बंड्या: काय???
गुंड्या: ह्यावर्षी गणपति कधी होते???
बंड्या: ११ सप्टेंबरला.
गुंड्या: आणि गेले कधी???
बंड्या: २२ ला...
गुंड्या: आज तारीख काय???
बंड्या: ६ ओक्टोबर...
गुंड्या: बरी लवकर आठवण झाली तुला फोटो टाकायची...
बंड्या: अब्बे, फोटो आत्तातर मिळालेत.
गुंड्या: गेल्या वर्षाच्या गणपतिंचे फोटोपण आत्ता मिळाले का???
बंड्या: ... हे बघ... (उम्म्म्) ... (अम्म्म्म्) ... त्यावेळी मी ब्लॉगिंग नव्हतो करत. आता उगीच डोक्याच्या झांजा नको वाजवूस... गुमान फोटो बघ...
गणेशोत्सव २००९
गणेशोत्सव २०१०
बंड्या: अर्रे गुंड्या, लेका ते आपलं गाणं लाव, "अशी चिक मोत्याची माळ", त्याशिवाय गणपति साजरा केल्यासारखं वाटत नाही यार...
गुंड्या: :) येक्दम बर्रोब्बर्र बोल्लाय्स... हे घे... :D
गुंड्या: :) येक्दम बर्रोब्बर्र बोल्लाय्स... हे घे... :D
बोला गणपति बाप्पा... मोरया... मंगलमूर्ती... मोरया...
आपला,
(बाप्पाभक्त) सौरभ
अरे सौरभ, मस्त!!! मूर्ती किती गोड आहे अरे!!! मोदक कोणी बनवले??? मला माहितेय परदेशात आपले सण एकत्र साजरे केले कि किती छान वाटतं! आणि ते गाणं टाकलंस ते एकदम छान झालं! सगळे आले माझ्या कम्प्युटरवर बघायला!! मस्त मस्त झाली पोस्ट!! :)
२००९ सालातील (सालातील!!! इंग्रजांच्या काळात गेल्यासारखं वाटत) नैवेद्य, मोदक (दिसल्यास इतर पंचपक्वान्न) सगळं (खरोख्खर बाप्पाशप्पथ) आम्ही बनवलय. ह्या वर्षी मित्राच्या आई आलेल्या, त्यामुळे खादाडीची धुरा त्यांनी सांभाळली. :)
solid!!!! :D
खरंच!!! मुर्ती छान आहे रे!! मला पण खूप आवडली.
ह्या वर्षी मी माझ्या गावचा गणपती मिस केला...हा पोस्ट बघताना त्याची नव्याने आठवण झाली.
:) श्रीराज, यार मला तर नाईलाजास्तव तीनचारदा गणपती दरम्यान घरापासून लांब रहावं लागलय. :( गणपती मला इतर कोणत्याही सणांपेक्षा जास्त आवडतो. :D
आयला तुझी पोस्ट बघून आठवलं...मलाही टाकायचेत आमच्या इथले फोटू! :)
:D अरे टाको टाको जल्दी टाको... तिकडका गणपती देखनेको हमभी उत्सुक है... :)
सही रे बंड्या.. ब्लॉग चालू केल्याचा उत्तम फायदा.. २००९ सालातले मोदक आणि नैवेद्यही भारी बरंका.. आमचा बंड्या हुशार आहे....
सौरभ , श्री गणेश मूर्तीच्या मागे एक आरसा ठेवून बघ ..! एकूणच आरास खूपच छान वाटेल अजून.
तुम्ही स्थापना केलेली मूर्ती खूपच `जिवंत' वाटतेय. आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेमुळे . हो न ?
@आनंद: :D धन्यवाद. हे सगळं मिळुन केलेलं आहे. सगळीच हौशी मंडळी आहेत इकडे. :)
@राजीव: पुढल्यावेळेस अशी आरास करायचा प्रयत्न करेन. आम्ही जे हाताशी लागेल किंवा इथे मिळेल ते जमवुन आरास केलेली. साधीच असली तरी आमच्यासाठी खुप सुरेख होती. जेवणाची पंगत बसवलेली. अगदी घरच्यासारखं वातावरण होतं. :)