photo: www.mumbaitheatreguide.com |
तसं बघितलत तर एखाद्या नाटकाचा review लिहण्याची माझी औकात नाही.
बऱ्याच वर्षांपूर्वी "ध्यानी मनी" नावाचं एक नाटक येऊन गेलं.
बस इतना स ख़ाब ह्याच नाटकाचं हिंदी रूप म्हणा!
"बस इतना सा ख़ाब"चा सडे-तोड अभिनय आणि अप्रतिम पटकथे मुळे मला राहावल्या नाही गेलं.
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हे हिंदी नाटक, माझ्या नझरेत तरी कुठे हि कमी पडलं नाही.
शेफाली शहा आणि किरण करमरकर ह्यांनी अभिनयात खोट दाखवण्यासाठी जागा शिल्लक ठेवली नाही.
तसेच कथेचे मूळ लेखक प्रशांत दळवी ह्यांना पटकथेच्या संपन्नतेचे श्रेय जाते.
थोडं उलगडून सांगायचं झालं तर,
कथा म्हणजे एक socio-psychological thriller म्हणून अहवाल वाचला होता.
शेफाली शहा ने फारच सुरेख आई रेखाटली! नाटकाच्या सुरवातीला तिचा वागणं थोडं एकांगी वाटेल.
पण मोहितचा प्रवेश झाल्यानंतर शेफालीच्या ह्या अभिनय पद्धतीचं समर्थन मिळतं.
मोहीतचा प्रवेश असा काही खास पद्धतीने केला आहे, अंगावर शहारा आल्या शिवाय राहत नाही.
कुठल्या हि पात्राच्या अभिनयात भडकपणा कुठेच दिसणार नाही.
body language , रोशणाई आणि पार्श्वसंगीत ह्यांचा ताळ-मेळ नीट बसला होता.
कदाचित असं असेल- एक सुंदर पटकथा, म्हणून अभिनयात खोट दिसली नाही.
अभिनयात खोट दिसली नाही, म्हणून रोशणाई आणि पार्श्वसंगीतात खोट दिसली नाही!
असो, माझा आग्रह आहे, तुम्ही हे नाटक झरूर पहा!
अरे हो, मोहित साठी भेट वस्तू घ्यायला विसरू नका!
*रहस्य आणि पटकथे बद्दल मुद्दामच लिहणं टाळलं. पुसटशीही कल्पना देऊन तुमचा रस भंग करण्याचा माझा हेतू नाही.
**नाटकरूपी कादंबरी मधे पण ती मजा नाही, जी नाट्यमंदिरात बसून नाटक बघण्यात आहे.
वाह वाह... हा कदाचित ब्लॉगवरचा पहिलाच review असावा... बघणेस हवे... शेफाली शहा बारीक झाली रे...