Showing posts with label baal kidhar hain?. Show all posts
Showing posts with label baal kidhar hain?. Show all posts

राबर्ट दाल इधर हैं, बाल किधर हैं?

10 March 2010 वेळ: Wednesday, March 10, 2010
बाहेर राहायला लागल्या पासून "विशेष" खाण्या-पिण्याच्या जागांचा शोध लागला! शोध कसला आला, निव्वळ ट्रायल एण्ड एरर ने एक एका जागेची चव कळत गेली.

जेवणात केस नाही असा कधी होईल का?

बस तर हि ब्लॉग एन्ट्री अश्याच एक-सो-एक (बऱ्या वाईट) जागांना अर्पित केलेला!

सर्व प्रथम आम्ही कुठल्याही भावना मनात न ठेवता, बर्याच ठिकाणी आमच्या खळग्या भरायला गेलो. मग कधी चायना-हिल, तर कधी गोविंद चायनीज. शेगाव ची कचोरी, कोंढवा बाजारातली कचोरी, अनारसे चा सामोसा, कि लौ कॉलेज रोड ची मैग्गी असो.

१) माझ्या रूम वर नित्य-नेमाने डब्बा पोहचवणारे आमचे पप्पू काका, त्यांचा दावा होता कि कोणीच त्यांच्या बायकोचा हात (स्वयपाकात म्हणायचं असेल त्यांना) धरू शकत नाही! (आता माझी मराठी कच्ची, मला वाटला काकांची बायको पेहलवान असेल! आणि लाटणं फिरवण्यात थोडी पारंगत असावी. ह्याच भीतीने मी त्यांच्या "हातचं" जेवण रोज गोड मानून खाल्लं. वरण कितीही पातळ असलं तरी खपवून घ्यायचो. कधी कधी वरणात फोडणी दिल्यागत एखादा केस यायचा! हे सगळे केस मी रोज जेऊन उठल्यावर एका रिकाम्या काड्यापेटीत ठेवायचो. जाते वेळी काकांना सप्रेम भेट म्हणून देईन म्हंटल.

तसं पप्पू काका रोज संध्याकाळी डब्बा पोहचवायला आले, कि मग निवांत बसून बार लावायचे. "श्श्शश्श्श्श अरे काय सांगू, तुमच्या काकूंच्या हातचा मासा काय असतो. काय....असा खरपूस तळते कि खाताना असा विरघळला पायजे!" काकांना नेहमी तिखट लागल्यागत श्शशशश करत बोलायची सवय होती. मग रविवारच्या कोंबडीच्या जागी मासे करा म्हंटल, काका लगेच तयार झाले! पहिल्या रविवारी एकदम फक्कड मालवणी पद्धतीचे कालवण आणि १ बांगडा तळलेला. वाह! मज्जा आया!!

पुढचे २ रविवार पोटात मासे पोहायला सोडले! ३र्या रविवारी सुरमयी आणि बोंबलाच कालवण येणार होतं. काही कामा निम्मिता मी पण घरा बाहेर पडलो. परत येताना मित्रा बरोबर एक तंदुरी हाणायचा बेत ठरला. जवळच्याच गोपी - नॉन वेज मध्ये एक कोपरा पकडला. आता कोंबडी यायची वाट बघत असतांना, एक ओळखीचा अवज कानावर पडला. "एक सुरमयी फ्राय, बोंबील अच्छा हय क्या? हा, फिर एक प्लेट बोंबील कालवण देना. उसमे रस्सा झ्यादा डालना." मागे वळून पाहिला तर आमचा पप्पू काका! आरेय्च्या, ह्यो तर लायी मोठा पोल-खोल झाला! त्या दिवशीचा बेत पण उत्तम होता! काही दिवसांनी मीच त्यांना परत कोंबडी किंव्वा अंडा भुर्जी चालेल म्हणून सांगितलं. काकांनी का? विचारला नाही, आणि मी कधी काही विचारला नाही!

अश्या बऱ्याच हातच्या "दाल" खाल्ल्या, पण ह्या "दाल" मध्ये काय "काला" होतं कोणास ठाऊक.

२) मागच्या महिन्यातली गोष्ट. कोंढव्याच्या बाजारातून जात होतो. तशी वेळ पण दुपारचीच होती. भुकेने आमच्या खळग्या वाजू लागल्या होत्या. म्हंटला थोडी जिलबी हादडावी! बढीया गरमा-गरम जिलबी हाणली, तोच शेजारच्या दुकानातल्या कचोर्या दिसल्या! आता जिलबी खाऊन तोंड गोड गोड झालं होतं, म्हंटला तोंडी लावायला कचोरी घेऊ! पटकन त्या दुकानात जाऊन, परातीला खालून हात लावत विचारलं, "गरम नाही का?" समोरून उत्तर आलं "नही, गरम नही मिलेगा. ये तो कल शाम का तला हुआ है|" मी नीट त्याच्या चेहर्यावर वेडसर झाक दिसतेय का बघितले. साला आयुष्यात इतका इमानदार, खरं बोलणारा प्राणी पहिल्यांदा बघितला. मी ती कचोरी तशीच सोडून दिली. जिलबीच आपली खरी मैत्रीण!

मध्यंतरी एक वेळ अशी आली होती की चायनीज म्हणीन तिकडे खारट! बहुतेक सगळे नेपाळी बांधव एक दांडी यात्रा संपन्न करून आले असावेत. चायना हिल मधल्या मेन्यू मध्ये वेज्ज, नॉन-वेज्ज आणि "साल्ट" अशी वाढ झाली होती.

असेच अनेक अनुभव घेत घेत आम्ही खाण्यासाठी जगत आहोत! कधी कोणाच्या "दाल" मध्ये "बाल" असतो, तरी कधी कधी आख्खी दाल काळी असते.


AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates