माझा एक विद्यार्थी होता सारीश. अभ्यासात गग्याचा लहान भाऊ शोभेल असा. तरी नशीब त्यांचा गग्या फक्त गणितात होता म्हणून. आताच आमचा सारीश बारावी पास झाला.
असो....
तर गोष्ट अशी आहे कि सारीशच्या धाकट्या बहिणीचा नाव आहे सांची.
सांची सुरेख नाचते. मध्ये ई-टी.व्ही मराठीवर तिचा नाच दाखवण्यात आला.
पण दोघं कितीही सदगुणी असले, तरी बहिण - भावाची नोक झोक कोणी टाळली आहे काय?
आता दररोज शिकवतांना मधेच सांची उर्फ मैनावती (मैने सारखी मान हलवत खूप चुटूर-चुटूर बोलते म्हणून हे नाव ठेवलं) येऊन सारीशच्या वाईट वर्तनांचा पाढा वाचून जायची. तिची इच्छा असायची कि मी सारीशला रागवावं, एखादा फटका द्यावा. (त्या लहानग्या पोरीला काय माहिती department - department मधला फरक.... )
म्हणून मी पण लगेच उपाय सुचवला, कि तिने मला ह्या सगळ्या तक्रारी कागदावर लिहून द्यायच्या आणि मग त्या वाचून मगच शिक्षा फर्मावल्या जाईल. अन सोबतच ह्या तक्रारींच्या प्रत्येक पानासाठी एक टॉफी देण्यात येईल. माझ्या मते लहान मुलांना व्यस्त ठेवण्य साठी त्यांना अश्या टास्क दिल्या कि त्यात ते गुंतून बसतात, थोडक्यात तुम्हाला त्या पोराची भुण भुण नाही ऐकावी लागत.
त्या दिवसाचा तास, अगदी छान शांतीत गेला. अभ्यास अगदी छान झाला. घरी जायला निघालो तो, सारीशची तक्रार चिट्ठी माझ्या हातात. पहिले सर्व तक्रारी वाचून तर मी भौचाक्का झालो.
बाप्पा काय हि जालीम दुनिया .....तुम्ही पण वाचून बघा, कदाचित तुमचे पण डोळे पाणावतील.
(मैनावती तशी लहान आहे, त्यांच्या 'pelling ' मिष्टेक ला Kindly Adjesht करा!)
हि पानं मी मैनावतीच्या डायरी मधून स्मगल करून आणली होती. सौरभला कधी दिली मला हि लक्षात नाही. अन आता थोड्या वेळ पूर्वी अचानक हि २ पानं नित नेटके स्कान होऊन माझ्या मेल मध्ये होते!
आई आई गं!!!
हेहे!!
मयनावाती अधून मधून टी.व्ही वर दिसत असते.
ई-टीव्ही मराठी, आणि दूरदर्शनवर त्यांच्या ग्रुपचे डान्स शो दाखवतात.