सहज शिवाजीपार्क

25 January 2011 वेळ: Tuesday, January 25, 2011

सांगण्यासारखं काही विशेष नाही. थोडी हवा खायला शिवाजीपार्कला गेलो. सोबतीला कॅमेरा.

कसली तरी तयारी सुरु होती. पोलीस बंदोबस्त पण होता. २६ जानेवारीसाठी असेल कदाचित. गेले दोनतीन दिवस खूप गोंधळ उडालाय. सॉलिड द्विधा अवस्थेत हाओ म्या. असो, परीक्षेचा नाट संपलाय. सुचलं तर लिहूच की!

क्रिकेटचा डाव चांगलाच रंगला होता. फेकी गोलंदाजी असो, किव्वा आडवा पट्टा फलंदाजी - आपल्याला मजा आल्याशी संबंध. साला उगाच मध्ये नियम ठुसून खेळाचा चुथडा केला. काही गोष्टी अश्याच गुंतल्या आहेत, म्हणून त्यात आता मजा येत नाही. झाडावरून कैरी पाडून, तिला तिखट मीठ लावून खायला जी मजा आहे; तीच मजा बाजारातून विकत आणलेल्या कैरीला येईल का? तसंच आडवे तिडवे मार्ग घेऊन काही करण्यात एक वेगळीच मजा. क्लिष्ट भाषेत कदाचित - Out of the Box म्हणता येईल.


बरं ते सोडा. लहानपणी कित्येकवेळा आपण हात धरून जायचो. त्या वेळी असा काही खास नाही वाटायचं. मोठं झाल्यावर एखाद्या लहान मुलाला असाच हात धरून नेतांना जो sense of responsibility येतो, बाप्पा.....

कदाचित sense of responsibility nurture करण्यासाठी मोठ्यांनी लहानांचा हात धरायचा असतो.

ह्या रंगाच्या डब्यांचा फोटो तर कलर काढला होता. पण आज B/W चा टोन सोडवा असं वाटत नाहीये. उगाच..... काही कारण नाही..... प्रत्येक गोष्टीला कारण असलाच पाहिजे का? जर एखाद्या गोष्टी मागे काहीच कारण नसलं, अन तरी मी ते करून बघितलं. कदाचित मी ते करतांना त्यात माझे काही personal gains बघणार नाही, कदाचित मला त्यातून मोठा फटकापण बसू शकतो. देख लेंगे साले को!


असो, लवकरच भेटू.......

शेंबड्या नाकाच्या आणि बोबड्या ओठांच्या कविता...

15 January 2011 वेळ: Saturday, January 15, 2011
शाळेत असताना मी काही कविता केलेल्या आणि एका वहीत लिहून ठेवलेल्या. ती वही सापडली. कविता वाचल्या तेव्हा भारी हसायला आलं. उगीच काहिही यमकं जुळवून कविता केल्यात. ह्या कविता पुर्णपणे विस्मृतीत गेलेल्या. वही मिळाली तशी लगेच स्कॅन करुन घेतली. ज्यांच्याबोवती तुटक बॉर्डर आहे त्या इतर कुठेतरी वाचलेल्या, आवडलेल्या म्हणून नोंद करुन ठेवलेल्या होत्या. तरी आयुष्यात जी पहिली कविता केलेली ती ह्यात नाही. पण माझ्या लक्षात आहे. अशी होती ती...

लहान बाळाला असते काय अक्कल
चड्डीचे सुटले असते त्याचे बक्कल
नीट नसते धड त्याची चप्पल
त्याला असते एक गोलगोल टक्कल
टकल्यात काय शिरणार अक्कल
म्हणून तो करतो साऱ्यांची नक्कल

बाकिच्यांची स्कॅन्ड कॉपी खाली देतोच आहे.




आपला,
(हाप चड्डीतला) सौरभ

शेर आया... भागो भागो...

07 January 2011 वेळ: Friday, January 07, 2011
बंड्या: मियाँ, अर्ज किया है...
गुंड्या: इर्शाद इर्शाद...
बंड्या: (पानाचा तोबरा थुकत) आँ थू थू थू थू...
गुंड्या: वाह वाह!!! वाह वाह!!!
बंड्या: मियाँ शेर यह नही था, वो तो अब फर्माऊँगा|
गुंड्या: ओह्ह अच्छा... इर्शाद इर्शाद...
बंड्या:
साला पिनेवाले होश संभाल ना सके, और शराब बदनाम हो गई|
कंबख़्त आशिक प्यार निभा ना सके, ख़्वामख़ाँ मोहोब्बत एक सजा हो गई|

गुंड्या: ईईईय्य्याक्क्क... च्यामायला ब्येकार येक्दम.. पला पला बालान्नू...

आपला,
(शेरु) सौरभ

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates