रजनीकांत बसवायच्या मागची श्टोरी

14 September 2010 वेळ: Tuesday, September 14, 2010
गणपती बसले!
गोंगाटाचे दिवस आले!
आता गणपतीच्या नावाखाली रस्त्यात मांडव उभे करता येतात. लाउड-स्पीकर पण सुरु ठेवता येतो. 
रहदारीचा किस्साच उदास होतो. असो.....मला काय चुगली करायची नाही. पण माझं म्हणणं आहे कि थिल्लरपणा करायचाच आहे, तर ते पण चाखत-माखत का?
संपूर्ण आस्वाद घेऊ यात कि! 

मग रजनीकांत बसवायची आयिड्या आमच्या डोक्यात फुलली. 
प्रोफ. सौरभ, संकेत ने आता हि आयिड्या पिकवायला घेतली. 
एखादा कार्यक्रम करायचाच तर मग काही कमी नको पडायला. 
तुम्हाला पण काही सुचत असेल तर नक्की सुचवा.

काम भरपूर आहे, रजनी देवाचे भक्तीगीतं मिळवण्या पासून पोथी आणि कथा लिहण्यापर्यंत.
स्वामी संकेतानंद ने पुढाकार घेऊन आरती रचली आहे. 
ज्या सपाट्याने रजनीदेवा मराठी ब्लॉग विश्वात झळकतायत,
तुमच्या घरी रजनीकांत बसवण्याची वर्गणी मागायला आलेली पोरं बघून दचकू नका.
स्वामी संकेतानंद च्या creativity चा आस्वाद घेण्यासाठी क्लिक करा

घडामोडी काही थांबणार नाही, लिहावं तितकं कमीच असेल.
पण एक गोष्ट निश्चित्त - आता मांडवाच्या मागे लपून पत्ते कुटायची गरज नाही! 

5 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    रजनि बसवण्याची सुरुवात १२/१२/१२ १२:१२:१२ ला करु... पृथ्वीला वाचवणारा तो एकच तारणहार आहे.

  2. Aakash Says:

    haha! nahi nahi, apan already rajani chya changulpanachya karjat budaloye. warun pruthvi vachavnyachi kruti karun amhi karjaat paar gudmarun jau.

  3. १०.१०.१० ला १०.१०.१० वाजता हे कसे आहे ;)

    आणि हे पटत असेलतर लगेच कामाला लागा वेळ जास्त नाही राहिला :P

  4. sanket Says:

    विक्रम्रराव, देवाजींचा वाढदिवस १२-१२ चा आहे हो, म्हणून १०-१०-१० चालणार नाही.

  5. Aakash Says:

    तशी तर मला पण घाई होतेय रजनी देवाजी बसवायची. पण म्हूर्त हा म्हूर्त. १२ डिसेंबर ला रात्री ११:५४ ला हा भव्य सण सुरु होईल!

    तसा मी लूप होल काढलाय एक. एखादा चांगला दिवस बघून रजनीकांतचा फोटो आपल्या देवघरात ठेवा. रोज पूजा करा, दिल खुलास प्रसाद वाट!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates