Showing posts with label संवाद. Show all posts
Showing posts with label संवाद. Show all posts
आयुष्य आणि सुरळी
23 October 2010
वेळ:
Saturday, October 23, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
गुंड्या: काय चाल्लय बाकी?
बंड्या: चाल्लय.
गुंड्या: काय?
बंड्या: आयुष्य सुरळीत चाल्लय आणि सुरळी ............................
(बंड्या आणि गुंड्या एकमेकांकडे बघुन उगीचच 'ह' नी 'ख'च्या बाराखडीत बराच वेळ खिदळत होते.)
आपला,
(बावळट) सौरभ
Posted In
संवाद
|
11
प्रतिक्रिया
|
शल्य
04 September 2010
वेळ:
Saturday, September 04, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
तुम्हाला कधी शल्य बोचणे/टोचणे, शल्य राहणे असला अनुभव आलाय का? मला सांगा शल्य बोचायला/टोचायला तो काटा आहे कि रहायला दुःखाला समानार्थी शब्द आहे? आयला मग हे शल्य म्हणजे मॅटर हाय काय? वेल, नसेल माहित तर मग तुम्हाला खालचा फाफटपसारा वाचावा लागेल....
डॉक्टरचा सहज फोन आला. २०-२५ मिनिटं शिस्तीनुसार आम्ही एकमेकांना पकवलं. मग फोन ठेवता-ठेवता...
डॉक: चल मग, ठेवतो. बोलू नंतर. जय श्रीराम.
मी: जय नकुल-सहदेव.
डॉक: हे काय??? नकुल-सहदेव का???
मी: आता तु जय श्रीराम बोल्लास, मी जय श्रीकृष्ण बोल्लो असतो. नेहमीची नावं झाली ती. म्हटल कोणा वेगळ्याचं नाव घेऊ. तसंपण नकुल-सहदेवांना कोणी विचारत नाही. ह्या नकुल-सहदेवांचा काही रोल होता का रे महाभारतात?
डॉक: हो, मग काय. कर्ण ह्यांच्यामुळे हरला.
मी: ऑ... काय सांगतोयस???
डॉक: हो. नकुल-सहदेव माद्रीची मुलं. शल्य माद्रीचा भाऊ, म्हणजे ह्यांचा मामा. महाभारताची लढाई झाली तेव्हा शल्य त्याचं सैन्य घेऊन पांडवांच्या मदतीला निघाला. पण तो वाटेत असताना शकुनीने डाव रचला. त्याने त्याच्यासाठी महाल बांधला. त्याची आणि त्याच्या सैन्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली. शल्याला माहित नव्हतं कि हे सगळं शकुनीने केलय. त्याला वाटलं कि युधिष्ठीराने हा सगळा पाहुणचार केला. युधिष्ठीराला तो थॅंक्यू म्हणायला गेला तेव्हा युधिष्ठीर बोल्ला की मी हे काही केलं नाही, मला काही माहित नाही. नंतर त्याला समजल की हे सगळं दुर्योधन आणि शकुनीने केलय. क्षात्रधर्मानुसार एखाद्याचं आदरातिथ्य घेतल्यावर तुम्ही त्याचं देणं लागता. शल्याने दुर्योधनाचं आदरातिथ्य घेतल्याने त्याने दुर्योधनाला विचारलं की तुला ह्या बदल्यात काय पाहिजे? दुर्योधन शल्याला म्हणाला, तु तुझ्या सैन्यासह पांडवांविरुद्ध लढायला मला मदत कर. आता शल्य त्याच्या बहिणीच्याच मुलांविरुद्ध कसा लढेल? तेव्हा तो दुर्योधनाला म्हणाला, मी तुला माझं सैन्य देतो पण नकुल-सहदेव माझे भाचे आहेत. मी त्यांच्याविरुद्ध लढणार नाही. हवंतर मी तुझं सारथ्य करतो. श्रीकृष्णानंतर सारथ्य करण्यात जर कोणी पारंगत असेल तर तो शल्य होता. अर्जुनाला टक्कर देणारा धनुर्धारी कर्ण होता. अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण, म्हणुन कर्णालापण श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी मिळावा म्हणुन दुर्योधनाने शल्याला कर्णाचं सारथ्य करायला सांगितलं. शल्य तयार झाला. पण शल्याने कर्णाची वाट लावली. सारथ्याचं काम असत की तो ज्या योद्ध्याचं सारथ्य करतो त्याला प्रोत्साहित करायचं, जसा श्रीकृष्ण अर्जुनाला करायचा. पण शल्य कर्णाला घाबरवायला बघायचा. त्याला नेहमी टाकूनपाडुन बोलायचा. कर्णाला तसापण शाप होताच. जेव्हा त्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्याला त्याची विद्या वापरता येणार नाही. त्याला काही आठवणार नाही, त्याच्या मनात भिती असेल. कर्णाला डिमोरलाईझ करण्याचं सगळ्यात मोठ्ठ काम शल्याने केलं.
म्हणुनच मराठीत शल्य बोचणे/टोचणे/राहणे म्हणतात ते ह्यावरुनच.
मी: (फुलऑन आश्चर्यचकित!!! बोलेतो भौचक्का!!!) क्कॉय बोलतो...
डॉक: हो, कारण शल्याने मानसिक खच्चीकरण केलं.
तर आता तुम्हाला समजलं असेलच शल्य बोचणे/टोचणे/राहणे हा शब्दप्रयोग बोलीभाषेत कसा आला. त्यामागे एवढं मोठ्ठं रामायण... सॉरी महाभारत घडलं.
अवांतर:
मी: ते ठिकाय. पण ह्यात नकुल-सहदेवांचा काय संबंध???
डॉक: अरे, आता नकुल-सहदेव शल्याचे भाचे म्हणुन तो त्यांच्याविरुद्ध लढला नाही. आणि त्यांच्यामुळेच कौरवांच्या साईडने असुनपण पांडवांच्या फायद्याचं केलं.
मी: हम्म्म्म्म... इनडायरेक्ट रिलेशन. कॉम्प्लीकेटेड आहे.
पुढे आमच्या महाभारत ह्या टॉपिकवर बराचवेळ गप्पा झाल्या. डॉक्टरला महाभारत हा इतिहास असल्याचा पुर्ण विश्वास आहे. मला ते खरंखोटं ठरवण्याचा विवाद करण्यात रस नाही. महाभारत हे एका ऋषिने कोणा राजाला ऐकवलं होतं. राजाचं नाव आठवत नाही, पण डॉकने त्या ऋषिचं नाव सौती असल्याचं सांगितलं आणि सौतीने जे सांगितलं ते म्हणजे 'महाभारत'. व्यासांनी जे लिहलं ते 'जय' म्हणुन, ज्यात ३२,००० ओव्या आहेत/होत्या. पुढे त्यात अनेक ऋषिमुनींनी त्यांच्यात्यांच्या ओव्यांची भर टाकली, ज्यामुळे त्या ओव्यांची संख्या १ लाखाच्या आसपास गेली. ह्यामुळेच आणि भाषांतर करताना भावार्थ समजुन नं घेता शब्दार्थ समजुन घेतल्याने महाभारतातल्या (रामायणातल्यासुद्धा) अनेक घटनांची तर्कसंगती लावणं निव्वळ अशक्य आहे.
आपला,
(शल्यविशारद) सौरभ
Posted In
संवाद
|
21
प्रतिक्रिया
|
आम्ही रसिक
17 April 2010
वेळ:
Saturday, April 17, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
वेळ: रात्री साधारण १:३०-२:०० वाजताची. भुरजी-पाव चापुन टेबललॅम्पच्या मंद पिवळ्या उजेडात निवांत बसलेलो. G-पॅट बेडवर आडवा झालेला. डॉक्टरच्या फोनवर ऋतु-हिरवा अल्बममधली गाणी वाजत होती. ऋतु हिरवा... ऋतु बरवा... पाचूचा वनी रुजवा... आशा भोसले यांनी स्वर छेडले. निरव शांततेतलं ते वातावरण मंतरलं गेलं, कशाने तरी भारावलं गेलं...
G-पॅट(डोळे मिटलेल्या समाधी अवस्थेत): अरे, केवढा गोड आहे आशा भोसलेचा आवाज. श्श्या...
मी(तल्लीन होऊन): म्हणजे अस्वस्थ व्हायला होतं, एवढा गोड कसा काय असू शकतो! अशक्य...
डॉक्टर(हसत): असं वाटत आशा भोसलेला मिठी मारुन पप्पी घ्यावी, एवढा गोड आहे अरे...
(हे ऐकून मी आणि G-पॅट "!!!!!" भावना पोचल्या... आशा भोसले रॉक्स्झzzz!!! she is the most versatile and talented and greatest singer in world.)
हा किस्सा झाल्यावर नकळत गप्पांमधे कवितांचा (मुलगी नव्हे) विषय निघाला. "निवडुंग" चित्रपटातील ग्रेस ह्यांनी लिहलेल्या गाण्यांवर चर्चा झाली. ग्रेस ह्यांची गाणी मला abstract category मधली वाटतात, समजून न समजल्यासारखी. डॉक्टरने मला त्यांच्याबद्दल एक फार छान किस्सा सांगितला. हॄदयनाथ मंगेशकरांच्या कार्यक्रमाला तो गेला होता तेव्हा त्यांनी तो ऐकवला होता. ग्रेस ह्यांच्या "ती गेली तेव्हा रिमझिम" गाण्यात एक ओळ आहे "ती आई होती म्हणूनी, घनव्याकुळ मीही रडलो". हॄदयनाथांनी जेव्हा ह्या ओळीबद्दल ग्रेसना विचारलं तेव्हा ग्रेस ह्यांनी एक कथा सांगितली. ती अशी...
एक माणुस रोज संध्याकाळी एका टेकडीवर नगारा वाजवत असे. आणि तिकडे एक मेंढीचं पिल्लू त्याला बघुन रडायला लागे. एकदा असेच होता तो माणुस त्या पिल्लाजवळ जातो आणि विचारतो की मी नगारा वाजवायला घेतो तेव्हा तु रडतोस का? तुला आवडत नाही का माझं नगारा वाजवणं? तेव्हा ते पिल्लू त्याला म्हणतं मला तुझ्या नगाऱ्यातलं काही समजत नाही, पण मला एवढच माहितीये की त्या नगाऱ्याचं जे चामडं आहे ते माझ्या आईच्या कातडीपासून बनवलय...
बास्स... हे ऐकून मी सुन्न झालो. काय समजायचं ते समजलो. एका, फक्त एका ओळीमागे एवढा गहन विचार असू शकतो!!!??? मग अजून एक समजलं ग्रेस ह्यांच्या कविता मला कधी समजल्याच नव्हत्या आणि त्यांच्यामागील गोष्ट कळल्याशिवाय त्या समजणारदेखिल नाहीत.
आपला,
(रसिक) सौरभ
Posted In
संवाद
|
5
प्रतिक्रिया
|
प्रेशर
25 November 2009
वेळ:
Wednesday, November 25, 2009
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
(मला जरा वैतागून बसलेलं पाहून बंड्यानं माझ्या पाठीवर थाप देत विचारलं...)
काय रे, काय झालं? तब्ब्येत ठीक नाहीये का?
मी: काय सांगू बंड्या, आजकाल ऑफिसमधे पाय ठेवला रे ठेवला की प्रेशर जाणवतं.
बंड्या: काय बोलतो???!!!
मी: अरे नाहीतर काय. अगदी संध्याकाळी उशीरा ऑफिसमधून निघेपर्यंत प्रेशर असतं.
ऑ!!! पण तु दिवसभर प्रेशर सहन करत ऑफिसमधे कसा काय रे बसू शकतोस??? (बंड्याने निरागसपणे विचारलं.)
मी: काय करणार? (उसासा टाकत...) नाईलाज आहे... बसावं लागतं.
(दोन्ही हात वर करुन, ताणत मी मस्तपैक आळस दिला.)
अगदीच अस्वस्थ झालं तर सरळ ब्रेक घेतो. फ्रेश होऊन आलं की पुन्हा काम चालू.
त्यापेक्षा मग घरी का नाही आवरत तु??? (बंड्याचा प्रेमळ सल्ला.)
मी: छ्यॅ छ्यॅ (म्हणून मी बंड्याला उडवून लावलं)... मी ऑफिसमधेच सगळं उरकतो आणि मग येतो.
ऑफिसमधेच??? (गडबडलेल्या बंड्याची मान कावळ्यासारखी तिरकी झालेली.)
मी: ही ऑफिसची कामं ऑफिसमधेच करायची. उगीच घरी कशाला त्याचा व्याप.
ऑफिसची कामं!!!??? आणि ही अशी???!!! (बंड्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, गोंधळ, प्रश्न, अविश्वास आणि ईईई शी बाबा अश्या टाईपचे सगळे भाव एकवटून आलेले.)
मी: मग काय... असतात एक एक कामं. ऑफिसच्या कामांचं प्रेशर काय असतं हे तु ऑफिसला जायला लागशील तेव्हाच समजेल.
बंड्या: ओह्ह्ह्...(निःश्वास सोडत) ऑफिसच्या कामाचं प्रेशर होय... ते म्हणतोयस का तु???
(बंड्याला का कोण जाणे, उगीच हायसं वाटलं.)
मी: हो, मग काय? डेडलाईन जवळ आलीये. प्रोजेक्ट्स संपवायचेत. तुला काय वाटलं??? कोणत्या प्रेशरबद्दल बोलतोय मी???
बंड्या: मला वाटलं की...
(असं म्हणत बंड्यानं पोटावरुन हात फिरवला. त्यानं प्रेशरचा काय अर्थ घेतला ते लक्षात आल्यावर मी कप्पाळावर हात मारुन घेतला.)
आपला,
(अंडरप्रेशर) सौरभ
Posted In
संवाद
|
2
प्रतिक्रिया
|
विशुभाऊ आणि माझ्यात झालेला वार्तालाप...
16 October 2009
वेळ:
Friday, October 16, 2009
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
Vishal: नमस्कार,
तुम्हांला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना विशुभाऊ रणदिवे व परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही दीपावली तुम्हाला सुख-समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची ठरो व तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.
saurabh: (गळाभेट) आपणासही दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा
Vishal: धन्यवाद
saurabh: या... विशुभाऊ... या... फराळ करुयात...
Vishal: नक्कीच
घ्या हे लाडू आणि करंज्या घ्या
saurabh: (दोनदा टाळ्या मारुन...) कोण आहे रे तेथे??? फराळांचे तबक आणा...
धन्यवाद विशुभाऊ...
Vishal: (स्मित हस्य करत) काही गरज नाही... आपल्या आग्रहातच सगळ मिळाल
(एक भुवई ताणून) कधी येणार ह्या भारत देशी परत?
saurabh: हे घ्या... आमच्या मातोश्रींनी खास भारताहून हा फराळ पाठवला आहे... साजूक तुपातला
हि चकली... किती खुसखुशीत आहे...
Vishal: (चाखत) खरच फार अप्रतीम आहे
saurabh: मातृभूमीची आस खुप लागून आहे... पण सध्या आम्ही महत्वाच्या स्वारीवर आहोत...
Vishal: (ताट पुढे करत) हा रव्याचा लाडू बघा चाखुन... तुमच्या वहिनींनी केला आहे
स्वामी आपणास यश देतीलच... तरी आमच्या शुभेच्छा
saurabh: (खुशीत...) वाहवा... लोण्यासारखा विरघळला... अतिशय चविष्ट आहे... (एक संपवून आता दुसरा...)
Vishal: घ्या हो सगळे तुमचेच आहेत
saurabh: स्वामी यश नक्कीच देतील ह्यात शंका नाही. ते लवकर पदरी पडो हिच अपेक्षा..
विशुभाऊ... आपला कारभार कसा चाल्ला आहे?
Vishal: धंदा मंद आहे... पण नोकरी ठिक आहे
saurabh: ह्म्म्... संसार व्यवस्थित आहे ह्याहून अधिक ते काय हवे...
आपल्या उद्योगधंद्यात मनाजोगती प्रगती होवो...
Vishal: धन्यवाद
आपला,
(वार्तालापि) सौरभ
Posted In
संवाद
|
0
प्रतिक्रिया
|
दुःख
02 October 2009
वेळ:
Friday, October 02, 2009
| लिहिणारा/री/रे:
सौरभ

(मी सन्नीपाजीचा 'घायल' चित्रपट बघत होतो. का? कारण सर्व नविन चित्रपटांचे पर्याय संपले होते. सुजय मॉटेलला कामावर जाण्याच्या तयारीत होता. निघण्याआधी त्याने एक सिगरेट सुलगावली. आणि माझ्या खोलीच्या दरवाज्याच्या चौकटीला येऊन खेटून उभा राहीला. मी 'प्यार तो तुम मुझसे करती हो... डोन्ट से नो...' म्हणणाऱ्या सन्नीपाजीकडून पोरगी पटवायचे धडे घेण्यात गर्क होतो. तेवढ्यात...)
सुजय: (सिगरेटचे झुरके सोडत...) ये मिनाक्षी शेषाद्रीभी सही अक्ट्रेस थी
मी: हम्म्म... (पॉझ) अब तो एकदम गायब हो गयी है
सुजय: ऐसेकैसे रे...!??? जानेसे पहले तेरेको कुछ बोलके नही गयी???!!
मी: (उसासा टाकत...) नही रे... देखना साला शादी होनेके बाद कोई कॉन्टॅक्टमें रेहताही नही अश्विनी भावे देख, माधुरीको देख किसीने कॉन्टॅक्ट नही किया लेटेस्ट ऐश्वर्याको देख बच्चन क्या मिल गया, भूलही गयी
(ह्या एकंदर संभाषणादरम्यान आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर कमालीचं दुःख होतं. हताश नजरेने एकमेकांकडे बघितल्यावर...)
ख्यॅं..ख्यॅं.. (फुल्या फुल्या).. ख्यॅं..ख्यॅं.. (फुल्या फुल्या)..
(ह्यावेळी आम्ही 'ख'च्या बाराखडीत हसत होतो. चल निकलता हू म्हणून सुजय निघाला आणि मी देसी अर्नॉल्डच्या मूव्हीत डोकं खुपसलं.)
सुजय: (सिगरेटचे झुरके सोडत...) ये मिनाक्षी शेषाद्रीभी सही अक्ट्रेस थी
मी: हम्म्म... (पॉझ) अब तो एकदम गायब हो गयी है
सुजय: ऐसेकैसे रे...!??? जानेसे पहले तेरेको कुछ बोलके नही गयी???!!
मी: (उसासा टाकत...) नही रे... देखना साला शादी होनेके बाद कोई कॉन्टॅक्टमें रेहताही नही अश्विनी भावे देख, माधुरीको देख किसीने कॉन्टॅक्ट नही किया लेटेस्ट ऐश्वर्याको देख बच्चन क्या मिल गया, भूलही गयी
(ह्या एकंदर संभाषणादरम्यान आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर कमालीचं दुःख होतं. हताश नजरेने एकमेकांकडे बघितल्यावर...)
ख्यॅं..ख्यॅं.. (फुल्या फुल्या).. ख्यॅं..ख्यॅं.. (फुल्या फुल्या)..
(ह्यावेळी आम्ही 'ख'च्या बाराखडीत हसत होतो. चल निकलता हू म्हणून सुजय निघाला आणि मी देसी अर्नॉल्डच्या मूव्हीत डोकं खुपसलं.)
आपला,
(दुःखी) सौरभ
Posted In
संवाद
|
1 प्रतिक्रिया
|
आणि भात पकला...
29 September 2009
वेळ:
Tuesday, September 29, 2009
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
(भांड्यातील शिजलेला भात पाहून मी सुजयच्या खोलीकडे गेलो...)
मी: साला वनफोर्थ राईस लगाया था, पकके अभी पुरा बर्तन भर गया है|
(आपल्याच तंद्रीत असलेल्या सुजयला अचानक मी असं काही बडबडत आल्याने काही झेपलं नसावं)
सुजय: (???) पकके भर गया मतलब???
मी: मतलब मैने राईसको पकाया| PJ सुनाया| वो पक गया|
सुजय: च्यायला **साला... हाहाहा!!!
(बाजूच्या सोफ्यावर अमित नेहमीसारखा हेडफोन लावून त्याच्या लॅपटॉपमधे घुसून बसलेला. आमच्यातलं बोलणं ऐकून त्याच्या भुवया उंचावल्या. त्यांना दोनदा उडवत, काय झालं? म्हणून विचारलं...)
मी: काही नाही रे... मी सुज्याला बोल्लो की वनफोर्थ राईस पकके बर्तन भरा. त्याने विचारलं पक गया मतलब? मी म्हटलं मी झाकण उघडून राईसला जोक सांगितला. राईस पकला आणि भांड भरलं. आणखी ऐकवलं असतं तर भांड्याबाहेर आला असता वैतागून. नको... नको... मी पकलो... मी शिजतो...
अमित: (डोक धरून) अरेSSS... काय वाईट्ट होतं हे...
(एक लंSSSबी खमोशी... आणि मग आमचं 'ह'च्या बाराखडीतलं हसणंखिदळणं...)
आपला,
(पकाऊ) सौरभ
Posted In
संवाद
|
6
प्रतिक्रिया
|
Subscribe to:
Posts (Atom)