पुण्याला जातांना कर्जत ते लोणावळा ट्रेनच्या दारात उभा राहून हवा खात उभारायला मला आवडतं.
आज दारात एक पोऱ्या बसला होता. अवतार बघून वाटत होतं, ह्याने अंघोळ करून २-३ आठवडे झाले असावेत. अंगात एक jacket घातलं होतं. दारात बसून नखं कुरतडत बसला होता.
मी जाऊन उभा राहता, त्याने मागे वळून विचारलं, "भैय्या आपको आगे उतरना हैं क्या?"
मी नाही म्हणून मान हलवली. "आप कहाँ तक जा रहे हैं?", मी पण मग विचारलं.
"पूना" उत्तर आलं.
मी पुन्हा हवा खात होतो.
थोडा वेळ असाच सरला. थोड्या वेळाने संकोचित होत मला विचारलं, "आप पूना में पढ़ते हैं?"
मग मी पण त्याच्याशी बोलू लागलो.
बोलण्यातून कळलं कि त्याचं पण नाव आकाश होतं. आकाश वाणी.
पण भाईनां प्रेमात धोखा भेटलेला, आणि घरी भावा बरोबर कसलीशी अन्न-बन्न करून हयंनी घर सोडून पळून जायचा मार्ग धरला होता.
आणि अपूर्ण शिक्षण झाल्याने आता नौकरी पण नाही. बिचारा सगळीकडून हारला होता. त्याच्या बोलण्यातून कळलं कि ह्याने २ दिवसांपासून काही खाल्लं नाही.
इकडे तिकडे वडे-वाला बघितला आधी, नेमका एक वडे वाला दिसला नाही. मग आईने बांधून दिलेले २ पराठे त्याला खिलवले.
२-३ घास खाऊन मग "घर का स्वाद" आठवला त्यांना.
आता ह्यांच्या समस्या माझ्या समोर उभ्या, अन त्यातल्यात आपली बाजू मांडलेली.
शिवाजी नगर ला उतरतांना त्याला पण उतरवला, तो पण शांत पणे उतरला, माझ्या मागे मागे आला.
त्याला त्याची जवाबदारी पूर्ण कर - असले उपदेश पाजले.
शेवटी काय बोलावं सुचत न्हवता. एक सिगरेट पाजली.
त्याला गेल्या २ दिवसाच्या त्याच्या उपाशी पोटाने मला काय बोलायचं होतं हे ताडलं.
मग, मला त्याच्या गावी येण्याचं आमंत्रण पण मिळालं. माझा नंबर लिहून घेतला.
"गाँव पोहोचते ही आपको कॉल करेंगे!!"
..... नक्की कॉल कर रे मित्रा.....
आकाशा!!! बेस्ट माणूस आहेस तु. मला खरंच समजत नाही की अशी माणसं तुला भेटतात की तु अश्या माणसांना भेटतोस ज्यांच्याकडे बाकी कोणी लक्ष देत नाही... but I'm proud of you. :)