्यांच्या काळ्या रोटरी टेलिफोन वरून कोणाला तरी फोन लावला. इंग्रजीत बोलल्या. मला काही जास्त कळलं नाही. माझी मजबूत तंतरली होती. मग म्हणे काही होणार नाही. मग कुठे जीव भांड्यात पडला. पण तरी सिस्टरवर भरोसा न्हवता. म्हंटल फादर कडून एकदा खात्री करून घ्यावी.

वर्गात गेलो, तर सगळ्या नझर माझ्याकडे. (खुनी खुनी - म्हणत असावेत.) मी धावत माझ्या जागे वर पोहचलो. खूप वेळ दाखवायचा प्रयत्न केला, की मला काय पोलीस-बिलीस पकडून नेणार नाहीयेत. पण अजून खात्री कुठे होती. मग म्हंटल जर मला अटक केलीच, तर माझे दप्तर घरी कोण नेणार? मग दप्तराची विल्हेवाट लावली. माझं नवीन कोरं शार्पनर, जे मी अजून हि वापरलं ही नाही; लगेच पेन्सिल काढून तिला नोक केलं. मग ते शार्पनर घेऊन धावत पहिल्या मजल्यावर गेलो. रेणुका तिच्या वर्गात होती. तिचे वर्ग चालू होते. तिला बाहेर बोलावलं आणि शार्पनर दिलं. काय बोललो ते मला ही नाही आठवत. खाली फादर च्या गाडीचा आवाज ऐकू आला. आता काही खैर नाही आपली.

त्या पुढची सगळी चित्र अंधुक दिसत होती. पण मला जेल मध्ये नेलं नाही!


11 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    हाहाहा...
    (This is how the C.I.D. episode would be scripted)

    ACP प्रद्युम्न: अभिजित इस ब्लॉग का चप्पाचप्पा छान मारो... झिग्नेस्स पटेल का खुनी यही कही छुपा होना चाहिये..
    दया, तुम इस ब्लॉग के सारे दरवाजे तोड दो...
    डॉक्टर सालुंखे... ब्लॉगपे लिखे गये पोस्ट्स कि स्याही का DNA चेक करो, झिग्नेस्स के खुन का पोस्टमॉर्टम करो... आज तो खुनी मेरे हाथोसे बच नही सकता...

    (After reading this blog post)

    ACP प्रद्युम्न: आखिर झिग्नेस्स पटेल का खुनी पकडाही गया... आक्याबोक्या (एक उंगली घुमाते हुए) अब तो तुम्हे फासी होगी फासी...

  2. Aakash Says:

    hahahah!! to fasi nahi mhanat. PHASSI mhanto!

  3. LOL I remember...... you did not give the sharpner to me ..... you were bribing Sr. Maria with a sharpner and pleading not to tell the police.... so she called me and she was laughing about the whole thing.

  4. सागर Says:

    हा हा हा मजा आली वाचताना

  5. Aakash Says:

    रेणुका : म्हणजे? :-O मी तेंव्हा पासून घूस देण्यात एक्स्पर्ट होतो?? हाहाहाहा त्या वेळचं इतकं कोर-कार्र्करीत नाही आठवत. पण आता तू म्हणतेच आहेस तर विश्वास ठेवतो ;)

    सागर: आरे तुझं पण ह्या ब्लॉग वर स्वागत आहे! सगळं एकदम एकाच दिवशी नको वाचून काढूस रे....... त्या सौरभ सारखं बसावं लागेल मग तुला पण.......काही वाचायला मिळालं कि हे बुवा त्याचा फडशा पाडतात.....

  6. Dagadu Says:

    Khoooni !! Wah .. so miya aap bachpan se Kide bahaddar ho !! ani Resume madhe aad kar Ghus expert -- bachpan se !!

  7. Deepti Says:

    lolz itka innocent ani tu....unbelievable!!!

  8. Aakash Says:

    challay kaay? ek mhanto KHOONI, ek mhanto GHOOS- khor ani ek innocent :O
    bara moral of the story: kadhi navin sharpner shalet neu naye! :D

  9. Mihir Says:

    पण त्यातला "जिग्नेश पटेल" आठवतो. <<.... आणि हे वाक्य वाचल्या वर मी पुढे वाचू शक्लो नहीं.
    lolz!!

    आणि पुढचे अपराध ब्लॉग वर ताकू नकोस नहीं तर खरच पोलिस नेतील..

  10. Aakash Says:

    मिहीर भाय आप फिक्कर नको करू, लेका तुझ्या पोराचं नाव "जिग्नेश / जीगीसा" च ठेवणार आहे!

  11. जिग्नेश हे नाव वाचून मला खरच हसायला आले या नावाचे पत्र कोणत्या तरी सिनेमात होते नक्की आठवत नाही.
    परंतु असे गुन्हे खूप वेळा घडत असतात लहान वयात ;)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates