मग मला हसू आलं -
सौरभ म्हंटला कि त्यांना एक मेल कर, आणि कळव.
मनात आलं मेल मध्ये लिहावं - "हम अभी तक जिंदा है"
मग म्हंटल असू देत कशाला उठा - ठेव. कुठलं मोठं साहित्य लिहलं आहे.
पण मग लक्षात आलं कि मी पण सौरभ, केतकी, दगडू, दीप्ती च्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय वाचून भारावून जायचो.
पुढे लिहण्यासाठी हुरूप यायचा.
मग लिहायला काही सुचत नसेल तर एखाद्या किस्स्याला फोडणी टाकून पोस्ट करायचो. (मी मसाला नाही बोललो, फोडणी बोल्लोये हे लक्षात घ्या)
क्यों ना - स्वतःच्याच एखाद्या अश्या पोस्ट च्या प्रतिक्रियेत लिहावं -
"काय टुकार लिखाण आहे"
स्वतःच्याच ब्लोग पोस्ट वर हे लिहायला माझ्या बापाचं नाव करमचंद नाही.
पण स्वतःच्याच एखाद्या पोस्ट चे धिंड काढायला मजा येईल नाही?
मग थोडासा अहंकार कुरवाळत, हळूच एखाधी हास्याची उकळी लपवत थोडी शब्दांची जुळवा जुळाव केली.
आणि किलिक केलं सबमिट.
मला माहिती नाही, कि मी हा पोस्ट का कंपोज करतोये?
कोणाची नावं टाकणार नाहीये, ना कोणाच्या ब्लॉगचे पत्ते. ना कुठले पुरावे, ना रजनी-देवा कडे शिकायत.
रोज एक पोस्ट टाकायचा चास्काच लागलाय जणू.
आज रजनीकांत बद्दल लिहून तेच ते पणा आला, म्हणून विषय-पालट केला.
मगाशी एकाचा रिप्लाय आला -
मग थोडी मेलांची (मेल चं अनेक वचन) देवाण घेवाण झाली.
कोण जाणे कदाचित आमची मैत्री पण होईल.
उद्या पासून त्याच्याही प्रतिक्रिया येणं चालू होईल.
वाट बघतोये रे मित्रा!!
प्रतिक्रिया देणाऱ्या प्रत्येकाकडे अश्या नाझरे ने बघू नये.......
आता मी काय कमेंटावे??? असो... पण बोलून काम झाले हे छान... जरुर उसकी आँखोमें सच्चाई होगी :D
Ankho mein sachayi wala bandya layi vishesh hota pan!!
आपण माझ्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पहाट असाल हे मी जाणतो...म्हणून आम्ही त्वरित लिहायला सुरुवात केले...
मी आपल्या ब्लॉगला पहिल्यांदाच भेट देत आहे...आताच आम्ही आपला ब्लॉग पूर्ण पाहिला...खरोखर अप्रतिम!!!
आपण पाठवलेल्या ह्या पोस्टबद्दलच्या लिंक मुळेच आम्हाला आपला ब्लॉग पाहता आला आहे!!! आणि हो या लिंक मुळेच आपले आता यापुढे चांगली ओळख पण होईल!
जसे मी आपल्यास आधी म्हटलो आहे की मला कोणाचेही मन दुखवायचे नाहीये!!!
आपल्या काही पोस्ट आम्हास आवडल्या त्या आम्ही पुन्हा नव्याने भर घालून आमच्या ब्लॉग वर टाकल्या आता ही गोष्ट चुकीचीच आहे असे सर्वांना वाटते आणि हो वाटलेच पाहिजे ना!!!!
पण मला इथे एक सांगायचे आहे जर एखादी ओरीजीनल पोस्ट जर थोडी बदलून पुन्हा चांगल्या पद्धतीने मांडल्यास त्यात काही गैर आहे असे वाटणे योग्य का?? नसेलच जर तिथे आपल्या ओरीजीनालीटी चा प्रश्न असल्यास!! उदा.रिमिक्स गाणे ()
विशेषत आपल्या कलेला अथवा आपल्या लिखाण कौशल्याला आम्ही भरभरून दाद देतो... आपल्या ब्लॉग लिखानासमोर आमचे त्यातील ज्ञान अजून खरोखर कस्पटासमान आहे(अतिशयोक्ती)...आम्ही अजून या ब्लॉग विश्वात नवीन आहोत...
एक गोष्ट महत्वाची सर्व ब्लॉग विश्वातील लेखकांनी आपल्या पोस्ट ह्या सुरक्षित ठेवण्यास जे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ना त्याचा वापर करावा आणि हो जर असे घडलेच तर आपण वापरलेली पद्धत योग्य आहे असे मला वाटते!
मला इथे प्रतिक्रिया करून कोणतीही लाज अथवा क्षमा मागावीशी वाटत नाहीये तर मी जे काही केले आहे ना स्वतावर येणारे हसू लपवित एक मराठी माणूस म्हणून एक चांगला मार्ग स्वीकारून आपले श्रेय आपल्यालाच परत करत आहे....
माझ्यासारखे असे बरेच जण असतीलच ना त्यांनीही हाच मार्ग स्वीकारून आपले कॉपिड पोस्ट सन्मानाने उडवून टाकावेत...
कळावे आपला मित्रच!!!