बऱ्याच महिन्यांपुर्वी मेघनं ईमेलमधुन एक व्हिडिओ पाठवला होता. "Can Arjuna do this?" अश्या शिर्षकाच्या त्या व्हिडिओमधे एक लवचिक अंगाची तरुणी हातावर उभी राहुन पायाने धनुष्य पकडून अचुक निशाणा साधते.
हा व्हिडिओ बघुन महाभारतातला द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग जरा वेगळ्या पद्धतिने रंगवला होता. तो असा...
(आग्री/गावठी टोन मधे वाचावे.)
(प्रसंग: द्रौपदी स्वयंवर)
(तर रंगमंचाचा पडदा उठतो...)
द्रुपद: तर बालान्नो, मला माज्या पोरीचा लगीन लावाचा हाय. म्हनून तुम्हा समद्यांना हिकरे निमंत्रन दिलय. मी माजी पोर द्रौपदी तिच्या हातासकट तुमच्यापैकी एका शुराला देनार हाय. पन माजा एक पन(अट) हाय. ज्यो कोनी (वर टांगलेल्या गोलगोल फिरणाऱ्या मास्याकडे हात दाखवत) ह्या मच्छिचा डोला फोरुन दाखवल त्याच्यासंग माज्या पोरीचा लगीन लावून देनार. पन त्ये करताना तुम्हाला म्होरच्या श्टुलावर उलटा होऊन हातावर उभा ऱ्हावा लागल. आनी येका पायाने धनुष धरुन दुसऱ्या पायानं बान मारावा लागल.
(पब्लिक मधे गडबड गोंगाट चालू होतो)
(इकडे पांडवांमधे चर्चा चालू होते. खुपवेळ डिस्कशन झाल्यानंतर)
युधिष्ठिर: काय मग अर्जुना, बाला जानार का रं तु? येतो का डोला फोरुन?
अर्जुन: च्या*** काय नसती उठाठेव चाल्लीये. आम्ही काय शर्कशीतून आलोय का? इकडे बायको वरण्यासाठी आलोय की तमाशा दाखवायला? आनी येवरी नाटक करुन पन काय होनार? साला मी एकट्यानं करामत कराची आनी लगीन मात्र ५ जनांचा.
युधिष्ठिर: ए भौ, कर की लेका. जा बाला जा.
अर्जुन: ये दादा मी नाय करनार बरं का. ये बालांनो, चला उठा. द्रौपदी नको आपल्याला... त्यापेक्षा दुसऱ्या पोरी बघु. कमीतकमी समद्यांची तरी लग्न होतील. प्रत्येकाला त्याची त्याची बायको मिलल. चला तुमच्या आता.... अय द्रुपद... दुसरा कोनी बघ रं तुज्या पोरीसाठी... चाल्लो आम्ही... टाटा...
(हळूहळू सगळी सभा रिकामी होते... द्रौपदीच्या हातातली वरमाळा तशीच असते, द्रुपद खिन्नपणे सिंहासनावर विचारात गढून जातो... आणि मासा तसाच अबाधित गरगर फिरत राहतो.)
(पडदा पडतो...)
आपला,
(बाल्याकोली) सौरभ
हे..हे..हे... वाचुन मजा आली.
mastach
जीवनमूल्य
haha!! waah bandopant! Loltoye ajun.......
:D Thnx Anand & Vikram...
@विक्रम: तुमचा ब्लॉग एकदम भारी आहे... लय आवडला
@आक्याबोक्या: जुने ईमेल्स/चॅट चाळत असताना मिळाला... खुप मजा येते राव :)
hahaha ekdum bhari re!!!!
२-३ वर्षापूर्वी हा व्हिडियो पहिला होता.. पण बघून तुझ्यासारखा असा काही विचार मनात आला नाही... तुझ्या बुद्धीची दाद द्यावी तितकी कमीच मित्रा!!!
बापरे.. अरे बुद्धीची दाद कसली राव. रिकामटेकडे उद्योग आहेत ते. काम नसलं की ही अशी मस्करी सुचते.
अरारा लय वंगाळ झाल बघ, पांडवा द्रौपदी न वरताच गेले....
@सचिन: अशी करामत करायला सांगितली असती तर नक्किच वेगळं महाभारत घडलं असतं. :P