आज आपण प्रसाद काय असावा - हा विषय छेडू या!
प्रसादात च्युईंग गम असणं जरुरी आहे.
तीर्थ म्हणून फळांचा रस किव्वा दही उत्तम.
नैवेद्य विशेष करून चिकन अथवा मटणाचे प्रकार असावेत (देवाजींचे आवडते)
देवाजींचे आवडते शाकाहारी पदार्थ असे दिसले नाही कुठे आम्हाला, पण आम्हीच सहमती देतो तुम्ही छानशी बटाट्याची भाजी (वरून कोथिंबीर भुर्काव्लेली) आणि पुरी हा नैवेद्य दाखवावा.
प्रसादाचा आस्वाद घेतल्या नंतर कॉफी नक्की प्यावी. (लहान मुलांनी दूध आणि शराब्यांनी आयरिश कॉफी)
धुम्राकाष्टिका एका वेगळ्या डबीतून पेश करावी, आणि चिलीम वर मजल मारू नये. ताबा ठेवायला शिका.
नैवेद्याच्या ताटा खाली, नुकतंच ठरलेलं भारतीय रुपयाचं चिन्ह पाण्याच्या बोटाने काढावं. (हो ते चिन्ह पण देवाजींच्या नावातील पाहिलं अक्षर लक्षात घेऊन निवडलं आहे)
मग त्या चिन्हावर नैवेद्याचं ताट ठेऊन, त्या भवती पाणी फिरवावं.
"ॐ नमो रजनिदेवोः नमः"
चा उच्चार करून प्रसाद ग्रहण करावा.
सरते शेवटी चुईंग गम वाटून पूजा गोड करावी.
>> हो ते चिन्ह पण देवाजींच्या नावातील पाहिलं अक्षर लक्षात घेऊन निवडलं आहे)
हे लय लय भारी होतं !!
फक्कड... देवाजींच्या नावाने चांगभलं...
(चिंगम च्यांव च्यांव च्यांव च्यांव)