चतुर्थी - पास

22 August 2010 वेळ: Sunday, August 22, 2010

एखादा मित्र तुम्हाला आग्रहाने जेवायला बोलावतो. 
तुम्ही येणार म्हणून तो जय्यत तयारी सुरु होते, 
घरी पाऊल टाकताच चिकन चा गंध तुमचं स्वागत करतो.
त्या चिकन च्या गंधात गुरफटलेल्या अवस्थेत तुम्ही कोलंबी च्या लोन्च्याचाही गंध टिपता!
वाः! 

अन अशा वेळी तुमच्या मित्राचा फोन येतो. तुम्ही त्याची जळवायला म्हणून त्याला बेत सांगता, आणि तोच तुम्हाला चमकवतो, "लेका आज चतुर्थी आहे"
मग अश्या कथेचा अंत तुम्ही "मटार उसळ आणि शिकरण पोळी" वर कराल? 
अन्नाची नासाडी कराल?
आणि मेल्यावर "चित्रगुप्ते" ला काय उत्तर द्याल? - "मी समोर वाढलेली कोंबडी फस्त केली नाही" 
नाही नाही.......त्रिवार नाही. 

जर तुम्ही चिकन खाल्लं तर तुम्ही खवैय्ये नाही. 
अशा खवैय्या बांधवांसाठी आमच्या आज्जी ने एक सुरेख कन्सेप्ट काढलीये. - "पास"
अजून हे पास सर्वत्र उपलब्ध नाहीत, पण लवकरच मिळतील. 
आता असे काही योग आले, कि पट्ट-कन्न पास आणा, आणि मनात "चतुर्थीला नॉन वेज खाल्लं" अशा संकोचांना दूर करा!  



हा पास मिळवला कि मग बाप्पाचा येल्लो कार्ड किंवा रेड कार्ड मिळणार नाही! 
जओ बालक खादाडी करो!

6 प्रतिक्रिया

  1. असे पास कधी आणि कोठे उपलब्ध होतील सांगता का पटकन त्याची नितांत गरज आहे आजच्या काळात :P

  2. हा हा.. जबरी कल्पनाची आयडीया !!

    अनिकेत
    http://manatale.wordpress.com

  3. सौरभ Says:

    :D बास बास... आपल्यासाठी खास पास ठेव तयार :)

  4. Mihir Says:

    कस्ला सोयीचा पास काढला आहे.. वाह!!
    बड़े काम की चीज़.. :)

  5. Aakash Says:

    haha! sadhya tari he passes mail karto mi.

    Kadachit baher kuthe vikayla baslo tar lokanchya dharmik bhavna dukhavlya jatil.......

    kitti ani kadhi pass have te sanga!

    Vikram, Aniket, BABA, Mihir > Dhanyawad :D

  6. हाहाहा.. जब्बरदस्त! लोळालोळी

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates