रविवारी सकाळी वेर्सोव्याला कोळीवाड्यात कॅमेरा फिरवायला नेला होतो.
विले-पार्लेला लोकल थांबली असतांना हात आणि नझर स्वस्थ राहत न्हवते.
ह्यांनी कॅमेरा कॉन्शियुस न होता फोटो काढू दिले. पण जाते वेळी प्रश्न केला, "कुठल्या पेपर ला येईल?" आता मात्र माझी फजिती झाली. आजोबांच्या हातात कुठला तरी कानडी पेपर होता. मग मी पण ठोकून दिलं "हिंदुस्तान टाई्मस्".
तरी माझ्या नशिबात लगेच सुटका न्हवती. शेजारी मोसंबीचा रस विकणाऱ्या भैय्या कडे बोट दाखवून "ह्याचा आता पर्यंत २ वेळा पेपराला फोटो येऊन गेलाय, अजून एकदा येऊन जाऊ देत!" मग लगेच भैय्या ने चुना - तंबाखू काढून, तंबाखू मळायला घेतला! वाह, दादांनी कुठली पोझ द्यायची, हे पण ठरवलं होतं तर! खचाक्क :D
माटुंग्याला एक लाकडी थडगे मिळण्याचे ठिकाण दिसलं. बाहेरची पाटी, त्या खाली रचून ठेवलेली फुलं.......पाटीवरील मजकुराचे २ अर्थ निघत होते! फोटो कसा काढावा ह्या प्रश्नात असतांना आतल्या भिडूने एक फुल-गुच्छ घेऊन एक पोझ दिली, मी परत माझं काम केलं. खचाक्क!
शेवटी माटुंग्याच्या सिटी लाईट मार्केटला पोहचलो! आता मासे खरेदी मध्ये तजुर्बा दांडगा झालाय.
बाजारात गेल्यावर काय करावे -
मासेवालीला कुठले प्रश्न विचारावे, कुठले विचारणं टाळाव -
हात लाऊन "माल" चाच्पुन्न बघा. आज कुठले मासे आहेत, काय भाव आहे, असले प्रश्न विचारलेले चालतात.
"ताजे आहेत का?" असा प्रश्न चुकून पण विचारू नये. हा प्रश्न फारच अपमानास्पद असतो. एखाद्या पोरीचा बघण्याचा कार्यक्रम चालू असेल, आणि कोणी चोम्ड्याने जर विचारलं "का हो हिचं चाल-चलन सरळ आहे का हो?" हे जसं अपमानास्पद वाटतं, त्या पेक्षा हजारो पटीने जास्ती अपमानास्पद प्रश्न म्हणजे -"का हो, मासे ताजे आहेत का?" एक वेळ तुम्ही त्या मासेवालीला तिचं वय विचारा, वजन विचारा......खपवून घेतल्या जाईल.
मच्छी बाजारात जाताच, लगेच मासे घेऊन बाहेर पडण्यात मज्जा नाही.
आधी सबंध बाजार फिरून घ्यावा. कान देऊन मासेवालींच्या बोलण्याची ढब आत्मसात करून घ्यावी.
मग जिकडे मनासारखे मासे दिसतील, तिकडे कोळीवाडा हेल काढून बोलायचं. जास्ती काही अवघड नसतं, थोडा लाडावून बोलल्या सारखं वाटतं पण तरी मज्जा येते.
एखादा मास्याचा तुकडा खाली बसलेल्या मांजराच्या पिल्लाला टाका.
आणि एक दुसर्याबद्दल वाईट सांगणाऱ्या मासेवाल्यांपासून लांब रहा. कारण दोघी पण वाट्या मध्ये हात मारतात.
excellent re bawa... kamaliche khass aaleyt saglech photo.. seriously mumbai wasool kartoyes!!
मस्त आहे. धम्माल केलीस!
अजोबांचा फोटो अतीखास... आणि भैय्याचा फोटो २दा :O कशाबद्दल??? मनसेकडून २दा फटकवला गेला का??? =)) आणि तो "बावडी"-पैलवान कसलं पात्र आहे अरे!!! मावशींना तु त्यांचा फोटो दाखवलास की नाही? तुला दोन वाटे नक्की जास्त दिले असते. खरंच खुप मस्त भाव टिपलेत...
धन्यवाद मिहीर, हेमंत आणि सौरभ!
आरे तो बावडी पेहलवान तर सलमान सारखा शर्ट काढून पण फोटो काढून घ्यायला तयार होता, पण मग तो फोटो झूलॉजी च्या पाठ्यपुस्तकात झळकला असता!
आणि मासे वाल्या मावशींना फोटो काढल्या काढल्या कॅमेर्याच्या मेमरी मधून फोटो दाखवला. पुढच्या रविवारी प्रिंट घेऊन जाईन. कारण मासे वाली खुश तो बोंबील पचास!
sarv pic mast aahet n post lihnyachi paddhat aavadli
baki ak te comments word verification yete te band karta ka ugach tras hoto