आम्ही रसिक

17 April 2010 वेळ: Saturday, April 17, 2010
वेळ: रात्री साधारण १:३०-२:०० वाजताची. भुरजी-पाव चापुन टेबललॅम्पच्या मंद पिवळ्या उजेडात निवांत बसलेलो. G-पॅट बेडवर आडवा झालेला. डॉक्टरच्या फोनवर ऋतु-हिरवा अल्बममधली गाणी वाजत होती. ऋतु हिरवा... ऋतु बरवा... पाचूचा वनी रुजवा... आशा भोसले यांनी स्वर छेडले. निरव शांततेतलं ते वातावरण मंतरलं गेलं, कशाने तरी भारावलं गेलं...
G-पॅट(डोळे मिटलेल्या समाधी अवस्थेत): अरे, केवढा गोड आहे आशा भोसलेचा आवाज. श्श्या...
मी(तल्लीन होऊन): म्हणजे अस्वस्थ व्हायला होतं, एवढा गोड कसा काय असू शकतो! अशक्य...
डॉक्टर(हसत): असं वाटत आशा भोसलेला मिठी मारुन पप्पी घ्यावी, एवढा गोड आहे अरे...
(हे ऐकून मी आणि G-पॅट "!!!!!" भावना पोचल्या... आशा भोसले रॉक्स्झzzz!!! she is the most versatile and talented and greatest singer in world.)
हा किस्सा झाल्यावर नकळत गप्पांमधे कवितांचा (मुलगी नव्हे) विषय निघाला. "निवडुंग" चित्रपटातील ग्रेस ह्यांनी लिहलेल्या गाण्यांवर चर्चा झाली. ग्रेस ह्यांची गाणी मला abstract category मधली वाटतात, समजून न समजल्यासारखी. डॉक्टरने मला त्यांच्याबद्दल एक फार छान किस्सा सांगितला. हॄदयनाथ मंगेशकरांच्या कार्यक्रमाला तो गेला होता तेव्हा त्यांनी तो ऐकवला होता. ग्रेस ह्यांच्या "ती गेली तेव्हा रिमझिम" गाण्यात एक ओळ आहे "ती आई होती म्हणूनी, घनव्याकुळ मीही रडलो". हॄदयनाथांनी जेव्हा ह्या ओळीबद्दल ग्रेसना विचारलं तेव्हा ग्रेस ह्यांनी एक कथा सांगितली. ती अशी...
एक माणुस रोज संध्याकाळी एका टेकडीवर नगारा वाजवत असे. आणि तिकडे एक मेंढीचं पिल्लू त्याला बघुन रडायला लागे. एकदा असेच होता तो माणुस त्या पिल्लाजवळ जातो आणि विचारतो की मी नगारा वाजवायला घेतो तेव्हा तु रडतोस का? तुला आवडत नाही का माझं नगारा वाजवणं? तेव्हा ते पिल्लू त्याला म्हणतं मला तुझ्या नगाऱ्यातलं काही समजत नाही, पण मला एवढच माहितीये की त्या नगाऱ्याचं जे चामडं आहे ते माझ्या आईच्या कातडीपासून बनवलय...
बास्स... हे ऐकून मी सुन्न झालो. काय समजायचं ते समजलो. एका, फक्त एका ओळीमागे एवढा गहन विचार असू शकतो!!!??? मग अजून एक समजलं ग्रेस ह्यांच्या कविता मला कधी समजल्याच नव्हत्या आणि त्यांच्यामागील गोष्ट कळल्याशिवाय त्या समजणारदेखिल नाहीत.

आपला,
(रसिक) सौरभ

5 प्रतिक्रिया

  1. Aakash Says:

    waah!! ti geli la aaikaycha navinach rasta disla!
    Ani ayushyat ha dusra rasik doctor mahitit padla!!

  2. व्वा, क्या बात है. सहीच ग्रेस!

  3. सौरभ Says:

    हो, एवढे विचार, एक गोष्ट मोजक्या शब्दात मांडू शकणारे थोर प्रतिभावंत, ग्रेस... गाण्याच्या त्या ओळीचा अर्थ कळल्यावर पुन्हा ते गाणं ऐकून एक वेगळाच अनुभव येतो.

  4. अनघा Says:

    हे तुझे डॉक्टर मित्र कसले डॉक्टर आहेत? ग्रेस यांनी सांगितलेली गोष्ट सुन्न करणारी आहे. आणि ते गाणं देखील तसंच आहे.

  5. सौरभ Says:

    हाहा.. एवढा आदरार्थी संबोधण्याइतका मोठा नाही. :D तो डेंन्टिस्ट आहे. इकडे MBA in Health Managementचा विद्यार्थी. निवडुंग मधली गाणी अफलातुन आहेत.

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates