शेंबड्या नाकाच्या आणि बोबड्या ओठांच्या कविता...

15 January 2011 वेळ: Saturday, January 15, 2011
शाळेत असताना मी काही कविता केलेल्या आणि एका वहीत लिहून ठेवलेल्या. ती वही सापडली. कविता वाचल्या तेव्हा भारी हसायला आलं. उगीच काहिही यमकं जुळवून कविता केल्यात. ह्या कविता पुर्णपणे विस्मृतीत गेलेल्या. वही मिळाली तशी लगेच स्कॅन करुन घेतली. ज्यांच्याबोवती तुटक बॉर्डर आहे त्या इतर कुठेतरी वाचलेल्या, आवडलेल्या म्हणून नोंद करुन ठेवलेल्या होत्या. तरी आयुष्यात जी पहिली कविता केलेली ती ह्यात नाही. पण माझ्या लक्षात आहे. अशी होती ती...

लहान बाळाला असते काय अक्कल
चड्डीचे सुटले असते त्याचे बक्कल
नीट नसते धड त्याची चप्पल
त्याला असते एक गोलगोल टक्कल
टकल्यात काय शिरणार अक्कल
म्हणून तो करतो साऱ्यांची नक्कल

बाकिच्यांची स्कॅन्ड कॉपी खाली देतोच आहे.




आपला,
(हाप चड्डीतला) सौरभ

8 प्रतिक्रिया

  1. Anagha Says:

    मला इतकं भरून आलंय ना अभिमानाने!!!! :) Am proud of you!!! :)

  2. सौरभ Says:

    :) :) :) हाहाहाहा... वर्गात बाईंनी शाबासकी द्यावी ना तसं वाटतय मला. मज्जा... :D :D :D

  3. Anagha Says:

    बाई फटके पण छान देतात! ये इथे!! :)

  4. Anonymous Says:

    Bhaarich ki Rao...

  5. सौरभ Says:

    @अनघा: हेहेहे... बाई फटके देणार असतिल तर कसला येतोय मी. :P ;)

    @गायत्री: ठेंकू ठेंकू :D

  6. Machafuko Says:

    hahaha!! waah bandya!! jhiklas!!
    layi diwsanni "durr se dekha" wachle rao!! >:D< Aaja Aaja Dil Nichode!!

  7. Shriraj Says:

    Sho Shweeeeeeeeeeeeeeeeeet!!!
    Saurabh, mazyakadun tula 10/10

  8. Deepti Says:

    hehehe very sweet!!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates