स्त्रियांसाठी रजनी व्रताचं सोवळं -
लहान मुलींसाठी:
लांब पायघोळ लेहंगा, दोन वेण्या, कपाळावर अंगारा, आणि व्रताचे १२ दिवस मोठ्या समजूतदार म्हातारीच्या तोंडचे वाक्य फाड फाड बोलत राहणे. (लहान मुलींसाठी इतकाच सोवळं पुरे)
मुलींसाठी (वय वर्ष १८ ते २८):
तोकडे कपडे! स्कर्ट मात्र बेंबी खाली घालणे. (तुमच्या रुंदीचा विचार करू नका. (स्ट्रेच मार्क्सचा पण विचार सोडा)
अर्धा चेहरा झाकल्या जाईल असा गॅागल घालणे (दिवस असो कि रात्र)
कानात काना पेक्षा मोठी झुमके. वागणूक मात्र अगदी अल्लड असावी.
थोडक्यात कल्पना आलीच असेल. आणखीन लिहायची गरज मला वाटत नाही.
तरी तुम्हाला असले तोकडे कपडे घालणं लईच वंगाळ वाटत असेल, तर
चक्क-मक्क साडी, कडक तकडबंद वेणी आणि पैंजण, बांगड्यांची कमी पडू नये.
हा पोशाख वय वर्ष ४० पर्यंत घालू शकता.
चेहऱ्यावर मात्र विनम्रता ओथंबून वाहणारी असावी.
काही झालं (बरं-वाईट) कि रजनीकांत समोर डोळ्यात अश्रू आणून हात जोडून नमस्कार करणे.
४० च्या पुढील स्त्रियांनी चक्क मक्क साड्या नेसण्याची हौस विसरून, सोबर साड्या नेसावया.
आणि लहानग्यांवर रजनी भक्तीचे संस्कार करावे :)
तसं पाहता स्त्रियांसाठी काही कडक नियम नाहीयेत, पण तरी तुम्हाला त्यात काही भर टाकायची झाली तर जरूर टाका.
पण वर दिलेले नियम मिनिमम requirement आहे.
=)) minimum requirement... hihahaha...