नविन वर्ष २०१० च्या शुभेच्छा

10 January 2010 वेळ: Sunday, January 10, 2010
हम्म्म... मला माहितीये शुभेच्छा द्यायला मी जरा उशीरच केलाय ते. नविन वर्ष २०१० चा एक आठवडा उलटूनसुद्धा गेलाय. माझ्यासाठी कोणतही वर्ष, वर्ष नसून एक मोठ्ठा दिवसच आहे. १२ महिन्यांच्या घड्याळाचा. प्रत्येक नविन वर्ष हे एका नविन दिवसासारखं असतं. डिसेंबरची रात्र सरलेली असते. त्या रात्री पाहिलेली स्वप्न साकार करण्याचा संकल्प आपण जानेवारीच्या गार पहाटे करतो. आणि ते पुर्णत्वाला आणण्याची धावपळ फेब्रुवारी-मार्चच्या सकाळी सुरु होते. मेच्या दुपारी थोडी विश्रांती मिळते. जुलै-ऑगस्टची भिजवणारी हळवी संध्याकाळ असते. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दिवेलागणीच्या वेळी गणेशोत्सव, ईद, नवरात्री साजरी करतो. नोव्हेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या फराळांचं जेवण आणि थोडं मनोरंजन करुन पुन्हा डिसेंबरच्या रात्री झोपायची तयारी... असो. तसं नविन वर्ष जेव्हा अगदी उंबरठ्यावर असतं तेव्हा आपण सगळेच नविन वर्षाचे जुने संकल्प पुन्हा नव्याने बांधायचा, सरत्या वर्षाचा आढावा घ्यायचा प्रयत्न करत असतो. मीपण तसा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, जरा वेगळ्या पद्धतीने.

घड्याळात ००:००:०० चा ठोका पडला आणि ३१ डिसेंबर २००९ सुरु झाला तेव्हापासून ते ठीक ००:००:०० ०१/०१/१० चालू होईपर्यंत; त्या २४ तासात दर २ तासांनी मी फेसबुकवर माझं स्टेटस बदलत होतो. ते प्रत्येक २ तास २००९ सालाच्या एका महिन्यासाठी राखिव होते. त्या त्या महिन्यातल्या आठवणींची नोंद घ्यायचा एक साधा छोटासा प्रयत्न होता. त्याला काही प्रतिसाद मिळाले. आणि त्या आठवणींच्या नोंदी आता माझ्या साठवणीत आहेत. :)

---------------------------------------------------


---------------------------------------------------

३१ डिसेंबरचे शेवटचे ४५ सेकंद्स खरच लक्षात राहण्यासारखे आहेत. आर्चिस, गौरव, रोहन, कुशल NYC ला फिरायला गेले होते. आम्हाला परवडेबल नव्हतं म्हणून ७१६(अपार्टमेंट)चं बाकी पब्लिक मी आणि सुजय १४००(अपार्टमेंट)ला गेलो होतो. तिकडे सौरभ(दुसरा), अंकुश, अभिषेक, कुक्की(कृतार्थ) होते. रात्री ऑनलाईन गेमसेशन चालू होतं. आम्ही अगदी त्यात बुडून गेलेलो तेव्हढ्यात...

अंकुश: भाईयो, २००९का आखरी मिनट बचा है|

हम्म्म्... (बाकी सगळे)

अंकुश: देखो लास्ट ४५ सेकंद्स रह गये है न्यू इयर के लिए...

सुजय: अरे (फुल्ल्या फुल्ल्या)में गया न्यू इयर...

एका क्षणाचाही विलंब नं लावता, डोळे तसेच लॅपटॉपच्या स्क्रिनमधे गाडलेले आणि अजूबाजूच्या जगाचं सारं भान विसरुन गेममधे पुर्णपणे घुसलेल्या सुजयचा रिस्पोन्स ऐकून आम्ही खोखो हसायला लागलो.

अभिषेक: वाह... क्या स्वागत किया है| वो २०१० दरवाजेके बाहर होगा तो डर जायेगा| फुलटू दहशत...

नंतर सगळ्यांनी त्यांचे त्यांचे लॅपटॉप बाजूला सारले. सामूहिक काउंटडाऊन सुरु झालं.

१०...९...८........३...२...१... हॅप्पी न्यू इयर (टाळ्या, आरडाओरडा, गळाभेट, हस्तांदोलन...) झाल्यावर एक छोटासा छानसा चॉकलेट केक कापून आम्ही न्यू इयर साजरी केलं. कुक्कीने NYCला होत असलेल्या न्यू इयर सेलिब्रेशनचं लाईव टेलिकास्ट जरा उशीरा चालू केलं म्हणून शिव्या खाल्ल्या. बॉलड्रॉप होऊन गेलेला. आम्ही आमचे NYCला गेलेले मित्र गर्दीत कसे उभे राहून काय करत असतील ह्याचं अतिवाईल्ड इमॅजिनेशन करुन खिदळत होतो. काय माहित पण त्यावेळी फालतू जोक्स फुटत होते आणि आम्ही वेड्यासारखे १५-२० मिनिटं लोटपोट हसत होतो. एकंदर नविन वर्षाची सुरुवात हसतखेळत झाली.

(: ...wish you एकदम HAPPY वाला NEW YEAR... :)


आपला,
(शुभेच्छुक) सौरभ

4 प्रतिक्रिया

  1. Aakash Says:

    Besht compile kelay!
    wachta-na majja aali.

  2. ओके, मी नाहीये तुमच्या फेसबुकवर पण...डिसेंबर मध्ये मी तुमचा ब्लॉग वाचणं सुरु केले आणि काही पोस्ट्स खुप आवडल्या... आता रेग्युलर भेट देत असतो :) नविन वर्षाच्या शुभेच्छा!

  3. सौरभ Says:

    @Anand: ;) thank you very much :D... u can add me on facebook... if u play Mafia Wars thn do add me... lol... :P

  4. I just quit playing mafia wars from this year... :( , anyway let me find you out..

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates