यशवंतची आणि माझी ओळख म्हणजे, रविवारी दुपारी २ वाजता मोहोल्यात घंटी वाजली रे वाजली कि एखादी कुल्फी खायला मी हाक मारायची. बोलण्यातून यशवंतभाऊला माझ्या भटक्या स्वभावाचा अंदाज लागला. गेल्या आठवड्यात, यशवंतभाऊने टीप दिली कि - १ मे (रविवार) रोजी त्यांच्या गावात उरूस आहे आणि २ मे रोजी कुस्त्या होणार आहेत.
तिकडे यशवंतला हो तर म्हणून टाकलं, पण नेमकी आपली परीक्षा तोंडावर आलीये ह्याचा विसर पडला.कुस्तीचे प्रकाश चित्र काढायला मला अधिक मजा येईल असा वाटला. म्हणून मग सोमवारी जायचा ठरलं. गावात यशवंतने आमची पुरेपूर मेहमान नवजी केली. त्यांनी तर घरी जेवायचा बेत आखला होता. पण इतका वेळ काढणं हि शक्य न्हवता. तसा हिवरे गावातला अनुभव, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सामान्य गावांप्रमाणे हे गाव. आपुलकीने वागवणारे लोक इथे पण आहेत. पण गेले २ दिवस सुरु असलेल्या उरूस मुळे गावात रौनक आली होती!
मना सारखे फोटो मिळाले.
माचाफुको, बाकीचे फोटो कुठेत?? और आने दो मियाँ... :)
@ saurabh: mi pan tech vicharnar hoto