अपेक्षा आणि निप्पत्ती

03 October 2011 वेळ: Monday, October 03, 2011

दोन-तीन दिवसांपुर्वी राजीव काकांनी बझ्झवर एक गोष्ट पोस्ट केली होती. ज्यात एक कमाल भारी कुत्रा, खरेदी करून बस मध्ये बसून आपल्या घरी जातो. ह्या कुत्र्याचा पाठलाग करत दुकानदार, त्याच्या घरी पोहचतो. तिकडे पाहतो, तर कुत्र्याचा मालक त्याच्या कुत्र्याला बडवत असतो. कारण विचारल्यावर मालक म्हणतो, "ह्या आठवड्यात हा तिसऱ्यांदा घराची चावी घेऊन जायला विसरला आहे." गोष्ट संपते, आणि मग moral of the story, salary axiom आणि law of employment.

तुम्ही ही ओळ वाचताय म्हणजे, तुम्ही त्या कुत्र्याच्या गोष्टीशी सहमत आहात.
आपण कधी कुत्र्याची जागा घेतो, तर कधी त्या मालकाची. परिस्थिती कुठली ही असो, disappoint आपण होत असतो.

आपल्या अपेक्षा आणि निप्पत्ती कधीही सहमतीने राहू शकत नाही.



Fig.001
Fig.002
आठवी-नववी मध्ये गणितात "SETS" नावाचा धडा होता. ह्या सेट्सच्या मदतीने अपेक्षा आणि निप्पत्तीची तुलना करून पाहू.

आपल्या अपेक्षा (Expectations) - E, निप्पत्ती (Results) - R, आणि U = युनिवर्सल सेट.

आपल्या अपेक्षा आणि निप्पत्ती जितके जास्ती जुळतात, त्याच्या सम प्रमाणात आपल्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. हिरव्या रंगाने, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जोडला आहे.
आपण आपल्या भाबड्या मनात, नेहमी आकृती ००२ रंगवून फिरत असतो. निप्पित्ती पेक्षा नेहमी आपल्या अपेक्षा कमी ठेवल्याचा भास देत असतो.

 शाळेतले दिवस आठवतात. पेपर कितीही चांगला गेला असेल, तरी सगळ्यांना सांगतांना, "ठीक गेला" असं सांगतांना स्वतःची तयारी करत असतो.
 "सोप्पा गेला" असं म्हंटलं असता; ९०/१०० मिळाले तरी, मनात कुठेतरी काटा टोचत राहतो. सोप्पा पेपर असूनसुद्धा १० गुण कमी पडले. अश्या परिस्थितीत कोणी १० गुणांचा हिशोब मागितला की खच्चीकरण होतं.

काही दिवसांनी जाणीव  झाली, आपण यंत्र नसून, माणूस आहोत. आकृती ००२ ची परिस्थिती यंत्र-मानवासाठी  आहे. तरी यंत्र मानवला काय माहिती आनंद म्हणजे काय असतो.
Fig.003


आपण नेहमी आकृती ००३ घेऊन झटत असतो.
निप्पत्ती आणि अपेक्षा थोड्याफार जुळतात. मन खट्टू होण्यामागचं कारण विशेष म्हणजे नेमकं तुमची ती "विशेष" अपेक्षा हिरव्या क्षेत्रात नसते. तसेच, तुमचे Efforts (E) ही निप्पत्तीशी फार थोड्या प्रमाणात जुळत असतात.

आपली अपेक्षा नेहमी आकृती ००४ ची असती, ज्यात तुमच्या अपेक्षा, निप्पत्ती आणि तुम्ही त्यात टाकलेले efforts हे सगळे सारखेच असते, तर राजा मिडास पण रोज तुमच्या घरी येऊन तुमचे पाय धुऊन जाईल.

Fig. 004
नशिबाला दोष देणारे आकृती ००३ शी निगडीत असतात. संपूर्ण मानव जात आकृती ००३ वरच असते.

पण खरंच ह्यात नशिबाला दोष देण्यासारखं काही नाहीये. आपली परिस्थिती जर आकृती ००१/००२/००४ सारखी झाली तर आपल्या गती मधली सुसंगतता बिघडेल.
Fig. 005
अश्या परिस्थितीत अपेक्षा, निप्पत्ती आणि एफर्ट्स ह्यांच्यात समान तोल आपल्यासाठी त्यातल्या त्यात उत्तम ठरेल (म्हणजेच आकृती ००३).

आता आकृती ००३ ही आपल्यासाठी सर्वात योग्य आहे, ह्या निष्कर्षावर आपण पोहचलो आहोत.
आता नेमकी तुमची "विशेष" अपेक्षा हिरव्या क्षेत्रात नसली तर तुमची निराशा होणार हे निश्चित आहे. ह्यावर इलाज म्हणून एकतर आपल्याला अपेक्षेच्या  सेटचे क्षेत्रफळ कमी करून, E1, E2, E3, E4 मध्ये वर्गीकरण करता येत (आकृती ००५). ह्यालाच आपण इंग्रजी मध्ये "setting multiple goals" म्हणतो. आता E1, E2, E3 आणि E4 मध्ये प्राधान्याने एक एक करून आपले E क्षेत्र Y मध्ये बदलू शकतो. ह्याला आपण rectification म्हणू.

Rectification करतांना काही मोजके सेट्स असल्यास ठीक आहे. कमी वेळात जास्ती सेट्स असल्यास नतीजा उलटू शकतो. उपाय म्हणून आपल्या क्षमते इतके सेट्स करणे.मात्र तुमच्या "विशेष" अपेक्षे चा एक विशेष सेट करायला विसरू नका. आता नक्किच तुमची "विशेष" अपेक्षा हिरव्या रंगत आली असणार आहे, अन् तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद फिरून परत आला आहे!



0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates