बॉडी लॅंग्वेज

12 August 2010 वेळ: Thursday, August 12, 2010
"काय रे ढेऱ्या... काही अक्कल आहे कि नाही तुला?" बंड्याच्या डोस्क्याने विचारचक्राला थोडा ब्रेक मारुन थांबवून बंड्याच्या पोटाला विचारलं.
"का... काय झालं?" बंड्याचं पोट AKA ढेऱ्या.
"अरे काय बघावं तेव्हा डुरडुर डरकाळ्या मारतोस. ऑ?"
"मग काय. च्यायला एक तर दिवसभर रिकामं ठेवायचं. काही खायला नाही. मग काय करणार?"
"अरे पण काय साला कधीही चालू व्हायचं? कधी कुठे केव्हा गुडगुडावं काही काळवेळ आहे कि नाही?"
"ते मला काही माहित नाही. टायमावर मला कायतरी पचवायला मिळालं तर मी अशी गुडगुड करणार नाही. साला काय अवस्था झालीये. ते हात आणि पाय बघ. हात अगरबत्ती और पाव मोमबत्ती. त्या पायांना ५ मिनिटं धावता येत नाही आणि हातांना जरा वजन पेलवत नाही."
"अय... आम्हाला काय बोलायच नाय काय.." बंडूचे हातापाय स्वतःला झटकून संभाषणात उतरले.
"मी धावेन मैलभर. पण तो छाताडातला पंप जास्त धडधडायला लागतो. त्याची चोंदलेली पाईपलाईन दुरुस्त करा." - बंडूच्या तंगड्या
"हो. आणि मी उचलेन मणभर वजन. पण त्या कंबरेने आणि पाठीने कच खाल्ली. जरा आपलं वजन उचलून २ इंच वर काय गेलो तर त्या मणक्यांची माळ सैलावली. द्याव लागलं मग सोडून." बंड्याच्या हातांनी त्यांच्या रत्ताळ्यासारख्या स्नायूंचा उगीच फुगा फुगवला.
"ओ दंडाधिकारी, पंक्चर झालेल्या टायरमधे उगीच हवा भरायचा प्रयत्न नका करु." वासाड चाळीतले ३२ चाळकरी दात फिदफिदले.
"गपता का आता. का हाणू दोन आणि काढू सगळ्यांना बाहेर." हाताची बोटं मोडता मोडता कडाडली.
"हाय का हिंमत तेवढी?" दातांनीपण ओठ खाल्ले.
"च्यायला, परवाच तोंडावर उताणा झालेला तेव्हाच ढेपाळणार होता."
"पण ढेपाळलो का? साला ह्या डोळ्यांचा फोकस बिघडला म्हणून आपटलो. ढापण लावूनपण धड बघता येत नाही."
हे ऐकून डोळे वाटारले. "ये बत्ताश्या. जास्त बोल्लास. माझा फोकस नीटच होता. त्या कानांचे फाटलेले पडदे बदला. मागून जोरजोरात मारलेला हॉर्न आणि बोंबा ऐकू आल्या नाहीत त्यांना. आणि दिली गाडीने धडक तिच्याआयला."
"ए वाट्टाण्या, ऐकून घेतो म्हणून काय वाट्टेल ते ऐकवशील काय?" कानाच्या पाळ्या लालगरम झाल्या. "तो हेडफोन घालून फुल्ल व्हॉल्यूममधे हार्डरॉक लावून एकतर ते माझे पडदे बधिर केलेले. अश्यावेळी ढुंगणाखाली बॉम्ब फोडला असता तरी मला समजणं शक्य होतं का रे?"
"अरे काय चाल्लय काय? आपण सगळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतोय. अरे एकाच शरीराचे अवयव आपण. असं आपापसात भांडून कसं चालेल?" डोस्क्याने एक समजूतदार विचार मांडला.
"बरोबर आहे तुझं डोस्क्या. पण ह्या बंड्याने आपली काही काळजी घेतली पाहिजे की नाही? आता तु एवढा विचारवंत. नेहमी कामात असलेला. तुझीपण फिकर नाही त्याला. साला पुर्वी कसा काळ्याकुळकुळीत घनदाट केसांनी अच्छादलेला होतास तु. आता तेपण पांढरे पडायला लागलेत. विदर्भाच्या भेगाळलेल्या जमिनीसारखी त्वचा कोरडी होऊन कोंडा झालाय. अरे किती प्रॉब्लेम्स, कधी सुटणार हे प्रॉब्लेम्स???" सारं शरीर गलबललं.
"सुटतील... सुटतील..." डोस्क्याने स्वतःला शक्य तितकं शांत ठेवत म्हटल. "ह्या बंड्याच्या मनानं एकदा उचल खाल्ली पाहिजे. आपण त्यालाच विचारुया."
"बोल मना.. बोल... आमची हि अशी दुरावस्था कधी दूर होणार? सांग..."
इतका वेळ शांत असलेल्या बंड्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली. "हम्म्म्म... मला समजतय. सगळं जाणून आहे मी. ह्यासाठी सगळा आळस झटकून आपण सर्वजण सक्रिय होणं गरजेचं आहे. हि बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मी काय म्हणतो. आता ज्याम झोप आल्यासारखी वाटत्ये. उद्या उठल्यावर ताजातवाना होऊन मगच काय ते तुम्हाला सांगतो. चला मग... तोवर एक मस्तपैकी झोप काढुयात का?"
झोपेचं नाव काढताच हो हो म्हणत सगळेच अवयव गळून पडले. हातांनी थोडं लांब होत लाईट बंद केले आणि चादर ओढून घेतली. तंगड्यांनीपण पटकन स्वतःला चादरीत दुमडून घेतलं. डोळ्यांनी ताबडतोप शटर ओढून घेतले. कानांनी पडदे झटकून घडी घालून ठेवले. डोस्क्याने त्याचा कंप्यूटर स्लिपमोडमधे टाकला.

शरीरसंपदा आणि आरोग्यविकासाचा ऐरणीवरचा प्रश्न नेहमीसारखाच उद्यावर टाकून बंड्याचं धूड झटक्यात निद्राधिन झालं.

आपला,
(Fit & Fine) सौरभ

20 प्रतिक्रिया

  1. आयला जबराट... इकडही तोच प्रॉब्लेम आहे रे... भन्नाट लिव्हलंस...

  2. सौरभ Says:

    हा हा... आनंदा, as expected पहिलं कमेंट तुझंच आलं. :) घरापासून लांब राहिलं की खाण्यापिण्याची खुप अबाळ होते यार. भारतात गोष्ट वेगळी होती. काहि नाही तरी टपरी किंवा छोटी खानावळ असायची. रोज बाहेर खाल्लं तरी परवडेबल होतं. इकडे भारतीय दुकान नाही. रोज बाहेर खाल्लं तर नागडं व्हायची पाळी येईल. शॉट लाईफ असते राव.

  3. रच्याक...च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक...लय भारी रे!!

  4. ह्म्म... सगळीकडे हेच दुरून डोंगर साजीरे नाही का ?

    अवांतर- तुझ्या ह्या पोस्टची लिंक मी बझवर टाकली आहे... आक्षेप नसावा ही अपेक्षा... :)

  5. सौरभ Says:

    मनमौजी :) ब्लॉगवर स्वागत :D I my भेरी happy to c ur comment... धन्स a lot :D बंड्यापण खुश आहे. त्याच्या अंगावर मुठभर मांस चढलय. :D :P ;)

  6. सौरभ Says:

    अरे आनंदा आक्षेप कसला?!! rather feel really good and thankful to you that you shared it. I just searched for you on Google Buzz... check out, am following you.

  7. हा हा
    लयच भारी
    बाकी इकडे असल्या समस्या नाहीत
    (Fit & Fine)विक्रम

  8. सौरभ Says:

    विक्रम, सुखी आहेस लेका. आण माझ्यामते तु आधीच माझा ब्लॉग फॉलो करतो आहेस. I can see you in the followers list.

  9. एकदम शोल्लीड बर का ...............

  10. अरे मी टाकलेला बझ प्रायव्हेट आहे, त्यामुळे कदाचित तुला दिसत नसेल... पण तू फॉलो करतोय हे वाचुन,पाहुन बरं वाटलं ;)

  11. अरे सौरभ... ह्या आनंदने लिंक दिली रे आम्हाला तुझ्या ब्लोगची.. मस्त एकदम.. तुझा ब्लॉग 'मराठी ब्लॉग विश्व' वर नसल्याने चटकन सापडला नाही.

    आणि हो.. तुझा एक फोटो अपलोड कर.. बघुया तुझे अवयव बंड्यासारखे झाले आहेत का ते... :) जोडणी उत्तम... :)

  12. Aakash Says:

    बंडोपंत, कमाल लिहलं! फट्टेश हाय एकदम!
    पण माझाच नशीब का बेकार? मला तर माझ्या खानावळीच जेवण लई मानवतं, घरी आलो की मग आई सलाड अन कडधान्य चारते :(

  13. Aakash Says:

    एक डझन followers साठी अभिनंदन!!

  14. सौरभ Says:

    सचिन: thanku :)

    आनंद: मी buzzin जास्त करत नाही. Twitterला तिकडे कनेक्ट केलय म्हणून बव्हतांशी तिकडे twitsच येतात. नाहीतर मित्रांच्या buzzला reply टाकणे एवढच काम. and once again thanks for sharing it :) :)

    रोहन: मी नियमित काही लिहित नाही. म्हणून इतर कुठे ब्लॉग जोडला नाही. आणि माझ्या फोटोच म्हणत असशिल तरा ते विजेटमधे आहेतच, त्याखाली एक थोडासा जाड सांगाडा लावलास तर पुर्ण कल्पना येईलच. :D =))

    आक्या: तु पुण्यात आहेस लेका. मी दक्षिण भारतात पाहुणा होतो. नाय झेपलं आपल्याला. :( आणि आता followersच्या बाबतीत आपण तुले टक्कर देऊन रायलोय. :D

  15. Aakash Says:

    बंडोपंत, तुम्ही डझनभर मिळवले followers . आज आम्हाला तेरवा follower प्राप्त झाला! ह्या निम्मित तेरावं साजरा करू की नको विचार करतो आहे. तसं आपल्या kartutvachya तेराव्याला उपस्थित राहण्याला पण नशीब लागतं ;)

  16. Deepti Says:

    saurabh tussi toh ekdum chaa gaye ji!! apratim post hota ha.....
    वा वा मजा आला फारच !!( सुरेश वाडकर style मध्ये!!)

  17. भन्नाट आडस...
    बाकी रोहन +१

  18. सौरभ Says:

    @दिप्ती: सुरेश वाडकर स्टाईल.. हाSहाSहाS... सारेगमप-मधे कमेंट देत असलेला समोर आला. मी त्याच्यासमोर हातात लेखणी घेऊन उभा आहे आणि तो त्यावर प्रतिक्रिया देतोय - शब्द थोडे इकडेतिकडे झाले, वाक्यरचना कुठे कुठे जमली नाही. पण छान झाला लेख. असेच प्रयत्न कर, पुढच्या वेळी अजुन चांगला होईल. :P ;)

    @सिद्धार्थ: धन्यवाद :)

  19. Aakash Says:

    suresh wadkar contd.

    madhe tu ti atre'nchi style uchallis, pan ti kahi neat carry nahi zali. jevha atre lihayche......mhanje pahaa hi mazya tarunpanatli goshta sangto......

    titkyat pallavi joshi: aaho asa kaay, tumhi tar amhala ajun hi tarunach wat-ta........apan wadkarjeenchya tarunayi an atrenchya kissya baddal bolu, pan thodya velani! tar vachakho ithe gheu apan ek chotasa break, vachat raha > Idea Ka-kha-ga-gha!!

  20. Aakash Says:

    Suresh Wadkar contd.

    मधे तु ती अत्रेंची स्टाईल उचल्लीस, पण ती काही नीट carry नाही झाली. जेव्हा अत्रे लिहायचे.... म्हणजे पहा मी माझ्या तरुणपणातली गोष्ट सांगतो....
    तितक्यात पल्लवी जोशी: अहो असं काय, तुम्ही तर आम्हाला अजुनही तरुणच वाटता.... आपण वाडेकरजींच्या तरुणाई आणि अत्रेंच्या किस्स्याबद्दल बोलू, पण थोड्या वेळानी! तर वाचकहो इथे घेऊ आपण एक छोटासा ब्रेक, वाचत रहा आयडिया > कखगघ!!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates