लोणावळा ते कर्जत ट्रेल

29 July 2010 वेळ: Thursday, July 29, 2010
गेल्या आठवड्यात लोणावळा ते कर्जत ट्रेल पार पडायचा ठरलं. तयारी कसली लागते. एक जोडी कपडे, २ जोडी मोजे आणि कॅमेरा. रेन-कोट तसाही प्रोफेसर आणणार होता. सांगण्यासारखा खूप आहे, पण प्रत्येक्ष अनुभवण्यात जास्ती मजा आहे. 
वाटेत बरेच विनोद घडले, अगदी हातभार अंतरावर शौचास बसलेला माणूस चालण्याच्या नादात दिसला नाही. आणि मग जेव्हा दिसला, तर हास्याच्या उकळ्या राहावल्या गेल्या नाही. 
खंडाळा पार केल्यावर प्लान बदलला. थ्रिल येत नाही म्हणून आम्ही ट्रेल बदलला. ह्या ट्रेल वरून पडत - सावरत आम्ही खोपोलीत उतरलो. ट्रेल मात्र एकदम वसूल होता. आणि रेल्वे पटरीच्या बाजूने नुसतं चालण्या पेक्षा ह्यात लई मजा आली

काही निवडक चेहरे आणि मँप ....

(आधी ठरलेला ट्रेल)

(ट्रेल बदलला पण साधारण ५०० ते ८०० मीटर चा ग्रेडियंट उतरावा लागला.)

 वाटेत रेल्वेचं काही काम सुरु होतं.माज्दुरांना कॅमेरा समोर भारीच मजा आली! 

30 July:
काल खूप लिहायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. बोगदा क्रमांक ४८ पार केल्या नंतर डाव्या हाताला एक विजेचे टॉवर आहे. तिथून खाली जाणारी पायवाट दिसेलच. थोड्या वेळ ती पायवाट भारी वाटली, वाटेत राम फळाचे बरेच झाडं दिसले. पण हाव काही सुटेना. मंकी-हिल उजव्या हाताला सोडून अजून थोडं पुढे गेलो. आता इथून खोपोली गावाचं दर्शन होतं. वरूनच गगनगिरी महाराजांचा आश्रम दिसतो. तोच आमचा अंतिम टप्पा ठरला. आता खाली उतरायची वाट एका झरा-कम-ओढा मधून होती. पावसा मुळे दगडांवर शेवाळ जमलं होतं. पावसाळ्यात झाडी भरपूर वाढली होती. डोक्यावर गर्द झाडांची जाळी होती, आणि पायात वेलांच जाळ. निसरड्या पृष्ठभागावरून चालतांना पायांची कसरत झाली. एका ठिकाणी हेली-पॅड बघून एक क्षणभर वाटलं थोडं पुढे गेल्यावर कदाचित एखादी OTIS ची लिफ्ट असेल. लिफ्ट नाही मिळाली, पण एक पायवाट मात्र मिळाली. आता सरळ आश्रमात बिन घसरता पोहचू ह्याची हमी होती.

इतक्या वेळ झऱ्याच पाणी पिऊन तहान भागवत होतो. आता साक्षात नळातून पाणी येत होतं. आणि बाकडे जास्तीच मऊ वाटत होते. खाली यायला साधारण तास - दीड तास लागला आम्हाला. आता शोध ढाब्याचा. ढाब्यावर कोंबडी वर अडवा हात मारून झाल्यावर. लोणावळा ला पोहचायचं होतं. बस ची वाट बघण्यात कोणाला रस न्हवता. समोरून येणाऱ्या MAXX PICK -UP ला हात केला. लोणावळा पर्यंत आम्ही हवा खात
आलो

6 प्रतिक्रिया

  1. Gaurav Says:

    khup bhari... jara ajun detail madhye sangu shakal ka.. mhnje kiti wel lagato.. vagaire...ani total distance kiti aahe.. Me eikale ahe around 27 km aahe...anyways.. Pics mast aale aahet

  2. mast re...

  3. खंडाळा ते कोंदिवडे हा २००० ते २००६ अशी ७ वर्षे नित्य नियमाने जून-जुलै महिन्यात केलेला पावसाळी ट्रेक... 'उल्हास व्ह्याली' मध्ये नेमके खाली कुठून उतरलात??? आम्ही एकतर 'कुणे' येथून उतरायचो किंवा तिकडून धबधबा जास्तच जोरात असेल तर मग मन्की हिल येथून उतरायचो...

  4. सौरभ Says:

    जिंदगी रे जिंदगी. हिरवाग्गार फोटो बघून लई हेवा वाट्टोय यार. मी काय आणि का इकडे झक मारतोय. त्या पिल्लाचा फोटो ज्याम गोंडस आलाय.... :) :) :)

  5. Aakash Says:

    काल खूप लिहायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. बोगदा क्रमांक ४८ पार केल्या नंतर डाव्या हाताला एक विजेचे टॉवर आहे. तिथून खाली जाणारी पायवाट दिसेलच. थोड्या वेळ ती पायवाट भारी वाटली, वाटेत राम फळाचे बरेच झाडं दिसले. पण हाव काही सुटेना. मंकी-हिल उजव्या हाताला सोडून अजून थोडं पुढे गेलो. आता इथून खोपोली गावाचं दर्शन होतं. वरूनच गगनगिरी महाराजांचा आश्रम दिसतो. तोच आमचा अंतिम टप्पा ठरला. आता खाली उतरायची वाट एका झरा-कम-ओढा मधून होती. पावसा मुळे दगडांवर शेवाळ जमलं होतं. पावसाळ्यात झाडी भरपूर वाढली होती. डोक्यावर गर्द झाडांची जाळी होती, आणि पायात वेलांच जाळ. निसरड्या पृष्ठभागावरून चालतांना पायांची कसरत झाली. एका ठिकाणी हेली-पॅड बघून एक क्षणभर वाटलं थोडं पुढे गेल्यावर कदाचित एखादी OTIS ची लिफ्ट असेल. लिफ्ट नाही मिळाली, पण एक पायवाट मात्र मिळाली. आता सरळ आश्रमात बिन घसरता पोहचू ह्याची हमी होती.

    इतक्या वेळ झऱ्याच पाणी पिऊन तहान भागवत होतो. आता साक्षात नळातून पाणी येत होतं. आणि बाकडे जास्तीच मऊ वाटत होते. खाली यायला साधारण तास - दीड तास लागला आम्हाला. आता शोध ढाब्याचा. ढाब्यावर कोंबडी वर अडवा हात मारून झाल्यावर. लोणावळा ला पोहचायचं होतं. बस ची वाट बघण्यात कोणाला रस न्हवता. समोरून येणाऱ्या MAXX PICK -UP ला हात केला. लोणावळा पर्यंत आम्ही हवा खात आलो

  6. सुंदर फोटो आहेत

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates