मागच्या आठवड्यात एका संकेत स्थळावर मी कधीच न ऐकलेल्या इडलीची रेसिपी वाचली.
फणसाच्या पानांमध्ये इडलीच पीठ भरून, शिजवून मग चटणी आणि सांबर बरोबर फडशा पाडायचा असतो!
ह्या पदार्थाला khotto (एकवचन) khotte (अनेकवचन) म्हणून ओळखतात.
हि आहे त्या रेसिपीची लिंक - Aayi's Recipes
आता हा पदार्थ खिलवणार कोण?
मिळेल तर मुंबईतच मिळेल, सुरवात केली "सत्कार" पासून.
चर्चगेटला विठ्ठल कामतच्या वडिलांनी चालू केलेलं हे उपहारगृह. इडली ऑर्किड आणि मी ह्या पुस्तकात विठ्ठल कामतने उल्लेख केला होता की सत्कार मधली खासियत म्हणजे तिथली इडली. त्यांच्या आईची रेसिपी होती ती. मला हवा असलेला पदार्थ - khotto मला इकडे नाही मिळाला, पण उत्कृष्ठ इडली खायला मिळाली.
आज Kings Circle च्या Cafe Mysore मध्ये khotto ची अन माझी गाठ पडली!
मग नझर मेन्यू कार्ड वर फिरत होती, आणि तसं तिथल्या वाढप्याला ऑर्डर मिळत होती. आज त्याला सोमालिया होऊन आलेला आणि बांगलादेशला जाणारा माणूस कसा खातो, ह्याचा नमुना मिळाला असणार. अॅट द एंड ऑफ द इंनिंग माझा स्कोर होता : २ प्लेट khotto इडली, १ प्लेट केला पकोडा आणि एक फिल्टर कॉफी.
खाली काही फोटो टाकत आहे! आस्वाद घ्यावा :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
अरे आकाश... क्याफे म्हैसूर म्हणजे आपले एकदम आवडते ठिकाण... :) फोटो मस्तच..
आज सौरभच्या ब्लोग्वरून तुझ्या ब्लोगची लिंक मिळाली... आणि बघतो तर काय... तुझा ब्लोग मी आधीच पाहिलेला - वाचलेला आहे की... :)
आणि काय रे.. तो वर्ष फोटो तुझा आहे ??? :P
व्वाह व्वाह व्वाह... फोटो बघून जाम जळाली. एखाद्याच चांगलं बघून पोटात दुखणं काय असतं शब्दशः अनुभवल. आक्या, उद्या जर तुझा दिवस टॉयलेटमधे गेला तर समजुन घे माझ्या शुभेच्छा तुला मिळाल्या. :P :D ;)
रोहनरावांचा पुन्हा एकदा स्वागत करून टाकू! उसी बहाने स्वागताचे पेढे हाणू.
तो वरचा फोटो माझा नाही रे बावा. एक पोर समोर बसून इडली, वडा वर ताव मारत होता.
अन नेमकी त्याने पार्ले-जी च्या पोरासारखी पोज दिली.
मग म्हंटला, होऊन जाऊ देत!!
सौरभ तू काळजी नको करूस!!
बडे बडे शुभकामनायें हमने "पचाये" हैं :)
पण बॉस toilet मध्ये एक छानसा शेल्फ असावा.
रोज पुस्तकांचा trafficking बरं नाही दिसत :-प
try Khotto @ Idli House near maheshwari udyaan... itz quite a smaller place but excellent preparation!!
definately, I'll give it a try!
still havent relished on the remaining delicacies at Cafe Mysore. I've decided to haunt the place till i've tried everything on the menu!
ही अशीच दिसणारी इडली मी बंगलोर-मैसूर रोड वर एका उत्तम उपहारगृहात हादडली होती... अतिशय सुंदर फोटूंबद्दल निषेध!! ;)
निषेध निषेध निषेध
हे अस एकट्याने खान बर न्हाव राव लय त्रास हुतु मग ;)
बाकी फोटो एकदम झाक