Complaints to Almighty

12 June 2011 वेळ: Sunday, June 12, 2011
माझा एक विद्यार्थी होता सारीश. अभ्यासात गग्याचा लहान भाऊ शोभेल असा. तरी नशीब त्यांचा गग्या फक्त गणितात होता म्हणून. आताच आमचा सारीश बारावी पास झाला.

असो....
तर गोष्ट अशी आहे कि सारीशच्या धाकट्या बहिणीचा नाव आहे सांची.
सांची सुरेख नाचते. मध्ये ई-टी.व्ही  मराठीवर तिचा नाच दाखवण्यात आला.
पण दोघं कितीही सदगुणी असले, तरी बहिण - भावाची नोक झोक कोणी टाळली आहे काय?

आता दररोज शिकवतांना मधेच सांची उर्फ मैनावती (मैने सारखी मान हलवत खूप चुटूर-चुटूर बोलते म्हणून हे नाव ठेवलं) येऊन सारीशच्या वाईट वर्तनांचा पाढा वाचून जायची. तिची इच्छा असायची कि मी सारीशला रागवावं, एखादा फटका द्यावा. (त्या लहानग्या पोरीला काय माहिती department - department मधला फरक.... )
म्हणून मी पण लगेच उपाय सुचवला, कि तिने मला ह्या सगळ्या तक्रारी कागदावर लिहून द्यायच्या आणि मग त्या वाचून मगच शिक्षा फर्मावल्या जाईल. अन सोबतच ह्या तक्रारींच्या प्रत्येक पानासाठी एक टॉफी देण्यात येईल. माझ्या मते लहान मुलांना व्यस्त ठेवण्य साठी त्यांना अश्या टास्क दिल्या कि त्यात ते गुंतून बसतात, थोडक्यात तुम्हाला त्या पोराची भुण भुण नाही ऐकावी लागत.


त्या दिवसाचा तास, अगदी छान शांतीत गेला. अभ्यास अगदी छान झाला. घरी जायला निघालो तो, सारीशची तक्रार चिट्ठी माझ्या हातात. पहिले सर्व तक्रारी वाचून तर मी भौचाक्का झालो.
बाप्पा काय हि जालीम दुनिया .....तुम्ही पण वाचून बघा, कदाचित तुमचे पण डोळे पाणावतील.

(मैनावती तशी लहान आहे, त्यांच्या 'pelling '  मिष्टेक ला Kindly Adjesht करा!)





हि पानं मी मैनावतीच्या डायरी मधून स्मगल करून आणली होती. सौरभला कधी दिली मला हि लक्षात नाही. अन आता थोड्या वेळ पूर्वी अचानक हि २ पानं नित नेटके स्कान होऊन माझ्या मेल मध्ये होते! 

Recalling - Her Lacuna

वेळ: Sunday, June 12, 2011

"कोल्हाट्याचं पोर" वाचून मेघचा Her Lacuna ब्लॉगपोस्ट आठवला... आणि त्यावर केलेली एक कविता...

गावतल्या एका बदनाम गल्लीत, नार उभी करुनी नखरा हो,
वाट पहातसे कोणाची, देहाचा मांडुनि पसारा हो...

भडक तिचे हे रूप असे, जरी ना सुंदर ना मादक हो,
तरी लक्ष घेती वेधुनि, पुरुष पाहती विस्फारुन हो...

लज्जा इच्छा स्वप्न अपेक्षा, मृत झाल्या सर्व संवेदना हो,
जाणिवा करुनि बधीर ती, तृप्त करितसे वासना हो...

शरीरपिपासु जनावरांची, नजर शोधतसे सदा शिकार हो,
नसती का जर ती, तर काय उडाला असता हाहाकार हो...

बलात्कारापासून वाचवतसे, सुसंस्कृत घरचि ललना हो,
विकुनी सत्व तिने स्वत:चे, अब्रु दुसरिची रक्षिली हो...

लाथाडून समाजातून जगाने, तिजवर जरी टाकला बहिष्कार हो,
ओसाड पडतील गावे, परि कधी रिक्त न तिचा बाजार हो...

शमवूनी भोग अनेक जिवांचे, वैरागी ती राहीली हो,
धिक्कारणाऱ्या समाजानेच तिला, शैय्यासोबत केली हो...

भंगलेल्या ह्या अस्तित्वाची तमा कधी ना कुणा हो,
अश्वत्थाम्याच्या जखमेपरि, कधी ना भरेल HER LACUNA हो...

आपला,
(चांगल्या घरचं पोर) सौरभ

पाऊस

02 June 2011 वेळ: Thursday, June 02, 2011

(जुने ठेवणीतले काही...)
ग्रीष्माच्या काहिलीने अवघी सृष्टी होरपळली,
फुंकत प्राण त्यांमधे शितल हवा हळूच झुळकली,
वाहती इकडे तिकडे वारे गार कोणाचे बरे दूत बनून,
काळे मेघ पडघम बडवित नभी अचानक आले दाटून,
दवंडी पिटलि अस्मनि ह्या वीज जेव्हा ती कडाडली,
अगणित सरींची सेना निमिषार्धात ह्या धरतीवर अवतरली,
रिपरिप, रिमझिम, धो-धो करीत पाऊस असा हा बरसला,
कोंदटलेल्या श्वासा-श्वासात मृदगंध सुवासिक दरवळला...

आपला,
(भिजलेला) सौरभ

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates