विदर्भ

24 March 2011 वेळ: Thursday, March 24, 2011
परत एकदा सेकंड क्लास स्लीपर कोचच्या एका साईड बर्थ वर तंगड्या पसरवून खिडकीतून येणारी हवा, दूर मावळता सूर्य बघत प्रवास!
ह्या वेळी बरोबरीला कौस्तुभ आणि आदित्य होते. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन पुढे काय सुचेल तिकडे जायचं ठरवलं होतं. ह्या वेळी खूप confusion झालं होतं. थंडी पण कडाक्याची होती. उत्तर
भारत फिरण्यावर इकडेच फुली मारलेली बरी, दक्षिण भारताचा मूड न्हवता. आता करायचं काय? सरते शेवटी वेळेवर जे सुचेल तिथे जाऊ. (निर्णय घेणं फक्त आपल्यावर आणि आपल्यापुरता असतांना, निर्णय घेणं सोप्पं वाटतं!)
वाटेत बडनेरा वर एक प्रवासी (साधारण आमच्याच वयाचा) आमच्या शेजारी बसला. मग सहज गप्पा सुरु झाल्या, त्याला सांगितलं कि आम्ही विदर्भ बघायला जातोये, एकदम खुश होऊन तो एक एक ठिकाणांचे नावं सांगत होता. तिथपर्यंत ठीक असतं हो. ह्या पुढे उत्साहानी लगेच laptop काढून, त्या वर फोटो दाखवले. किती हा उत्साह. मग त्याने सांगितला कि विदर्भातले रेल्वे स्टेशन जास्ती स्वच्छ आहेत. आम्ही मनात म्हंटला, "कमाल आये." यवतमाळ सारखी लाल माती कुठेच नाही. आम्ही मनात म्हंटला, "कमाल आये." कुठल्या पानपट्टी वर खर्रा चांगला भेटतो हे हि ज्ञान आम्ही घेतलं. संत्रा बर्फी कुठून घ्यावी, सावजी पद्धतीचं मटण कुठे चांगला भेटतं. आमच्या ज्ञानात भर पडो किंवा न-पडो, आपल्याला तर हा man आणि त्याच्या पाहुणचार खूप आवडला! जाता जाता त्याचे आभार मानले.
त्याने विचारलं, "तुम्ही नागपूर मधे राहणार कुठे आहात?"
मी, "इकडे माझं घर आहे!"

चंद्रपूर होऊन ताडोबाला जातांना, वाढत्या प्रदूषणाचा चेहरा बघितला. राखेचे डोंगर, आणि खोदकाम चाललेल्या खाणी. ह्या प्रदुषणा विरुद्ध आवाज उठवल्यास, तुम्ही उन्नती मध्ये अडवणूक करताय हा समाज दिल्या जातो. भकास शहर आहे अगदी. कुठे हि नझर फिरवा, आणि तुम्हाला धूर ओकणारी चिमणी दिसेलच. दाताळला जातांना एका नदीला लाल पाणी आहे. एकूण परिस्थिती बघून एकच निष्कर्ष काढता येतो, इथल्या लोकांची सहनशीलता खूपच जास्ती आहे.(तसं सगळ्याच भारतीय नागरिकांची सहनशीलता कौतुकास्पद आहे!) शुद्ध हवा नाही, शुद्ध पाणी नाही, ना धड रस्ते, ना २४ तास वीज, तरी लोक तडजोड करून घेतायत. आपण सगळेच तसे तडजोड करण्यात पटाईत आहोत. मुंबईकर गर्दीशी तडजोड करतो, पुणेकर बेशिस्त वागणुकीशी तडजोड करतो, कोल्हापूरचा पुरेपूर कोल्हापूर वर तडजोड करतो (हा उगाच मारलेला टोला होता). आपल्याला कितीही कठीण परिस्थितीत टाकलं, तरी आपण तडजोड करून एखादा मार्ग काढतो. ती परिस्थिती बदलण्यासाठी वेळ कुणाकडे? ती जवाबदारी नक्की माझीच कशी नाहीये, हे पक्कं ठाऊक असतं आपल्याला. असो....एकूण आजूबाजूचा माहोल बघून डोकं भडकलं.

ताडोबाला शालिक जोगवे नी आमची सोय करून ठेवली होती. सकाळ संध्याकाळ सफारीवर जायचं अन संध्याकाळी परत आल्यावर शालिक बरोबर गप्पा रंगायच्या.
मग जंगलातल्या गोष्टी, आणि तिथल्या गावातली माणसं हा आमचा विषय असायचा.

तसं ह्या वेळी आमच्या नशिबी वाघ न्हवता. (कदाचित मागच्या वेळी ८ वाघ बघितले, म्हणून कोटा भरला असावा) पण इतर प्राणी चिकार दिसले. तसं पण माझ्या १८-५५ च्या लेन्स वरून काही landscapes घेतले.
वाघ नाही दिसला म्हणून मग असा प्राणी शोधून काढला, जो आम नजरेत नाही. आम्हाला आमचा प्राणी मिळाला. स्पॉट करायला काही वेळ लागत नाही. आता आमच्याकडे news होती!

आम्ही आज "Treeshrew" बघितला!! शालिक आणि इतर माहितीगार लोकांना विनोद समजला, इतर सगळे फसले! आता कोणी विचारूच देत कि ताडोबाला काय बघितलात, आम्ही लगेच उत्तर दिलं असता > "Treeshrew"

(पुण्यात रूम मेट्स वर हा प्रयोग केला, यशस्वी ठरला! तुम्ही बघितला आहे का हो treeshrew?)
कौस्तुभ आणि आदित्य मग पुण्याला गेले. मी पण विचार केला, इकडे आलोच आहोत, तर मग हेमलकसा, भामरागड, आनंदवन, सेवाग्राम बघून परत यावं. काही दिव्सांखाली मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा ह्यांनी लिहलेली एक पुस्तिका वाचली होती - "मेंढा (लेखा) - The village that declared that 'We have our government in Delhi and Mumbai, But in our village we ourselves are the government.'

ठरलं तर मग. मेंढाला जायचं.

गडचिरोलीला जातोये, ऐकून आजी - आबांनी जरा टेन्शन घेतलं. मी म्हणतो, उगाच बदनाम करून ठेवलाय गडचिरोलीला. छोटंसं शहर आहे. इतर विदर्भातल्या शहरा सारखं हे हि एक.







आपला,
(विदर्भीय) माचाफुको

2 प्रतिक्रिया

  1. Shriraj Says:

    माचाफुको, प्रवास वर्णन एकदम फंटॅस्टिक झालंय :)

  2. मुंबईकर गर्दीशी तडजोड करतो, पुणेकर बेशिस्त वागणुकीशी तडजोड करतो...... आपल्याला कितीही कठीण परिस्थितीत टाकलं, तरी आपण तडजोड करून एखादा मार्ग काढतो. ती परिस्थिती बदलण्यासाठी वेळ कुणाकडे? ती जवाबदारी नक्की माझीच कशी नाहीये, हे पक्कं ठाऊक असतं आपल्याला. असो....:(

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates