मिसळ -ए- मंग्लोरीय्न उर्फ mutant मिसळ

18 August 2010 वेळ: Wednesday, August 18, 2010
शीर्षक वाचून तोंडाला पाणी सुटलं असेल तर मनाला आवरा.  
आठवड्यातून एकदा तरी नाश्ता म्हणून मिसळ सुतवली पाहिजे - हे माझं मत. 
पुण्यात चांगली मिसळ 'हुडकावी' लागते. बादशाही, बेडेकर, रामनाथ आणि तत्समांना मिसळ म्हणजे नुसती तिखटाची भेसळ असं वाटतं. त्याचा लठ्ठा आपण नंतर कुटू.
असाच एकदा आमच्या आवडत्या अड्ड्यावर एकदा मिसळ मागवली!
लगेच समोर एक पाण्याचा ग्लास मांडला. थोड्याच वेळात समोर एक प्लेट मिसळ!! 
अहा!! 
बढीया कांदा बारीक चिरून, त्या वर लिंबाची फोड. फरसाण मोकळ्या हाताने टाकलेलं.
फरसाण च्या खाली, नायलॉनच्या पोह्यांच्या चिवड्याचा थर दिसला. 
तरी 'आपन' हिम्मत हरलो नाय ! 
मग चमच्याने एक घास घेतला. अरेच्या, चव वेगळीच वाटते. 
देवा!! रस्सा म्हणून सांबर टाकलाय! 
मग सांबर मधे ब्रेड "डुंबून-डुंबून" खाल्ली. 
मिसळ एवढी काही वाईट न्हवती, पण चांगल्या मिसळीच्या शोधात एक "mutant " मिसळ गावली!

तुम्हाला पण हि मिसळ खाऊन बघायची असेल तर,
आयुष्यात कधी मनात हि आलं नाही, कि सांबर असलेली मिसळ नशिबात पडेल.
शेवटी मिसळची ईमेज कायम ठेवण्या करता कल्पनाच्या मिसळची उपाधी काढून सांबर-चिवड्या वर आणून ठेवण्यात आली.
बाहेर निघतांना स्वतःचं सांत्वन करत होतो, "मिसळ न समजता हे खाल्लं तर हा एक अफलातून पदार्थ आहे!"
२ महिन्यांनी परत एकदा सांबर चिवडा खायला गेलो, अजून हि तीच चव बघून आनंद झाला! (माझ्या व्यतिरिक्त इकडे मिसळ मागवणारा कोणीच नसावा, या खुशीत सांबर चिवडा व्हरापला)

2 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    खतरनाक!!! हा प्रकार मी ट्राय करणाऱ्ये...

  2. bhushan Says:

    naad khula bhava... keep it up.. dev karo ase mutant padarth tula kayam khayala milot ... :)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates