A well-wisher, obviously wish the best possible things for you but also is the one who always thinks something bad might happen to you and worries about you...
Damn... I don't want to be a well-wisher anymore...
AKS = "A"akash "K"etaki "S"aurabh. This blog is actually combination of three different blogs by Aakash, Ketaki and Saurabh.
A well-wisher, obviously wish the best possible things for you but also is the one who always thinks something bad might happen to you and worries about you...
Posted In
सुचलं ते लिहलं
|
7
प्रतिक्रिया
|
Posted In
सुचलं ते लिहलं
|
8
प्रतिक्रिया
|
Posted In
खाऊगल्ली
|
5
प्रतिक्रिया
|
Posted In
जुळलेली यमकं,
सुचलं ते लिहलं
|
|
|
2
प्रतिक्रिया
|
|
7
प्रतिक्रिया
|
Posted In
कोकण क्रिडा
|
6
प्रतिक्रिया
|
Posted In
जुळलेली यमकं,
सुचलं ते लिहलं
|
|
Posted In
द्रविडी प्राणायाम
|
16
प्रतिक्रिया
|
Posted In
द्रविडी प्राणायाम
|
8
प्रतिक्रिया
|
कॅमेरा आदल्या रात्रीच सज्ज करून ठेवला होता. सूर्योदय पाहण्यासाठी खूप गर्दी लोटली होती. एका मेक्सिकन फोटोग्राफरने आपली किट सरकवून मला जागा बनवून दिली. मग एक एक क्षण टिपण्याचा कार्यक्रम सुरु केला. सूर्य अजून उगवायचा होता, पण रंगांचा खेळ सुरु झाला होता. आता कॅमेरा आपली कामगिरी अगदी चोखपणे बजावत होता. हळू हळू माझं लक्ष गर्दीतल्या लोकांकडे जाऊ लागलं. कुणी सहस्त्र सुर्यानाम म्हणण्यात गुंग होतं, तर कोणी सूर्यस्तोत्र. माहोल तयार झाला होता, चीफ गेस्ट सूर्याची सगळेच वाट बघत होते, आणि तोच समुद्राच्या लाटांवर खेळणारी त्याची पहिली किरणं दिसली! माझ्या शेजारी असलेलं म्हातारं जोडपं आनंदात टाळ्या वाजवत होतं. एखाददोन शिट्ट्या पण पडल्या! वाह काय नजारा होता! मी पण मग उल्हासित होऊन अजून जोमाने फोटो काढू लागलो. तुम्हाला सांगतो, ह्या पूर्वी अनेकदा डोंगरदऱ्यांमधून सूर्योदय पहिला होता, पण ह्या सूर्योदयची काही वेगळीच मजा होती. काय माहोल जमला होता. वातावरणात जल्लोष पिकलेला, भारताने क्रिकेट विश्वकरंडक जिंकावा असा जल्लोष! मी पण मग रपारप्प फोटो काढून सूर्याला चिअर-अप केलं.
इकडे लोक सूर्याला ओंजळीत घेतल्याचा आभास करून देणारे फोटो, फोटोग्राफरकडून काढून घेत होते. एकाने मला विचारलं एक फोटो का कितना म्हणून. हसून त्याला मी इकडे सूर्योदयाचे फोटो काढायला अलोये सांगून पुन्हा एकदा कॅमेरामधून बघू लागलो. "भाईसाब, क्या आप हमारा फोटो निकाल के देंगे?",पुन्हा तोच माणूस. च्याआयला इकडे सूर्योदय सोडून ह्याच्या परिवाराचे कसले फोटो काढू, शॉट आहे हा माणूस. मी तिकडून कल्टी मारून दुसरीकडे गेलो.
मनसोक्त फोटो काढून आता, मी परत निघालो. इकडे कोळ्यांच्या होड्या येत होत्या. पकडलेले मासे आणून समोर मांडायचे, आणि त्यावर मग बोली लागे. इथे बांगडा - आयला या नावाने ओळखल्या जातो, आणि सुरमईला सिला म्हणतात. मास्याला, मीन म्हणतात. इकडे मीनचा सौदा होत असतांना, मीपण काही फोटो घेतले. कोळ्याचे हावभाव खुशाल होते, आज चांगली किंमत मिळत असावी त्याला. बघता बघता एक एक क्रेट विकला जात होता. आपल्या डायरीत नोंद करून ठेवणारा चीफ कोळी खूपच गडबडीत होता. त्या गजबजाटात मी संपूर्णपणे दुर्लक्षित होतो. कोणी कॅमेरा कॉन्शियास नसल्याने, मनाप्रमाणे portraits मिळाले.
संध्याकाळी सूर्यास्त बघायला, बस स्थानकापासून ३-४ किलोमीटर पुढे आलो. बरेच फोटो घेतले. पुन्हा एकदा रंगांच्या खेळात सुर्यानेच बाजी मारली. या सामन्यात मी इतका गुंग झालो होतो, कि मला परत जाण्यासाठी काही साधन मिळेना. ३-४ किलोमीटर तसं फार मोठं अंतर नाही, पण आता पायपिट करायचा मलाच कांटाळा आला होता. तितक्यात, बसस्थानकाच्या दिशेने जाणारी एक दुचाकी येतांना दिसली. मी लिफ्ट मागितली. गाडी थांबली, आयला लई दिवसांनी लुना बघितली! साला पण माझा वजन झेपेल का तिला? मी ८० किलो अन् चालवणारा ६०एक किलोचा असेल. त्याला माझी शंका विचारली, तर नुसता हसला! तसा रस्ताच उतार होता; म्हणून माझा वजन potential म्हणून तिकडे कामी आलं! उद्या सकाळी साडे-पाच वाजताची जयंती एक्स्प्रेस पकडून पुण्याला रवाना व्हायचा प्लान होता.
Posted In
द्रविडी प्राणायाम
|
4
प्रतिक्रिया
|
Posted In
द्रविडी प्राणायाम
|
3
प्रतिक्रिया
|
इकडे मलबारी बिर्याणी चांगली मिळते म्हणून ऐकिवात आलं. मग एक बिर्याणी हाणून, पुढे 'मेनका'ला जाणारी बस पकडली. आज इथल्या Jawaharlal Nehru Stadiumवर इंडिया-ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना आहे! गर्दीचं हे हि एक कारण असावं. Broadway म्हणजे पुण्याचा लक्ष्मी रोड म्हणता येईल. वेगवेगळ्या गोष्टी विकणारी दुकानं होती. मसाल्यांचे डोंगर रचून ठेवले होते. एका दोघांनी मला पत्रकार समजून आपल्या दुकानात असलेल्या प्रत्येक मसाल्याची ओळख दिली!![]() |
| फोर्ट कोचीमधील रस्ते |
त्याचा एक मित्र पुढे एका restaurant मध्ये बसला होता. वाटेत, आम्हाला एका मल्लू सिनेमाचं शूटिंग बघायला मिळालं. राजर्षी थेट शूटिंगच्या सेटवर जाऊन फोटो काढू लागला! त्याच्या गळ्यात लटकणाऱ्या त्याचा आय-डी बघून कोणी अडवलं नाही. मी पण त्यात हात साफ करून घेतला! ऍन्जेलिका नावाची कोणी नवीन हेरोईन होती. Restaurant मधे राजर्षीचा मित्र त्याची वाट बघत होता.![]() |
| राजर्षी |
Posted In
द्रविडी प्राणायाम
|
7
प्रतिक्रिया
|
AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates