देऊळ

14 August 2010 वेळ: Saturday, August 14, 2010
मुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रांगणात कब्बडी खेळण्याचा प्रसंग ओढावला. परिस्थितीने हि वेळ आणली. तसं देवळात जाणे वगरे मला काही पटत नाही, पण आईसाहेबांनी आदेश केला होता. निमुटपणे मग त्या जन-समुद्रात आम्ही पण सामील झालो. मेटल detector चा टप्पा पार करून पुढे जात नाही, तोच समोरून हार, फुलं, पेढे, नारळ "खपवनाऱ्यांचा" तांडा माझ्यावर धाऊन आला. एकाने समोर येऊन अडवलं, आयुष्यात सिग्नलवर मामा लोकांनापण असली फिल्डिंग लाऊन मला धरता आलं नाही! मग मला डाव समजला! लगेच कंबरेतून वाकून हात जमिनीला टेकवून, मग छातीवर ठेऊन दीर्घ श्वास घेतला. कबड्डी कबड्डी कबड्डी करत मग एक-एकाला चकवला. तितक्यात एकाने माझा हात पकडला, हात कसला, दंड पकडला. हिसका देऊन सोडवला आणि चपल stand गाठला! 

मला अजून हे झेपत नाही, देवळात का जावं? देऊळ जितकं कमी प्रसिद्ध, तितकी शांतता लाभते. उगाच सिद्धिविनायक, महालक्ष्मी, शिर्डी, दगडूशेठ ला जाऊन झुंबड करायची. दर्शन म्हणजे काय तर तो पुजारी तुमच्या हातून ते पूजेचं ताट घेणार - ती प्रसादाची पुडी एका कोपऱ्यात टाकणार, नारळ खाली ठेवणार, काही तरी पुट-पुटेल आणि मग एक आवाज काढेल "चला पुढे, गर्दी करू नका." मग कपाळावरचा घाम पुसत बाहेर निघत एकमेकांना मागच्या visit च्या गर्दीबद्दल सांगायचं. गर्दीत तुंबून, मग मोजून दीड मिनिट तुमचा भक्ती-भाव तुमच्या देवा वर शिंपडून मनाला शांती वगरे मिळते ह्यावर माझा विश्वास नाही. मला मान्य आहे, प्रत्येकाची श्रद्धा असते, एक मनासिक आधार असतो. माझा स्टान्स नास्तिक नाही. पण हे जे घडतंय, हि भक्ती आहे कि फॅड?

घ्या आता लवकरच गणेश उत्सव येईल. "डॉल्बी सोडल्या" शिवाय आमच्या मंडळाला उत्सवाचे रूप येत नाही. रस्त्यावरून जातांना मनस्ताप आणि शिव्या मिळतात. मंडळाचा नियम आहे "sound " वर स्टेपा
(स्टेप्स चा अनेकवचन. स्टेपा =  डान्स स्टेप्स) पडल्या नाहीत तर मग "उपेग" काय? असे कलंदर जे संस्कृतीच्या नावाने शंख फुंकता. ह्यांना उष्टे भक्त म्हणणं जास्ती योग्य ठरेल. कुठे चार शब्द ऐकतात, त्यांचा खरा अर्थ जाणून घ्यायच्या आधीच "भावड्या आपण सगळं समजून घेतलाय." असा आव आणतात, अन माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखं होतं.

हेच दृश्य मी गेले २३ वर्ष बघत आलो, मग का म्हणून मी "देऊळ" विषय घेऊन एक थिल्लर पोस्ट टाकू नये?  

1 Responses to देऊळ

  1. सौरभ Says:

    पोस्ट टाकलीच पाहिजे. दुसरा परिच्छेद दणकट बसलाय. मी पहिल्यांदा सिद्धिविनायकला गेलेलो तेव्हा छोटसं मंदिर होतं. बाजुला चिखलगल्ली. आपल्या इकडे सगळ्याच देवस्थानांची हिच अवस्था आहे. शेवटी मंदिर/गणेशोत्सव मंडळ एक बिझनेस झालाय.

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates