मी लिहतोय एक चित्र! (Mi lihtoye ek chitra)

09 December 2009 वेळ: Wednesday, December 09, 2009
परीक्षा संपली पण जाग्रणाची सवय पडली ती पडलीच. कधी तरी असाच मूड येतो, आणि मग फ्ट्टा-फाट्ट कागद-पेन चा जुगाड लाऊन मग कंटाळा येई पर्यंत खरडत बसायच. मग कधी जास्तीच चेव चढला तर मग एखाद्या टेबल लॅंप चा पण जुगाड होऊन जातो. आज ही असाच काही मूड आहें, पण फरक इतकाच - कागदाच्या ऐवजी "क्विलपॅड" आहे.

*****

अचानक आज धो धो पाऊस आला. रेनकोट नसल्याने फजीती झाली. वैज्यनाथ चा चहा संपला आणि बसल्या बसल्या रस्सयाची आठवण झाली. (घोंगडी घेऊन पावसात फिरण्याची मज्जाच और आहे!)

*****

पुणे-सातारा महामार्ग -४ वर, खेड पासून एक १० कि. मी. पुढे एका धाब्यावर फक्कड गावरान कोंबडी मिळते. पुढे एक टेकाड आहे. ३०-४५ मिनिटांचा चढ आहे. वर पोहचल्यावर वस्ती दिसेनाशी होते. थोडी सपाट जमीन. मग मात्र गर्द झाडी चालू होते. वर सर्पणाची काही कमी नाही. पावसाळ्यात साचलेल्या चिख्लाच्य डाब्क्यात्ली माती उन्हात छान भाजून निघाली होती. त्यातच आम्ही आमचे सर्पण आणून रचले. डोक्याखाली जॅकेट घेऊन वर स्वच्छ आकाशाकडे टक्क लऊन पडून राहण्यात काय मज्जा सांगू, आणि आश्यात २-४ रान-डुक्रानी पीछा पुरवला! आहा हा! एका चुटकीत्त कोंबड्या पचतात.

*****

दोनच रंग अस्तित्वात असावेत. कण्सा-सारखा पिवळा आणि आकाशी नीळा. वाळू सर्वत्र. ह्या प्रचंड वाळवंटात मोठ-मोठाल्या भिंती - पांढर्या- शुभ्र. एक- एक भिंत २० फुट तरी असावी. आत नाजूक नक्षीकाम आहे. खिडक्यात रंगीत काचा बसवल्या आहेत. एका मोठया कमानी खालून आत गेल्यावर, बर्‍याच लोकांची गर्दी होती. अचानक एक लहान मुलगा माझा हात धरून मला ती जागा दाखवू लागला.

त्याची सांगण्याची पद्धत पण वेगळीच होती. सगळ्या गोष्टी मला गाण्यातून सांगत होता. उजवीकडे एक चर्च होत.
मी आत वळणारच तोच त्याने माझा हात ओढत मला पुढे नेले. आत प्रवेश करण्यास एक वेगळा दरवाजा होता. लगेच चुक लक्षात आली.

परत एकदा गीत-भट्कन्ती सुरू झाली. आत लाकडी बकड्यावर बसलो. समोर बाइबल ची एक प्रत ठेवली होती. समोर एका कठड्यावर मेण्बत्त्या लावल्या होत्या. लोक कठड्यापासुन ३ पावला मागे येत आणि मग आपली प्रार्थना म्हणत.

सहज समोरच्या बाइबलच्या प्रती कडे हात गेला. पहिले २-३ पानं काही वेगळीच वाटली- ही प्रत १६८० सालची होती!!

तितक्यात समोर चा एक पदरी मोठी पाऊल टाकत जवळ आला, आणि हळु आवाजात पुट-पुट्ला -

मी त्याला समोरची प्रत दिली. त्याने ती उघडली. लगेच मिटून - दुसरी प्रत पाठवून देण्याचा शब्द दिला.

बाहेर निघालो तर एका कोपर्‍यात एक प्रदर्शन लावले होते.

लहान घड्यॅळापासुन ते मोठल्या घड्याळापर्यंत - फक्त एकच साम्य होत. सगळ्यांमधे आत्यंत सुरेख असे पेंडुलम बसवले होते. वेग-वेगळ्या संगीत वाद्यच्या आकाराचे घड्याळ बनवले होते. त्यांचे रंग ही फार आकर्षक होते.

सर्व प्रदर्शन बघून बाहेर पडलो, तर लख्ख सूर्यप्रकाश पसरला होता. शिशीराच्या झाडाला नवीन पालवी फुटली होती, वाळु ची जागा आता काळ्या मातीने घेतली होती.

*****

ताज्या कॉफी चा सुवास नाकात दर्वळ्तोय. अजुन ही हवेत गारवा आहे. जमिनीत ओलावा आहे. ओल्या मातीचा वास येत का नाहीए? गवताचा वास येतोय. डोळ्यासमोर एक आकृती आली. एक बाटली काढून त्यातून वेनिला चा वास येणारं द्रव्य माझ्यावर ओतु लागला. अचानक दुखं कमी झाला. मॉर्फिन ने त्याचे काम केले होते. आता सगळे धूसर दिसत होते. मला कोणी उचलून नेत होते.

इकडे रंगच नाहीयेत. बर्‍याच आकृत्या दिसताय्त् इकडे. सगळे तरंगत आहेत. इकडे डाइमेन्षन्स नाहीयेत. ना प्रखर उजेड, ना सावली. काहीच हालचाल नाही, कुठलाच हाव-भाव नाही. एक नीर्विकार भावना घेऊन इकडे वाट पाहत होते. पुढे काय?

*****
पहिल्यांदा सायक्ल चालवायला शिकलो, तेव्हा किती तरी वेळ ड्ग-मगत् , सावरत - धडपडत ........एका नंतर एक टांग मारत तोल सांभाळत...... कधी बॅलेन्स डावीकडे, तर कधी उजवीकडे. जो पर्यंत बॅलेन्सिंग ची जादू अवगत होत नाही, तो पर्यंता निव्वळ केयोस असतो. बॅलेन्स करणे जमले की मग सगळे कसे एकदम सुरळित होते. आयुष्यात पण बॅलेन्स करायची छडी मिळे पर्यंत केयोस असतो. नंतर त्याला "सेट्टेले" झाला असे म्हणतात.

*****

रात्रभर लिहल्यावर, ०४:०० वाजता सायकल घेऊन दूरवर फिरवून आणायची. घरी येऊन सगळ्यात मोठा कॉफी मग भरून कॉफी बनवावी. तो मग घेऊन टेरेस वर एखादी उंच जागा बघून बसावे. शीळ वाजवत, कॉफी चाखत, सूर्योदय बघत दिवसाची सुरवात करावी.

*****


अश्या रित्ये निद्रहीन रात्र ही सरते, आणि स्वतःला वेळ देऊन, आपले वैचारिक घोडे खुल्या मैदानात रपेट करून आणल्याचा आनंद ही होतोच म्हणा!

1 Responses to मी लिहतोय एक चित्र! (Mi lihtoye ek chitra)

  1. सौरभ Says:

    "आयुष्यात पण बॅलेन्स करायची छडी मिळे पर्यंत केयोस असतो. नंतर त्याला "सेट्टेले" झाला असे म्हणतात."

    वाह!!! खास एकदम... बरं झालं तु प्रत्येक चित्र वेगळं केलं ते. अन्यथा आधी फार गोंधळात टाकणारं होतं.

    आणि निद्राहीन रात्र काय, वैचारिक घोड्यांची खुल्या मैदानावर रपेट काय.... अरे लग्न झालेल्या वैराग्यासारखा काय बरळतोय्स??? तरी सांगितलं होतं गर्लफ्रेंड ह्या व्यक्तिपासून लांब रहा...

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates