(दगडूने काल एक लेख माझ्या ब्लॉग साठी contribute करायचा शब्द दिला होता! इतक्या लवकर लेख तयार करून दिल्या बद्दल आभार आणि शुभेच्छा! दगडूचे इतर लेखन वाचण्यासाठी > dynamic22 < क्लिक करा! )
मासाहेब ! मासाहेब ! कुठे आहात तुम्ही ?
काय झाले शिवबा ! का उगा त्राहीमाम करताय ? पुन्हा का ४०० वर्षां पूर्वी
सारखे कासावीस होताय ? आता आहे ना महाराष्ट्रात सर्व ठीक ?
मासाहेब कसले ठीक? मराठवाड्यात मराठा नाही, महाराष्ट्रात मराठी बोलायला
मावळा आज लाजतो, बाई हा अपशब्द झाला आहे, जिजाबाई , सईबाई , ताराबाई
तर आज घाटी नावे आहेत, आणि.........
शांत राजे; शांत व्हा , हे काही नवीन आहे का ? गेली ३०० वर्षे आपण हेच
पाहत आलोय ना . तुमचा मावळा आता भेकड, षंढ , पार नपुंसक झाला आहे ! हे
काय नवीन आहे का ?
मासाहेब ! असे तीक्ष्ण उद्गार नका काढू माझ्या मावळ्यांसाठी , ते थोडे
भटकलेत त्यांची वाट.मग शिवबा तुम्ही एकदम असे आज कासावीस का ?
मासाहेब, भीती वाटते. आज रायबा ने खबर आणली आहे , म्हणे दादासाहेब
फाळके यांनी प्रस्थापित केलेल्या चित्रनगरीत म्हणे आमच्या जीवनावर आता
एक नाही तर ३-३ चित्रपट काढणार आहेत.
अखेर आली जाग आणि जाण , ज्या शिवबा मुळे हिंदवी सुराज्य उभे राहिले,
दिल्लीचा तक्त शाबूत राहिला, हिंदुच्या माना पुन्हा ताठ झाल्या, ज्या
शिवबा मुळे उभ्या महाराष्ट्राने भारत पोसला , अखेर आली आज त्यांना जाण
खूप उपेक्षा केली त्यांनीतुमची . आम्ही आज आनंदात आहोत. पण मग तुम्ही का
का असे ?
मासाहेब, छत्रपतीचा तक्त आम्हाला भुरळ नाही घालू शकला, कर्म हाच होता
ध्यास, तर ह्या चित्रपटावर आम्ही का गर्व शोधू ?. अजिबात लोभ नाही ह्या
कार्यात, भीती तर काही औरच आहे .कसा ही असला तर अजून महाराष्ट्र आम्हाला
विसरला नाहीये. भले ५वि ६वि च्या इतिहासात आमचे धडे आहेत, जे पुढे
सर्वच विसरतात, पण लक्षात नक्की ठेवतात आम्हाला. आज ही आमच्या नावाचा
अपमान सहन नाही होत त्यांना. आता तर ३ चित्रपट काढणार आमचे नाव म्हणजे
स्वतःची जहागीर आहे , असा समज आहे काही राजकीय संस्थांचा, स्व स्वार्थ
साठी कुठल्या हि थाराला जातात. ह्या संस्था वाट पाहत असतात स्वताचे
अस्तित्व धाखाव्न्या साठी, त्यांन हे चित्रपट म्हणजे एक सुवर्ण संधी ना
? आता पासूनच चर्चा चालू आहे, कोण म्हणे तो संजय दत्त ज्याने ९२ साली
मुंबई मध्ये स्फोट घडवणार्यांना मदत केली तो आमचे पात्र करणार पडद्यावर !
राजे ! करून दे कि, त्याने काय तुमचे शौर्य कमी थोड़े का होणार ?
तसे नाही मासाहेब, त्याने वा और कोणी हि करावे आम्हास परवा नाही, पण
ह्या ज्या राजकीय संस्था आहेत त्या हि बाब चालू देतील का ? कोणी म्हणते
अबू आझमी ला औरंगजेब करा, शाहरुख ला शाहिस्ता खान , सलमान ला अफझल खान
करा, ही अशी आता पासून हिंदू मुस्लीम विभागणी सुरु आहे . हेच का आमचे सुराज्य?
शिवबा तुम्ही केले तुमचे कर्तव्य , आता महाराष्ट्र आहे मराठी माणसाकडे.
आपण काही नाही करू शकत.
असे का म्हणता माँसाहेब ? आमच्या अंगाची अजून ही लाही लाही होते,
असे हि विभागणी पाहताना, उद्या हीच मंडळी अख्खा महाराष्ट्र पेटवून लावतील
ह्या चित्रपटा पायी , ह्या संस्था चिथावणीखोर भाषणे करणार, भोळा मावळा
तो, पेटून उठणार आणि सर्वत्र करणार जाळ पोळ, एकूण काय नुकसान माझ्या
महाराष्ट्राचे. माँसाहेब हे आम्ही ४०० वर्षानंतर हि नाही पाहू शकत .
मग घ्या परत जन्म !
कसे घेऊ, प्रत्येक जण म्हणतो शिवाजीने जन्म घ्यावा पण शेजारच्या घरात.
आता सर्वच असे म्हणत आहेत, त्यामुळे तो शेजार अस्तिवात येतच नाही , कोणतीच
मराठी स्त्री आमच्या साठी मातृत्व स्वीकारत नाही आम्हाला गर्भात कोणीच
धारण करून घेत नाही माँसाहेब.
शिवबा असे हताश नका होऊ, श्रींची इच्छा आपणास काय ठाऊक, सर्व ठीक होईल
असा विश्वास ठेवू.
दगडूने योग्य मुद्दा उपरोधिक शब्दात मांडला आहे
अगदी असेच घडेल पुढील काही दिवसात असे चित्र दिसत आहे
@आकाश लिंकसाठी धन्यवाद
धन्यवाद विक्रम. अरे, तू सुचवल्या प्रमाणे ते वर्ड वेरीफिकेशन बंद केलंय! आता भरगोस प्रतिक्रिया येऊ द्या!!
लगे हात मी पण दगडूच्या ह्या लिखाणवर आपली प्रतिक्रिया नोंदवतो:
"आमचे नाव म्हणजे
स्वतःची जहागीर आहे , असा समज आहे काही राजकीय संस्थांचा, स्व स्वार्थ
साठी कुठल्या हि थाराला जातात"
ह्याचा आता पर्यंत अनुभव घेतला होता, पण ह्या ओळींची गाठ अशी काही पडेल वाटला न्हवता!
@akash
Thnx :)
वा मस्तच लिहिलंय !!! खरं आहे थोड्या वर्षात हेच दिसणार आहे!!!
कदाचित याहून भयाण स्थिती असेल... :(