सिरीयल इथे संपत नाही

25 September 2010 वेळ: Saturday, September 25, 2010
सिरीयल इथे संपत नाही, कुंकू नंतर लज्जा येते
कोसंबी संध्याकाळी गातो, तुझ्या पायी मी ते पहिले
सिरीयल इथे संपत नाही..

ते vamp चे बघणे इर्षेचे, ती कुटिल हास्याची माया
कार्यक्रम बघून थकलो आपण, तरी उद्या पुन्हा बघावा
सिरीयल इथे संपत नाही....

ते बोल दुष्ट आणि भडकपणाचे, दिवस बिघडवून गेला
(कुंकू मधल्या) जानकीच्या मूर्खपणा बघून येते मजला दया
सिरीयल इथे संपत नाही

ह्या दुनियेतील अवघ्या घरातील गुणगुणते दुखं आहे
हे संपता संपत नाही रटाळ पण सिरीयलचे
सिरीयल इथे संपत नाही.


(ग्रेस ची माफी मागून)


मधे सुट्ट्यांमध्ये मी टी.वी ला एक्स्पोझ झालो. काय भयंकर कार्यक्रम दाखवतात हो....
एक कुंकू नावाची सिरीयल आई बघते, त्यात मृण्मयी देशपांडे - जानकी नावाची प्रचंड मंद भूमिका निभावतेय.
ह्या जानकीची खासियत म्हणजे, तिला पहिल्या झटक्यात काहीच झेपत नाही.
मग तिची पहिली लाईन - "तुम्ही काय बोलताय मला काहीच काळात नाहीये."
अशा सिरीयल बघतांना आश्चर्य वाटतं. मनोरंजन म्हणून कोणा तिसर्याच्या घरातली लफडी बघण्यात कसला आनंद?
माणसाची आवड इतकी का खालावली?

ह्या सिरीयल पासून मुक्ती म्हणून मग तो कॉमेडी शो लावला.      
आजकाल कॉमेडी बघणं म्हणजे एक उदाहरण देतो  -
तुम्हाला एक १० चाकू दिले, ह्यात किमान ९ तर बिन धारेचे असणार.
तेवढ्या एका धारवाल्या चाकू साठी उगाच ९ बोथाड चाकू सहन करावे लागतात. 
कधी कधी तर १० पैकी १० चाकू बोथाड असतात.......नॉन-सेन्स साला.
त्यात भर म्हणजे २-३ भोचक पोरं असतात कॉमेडी करायला. 
ठीक आहे मान्य आहे कि हि पोरं स्टेज-फिअर न बाळगता कार्यक्रम सदर करतात. 
पण मी हे मनोरंजन म्हणून का बघावा. कॉमेडी सर्कस नावाच्या कार्यक्रमात एक भोचक पोट्टी - सलोनी. 
राहून राहून वाटतं हिला २ चमचे शेंदूर खाऊ घालावं आणि गप्प गुमान तिला वयाला शोभेल असा वाग म्हणावं.

मग येतात गाण्याचे कार्यक्रम. कधी लहान मुलं, तर कधी मोठे लोक. गाण्यांच्या स्पर्धा १२ महिने पाहायला मिळते. 
हे भल्या माणसांनो, घर बाहेरची स्पर्धा कमी आहे का? म्हणजे दिवसभराची झुंज गोड करायला, डझनभर गाणाऱ्या माणसांची स्पर्धा बघावी. 
सरळ एक ६-६ पोरांना बोलवा आणि एक एक आठवडा फक्त गाऊ देत त्यांना. 
कशाला हवी स्पर्धा, आणि कशाला हवे ते एलिमिनेशन. 

न्यूज लावा. कृत्रिम रंग असलेला कलिंगड, जबरदस्तीने पिकवलेले आंबे, झेंडूचा रस लावलेलं खरबूज आणि गळ्यात खाजवणारी मोसंबी.
वाह सामान्य ज्ञानात काय भर पडली! हे दाखवून समाधान नाही होत म्हणून मग सिरीयल मधे काय सुरु आहे ते हि दाखवतात.
थोडक्यात "back to square one" आणि आपण तेच द्वेष, इर्षा भडभडून दाखवणाऱ्या मालिका बघत वेळ मारतो.
बाबा तर म्हणतो - बातम्या नसतील तर सरळ तसा एक स्क्रोलर टाकावा - "आज काही विशेष बातम्या नाही"

साले शेवटी सगळे टी.आर.पी मिळवण्याची खटाटोप.
आणि आपण ते का बघतो आपल्याला हि नाही माहिती. 
 
मग अशा परिस्थितीत टी.वी विकायच्या टोकाच्या निर्णयावर पोहचू नका. 
मनोरंजनासाठी जाहिराती बघा!  


8 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    >> सरळ एक ६-६ पोरांना बोलवा आणि एक एक आठवडा फक्त गाऊ देत त्यांना.
    कशाला हवी स्पर्धा, आणि कशाला हवे ते एलिमिनेशन.

    हि कल्पना खरच अफलातुन आहे.

  2. Sagar Kokne Says:

    बेधडक लिहिलेस...
    विडंबन चांगले आहे....टी.व्ही.पाहायचा कंटाळा येतो म्हणून आपण नेटवर असतो ना रे...

  3. मनोरंजनासाठी जाहिराती बघा!

    tya tari kothe dhad rahilyat

    Vodafone chya poptasarkhya tyahi dokyala shot detat rav ;)

  4. sanket Says:

    i spend my time on net for entertainment... almost stopped watching TV...
    Mast lihilay.. vidamban avadle..

  5. अनघा Says:

    खरंय आकाश, ह्या मराठी म्हणा किंवा हिंदी सिरियल्स म्हणजे फक्त हेवेदावे आणि संगीताच्या नावाखाली असंस्कृतपणाचे पेवच फुटलेय जसे! एकमेकांचे हेवेदावे करणे हेच सध्या 'इन' आहे कि काय असा कोणाचा भ्रम देखील होऊ शकतो. पण मग ट्रॅव्हल अँड लिविंग किंवा डिस्कवरी वरच्या मालिका मात्र आपल्या ज्ञानात तरी भर टाकणाऱ्या असतात. आवडला तुझा लेख. आणि शेवटी तू माझ्या पोटापाण्याच्या व्यवसायाचा थोडा पुरस्कार केलायस ना म्हणून अधिक बरे वाटले! ('विक्रम एक शांत वादळ' ची प्रतिक्रिया उलटी असली तरी!) :)

  6. Aakash Says:

    सौरभ (बाबाकांत) : धन्यवाद! >:द< (मराठ मोळी गळा भेट!)

    सागर आणि संकेत : अगदी बरोबर, आणि इंटरनेट स्लो असलं तर प्लान बी वर जावं लागतं

    विक्रम: आरे दोस्ता, एकाच चान्णेल वर थांबू नकोस, channel बदलत राहा, एक से एक मजेशीर जाहिराती बघायला मिळतील! विशेष करून "नझर सुरक्षा कवच" वाली नक्की बघ! ते डोळ्यातून निघणारे लेझर बघून तर मी लोट पोट झालो होतो.

    अनघा: हो नं, डिस्कवरी, ट्रॅव्हल अँड लिविंग चे कार्यक्रम लई विशेष असतात. कमीत कमी त्यांच्या त्यांच्यात तरी छल-कपट नसतो. अन जाहिराती म्हणजे तर मेजर करमणूक! कधी विचार न केलेल्या कल्पना डोळ्यासमोर रंगतात! मग हे कसं सुचलं आणि त्याने किती
    छान मांडलं (नझर सुरक्षा कवच - अपवाद नाही. हे सामान्य बुद्धीतून येणा झरा अवघडच आहे.)

  7. Deepti Says:

    खर आहे आणि सगळ्या channel वर त्याच त्याच रटाळ मालिका लागलेल्या असतात...कधीही लावा कोणती न कोणती serial चालूच असते...
    मला त्या पेक्षा star world वरच्या english serial बघयला बरया वाटतात...

  8. होय.. खरंच जाहीराती सेव्हिंग ग्रेस आहेत

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates