Incomplete सायकलिंग थ्रिल

31 July 2010 वेळ: Saturday, July 31, 2010

 एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सायकल पदरी पडली. सायकल फिरवण्या बरोबरच तिला "खोलून" (सायकलवाल्यांच्या भाषेत सायकल नेहमी खोलल्या जाते!) साफ करणं पण येऊ लागलं. उन्हाळ्यात पहाटे उठून कोल्हापूरच्या आस पासचा परिसर explore करायचो. सर्किट हॉउस कडून भगव्या चौकातून खाली बावड्याचा रस्ता धरायचा, थोडं पुढे गेलं कि शेतं लागतात. आता इकडून कुठूनही उजवीकडे वळा, शेतातून रस्ता जातो तो सरळ पंचगंगेच्या तीरावर. कधी कधी पन्हाळा रस्त्यावर सोनतळीच्या परिसरात भटकायचो. पुण्यात आल्यावर मग सिंहगडला सायकलने जायचं. पुण्याच्या ट्राफिक मध्ये दुचाकीला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ सायकलला लागायचा. फक्त थोडी पळवावी लागायची. क्वचित कधीतरी सायकलने पोहचायला उशीर व्हायचा. पण कालांतराने सायकलिंग बंद पडलं. सायकलचा उपयोग मग चौकात जाऊन दूध,ब्रेड आणायला होऊ लागला.    

मागच्या एका पोस्ट " rolling back rusty pedals " मध्ये सायकलिंग सुरु केल्याचा उल्लेख केलाच होता. पण मग सराव परत बंद पडला. 

काही दिवसांपूर्वी प्रोफ. ने आमच्या सायकलिंग ट्रिपचा किस्सा ब्लॉगवर पोस्ट करण्यास फर्मावलं.

संध्याकाळी प्रोफ. चा फोन आला. "डूड,उद्या गुढी पाडव्याची सुट्टी आहे. सायकलिंग ट्रिप मारायची का?"
"कधी पण. फक्त माझ्या सायकलच तेल-पाणी करावं लागेल."
"चिंता नाही, तू ते बघून ठेव. मी संध्याकाळी रूम वर येतो."

सायकल तेल-पाणी देऊन सज्ज केली. सायकलला रिफ्लेक्टर नाही. मग ते वाटेत फिट करायचं ठरलं. प्रोफ. ने त्याच्या भावाची AXN DX २४" घेतली. मी अजून हि माझी Hercules MTB 9000 वापरतो. थोडे बहुत फेर-फार केले आहेत. आता रूट ठरवला. सिंहगड रोड > पुणे-सातारा हायवे > खेड-शिवापूर > नसरापूर फाटा > वाई फाटा > नीरा नदी वर मासे मारी आणि मग परत यायचं. 
निघायला संध्याकाळचे ८ वाजले. गुढी पाडव्याच्या आस पास थंडी कुठे असते? बऱ्यापैकी उकाडा सुरु झालेला असतो. ह्या हिशोबाने आम्ही टी-शर्ट आणि शॅार्ट चढवले होते. 
हायवेला लागलो, सुरवातीचे फ्लाय-ओवर पार करायला काही अवघड नाही गेलं.  जवळ जवळ २ महिन्यांनी सायकलिंग करत होतो. नेहमीच्या हिशोबाने आम्ही बऱ्यापैकी हळू जात होतो. बरेच दिवस काही प्रक्टिस केली नाही म्हणून मुद्दाम हळू सुरवात केली. पण पुढे जसा कात्रज तलाव जवळ येऊ लागला, चढाव हळुवार वाढत गेला. वेग पण कमी होता आणि वरून लोड वाढू लागला होता. एक - एक पेडल टाकत, अधून मधून रेंगाळत जाणाऱ्या ट्रक च्या मागची साखळी धरून कात्रज बोगदा गाठला. बोगदा संपला कि पहिला हाल्ट घ्यायचं ठरलं. सव्वा किलोमीटर पण लई जीवावर येत होते. अखेरीस ते पार केलंच. आता प्रक्टिस नसलेल्या पायांमध्ये गोळे आल्याचे चित्र मला स्पष्ट दिसत होत.
बोगदा पार करून विश्रांती घेऊन पुढे निघालो तर उतार लागले. उतार उतरल्यावर potential मुळे पुढचा चढाव निम्मा पार व्हायचा. आता खेड शिवापूर पर्यंत पोहचलो होतो आम्ही. रात्रीचे १०:०० - १०:३० वाजत असतील, हवा अचानक थंड वाटू लागली. अजून भूक लागली न्हवती. भूक लागली तेव्हा ११:३० होत होते. ढाबे बंद व्हायची वेळ झाली होती. शेवटी एका ठिकाणी घाई गडबडीत बनवलेली कोंबडी खाल्ली. जेवण झाल्यावर सायकल मारायचा कांटाळ आला होता. थोड्या वेळ निवांत बसून राहावं वाटत होतं. पण ह्या ढाबेवाल्याने  काही त्याच्या अंगणात बसू दिलं नाही. मग समोरच्या एका ढाब्यावर आम्हाला आसरा मिळाला. वेळेचं काही बंधन नसल्यामुळे आम्ही मग एक मोठी विश्रांती घेतली. आता पोट पण रिकामं करून झालं होतं. पुढे रस्ता काही कठीण न्हवता. पण थंडी मुळे आमच्या बत्त्या गुल होत्या. शेजारून एखादा ट्रक गेला कि ट्रकची उब बरी वाटायची. 

रात्रीचे ०३:०० वाजत होते. मध्ये आम्ही एका टायर वाल्याकडे आसरा घेतला. पण तिकडून निघाल्यावर प्रॉब्लेम सुरु झाले. आता हायवेवर उजेड फक्त मागून येणाऱ्या गाड्यांचा होता. एखादा पेट्रोल पंप आला तर थोडा फार तो उजेड. कधी अंधारात रस्त्याच्या खूपच कडेला यायचो, तर कधी रस्त्याच्या मधून जात असल्याचे समजायचे. मध्ये एक-दोन वेळा माझं फ्री व्हील जॅम होऊन माझा तोल गेला.  तरी थोडं अंतर कापलं. नसरापूर फाटा मागे सोडला. आता मात्र फ्री-व्हील वारंवार जॅम होत होतं. शेवटी एक रेणुका ढाबा-कम-उपहारगृह होतं. तिकडे आम्ही फ्री-व्हील तपासायला थांबलो. तिथल्या उजेडात फ्री-व्हीलचा हाल तपासला, बदली करण्या पलीकडे काही गत्यंतर दिसलं नाही.

आता सकाळ होईपर्यंत तिकडेच थांबावं लागणार होतं. थंडी बोचकारत होती. आजू-बाजूला लाकडं मिळतात का शोध घेतला. पण पोकळ बांबू व्यतिरिक्त काहीच नाही मिळालं. बाजूला ओली झुडपं होती, पण एक धड सर्पणाचा तुकडा निशिबात न्हवता. आता थोडं उबदार वाटू लागलं. बाहेर मांडलेल्या खुर्च्यांचा आधार घेऊन पाय पसरवून डुलकी घेतली. थोडं उजाडल्यावर परत जाण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला, हात दाखवून लिफ्ट मागणं सुरु केलं. एका वाळूच्या ट्रक मध्ये, मागे सायकल चढवल्या आणि आम्ही ट्रक च्या cockpit मध्ये बसलो. दीड-दोन तासात आम्ही सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाच्या खाली बसून चहाचे घोट घश्या खाली सोडत होतो. तिकडून सायकल प्रोफ. च्या घरी सोडली. रूम वर आलो. देह पलंगावर झोकून दिला. हात पाय दुखायला लागले होते. आयुष्याचा येशू झाला होता. दुपारी खानावळीत काय मिळेल माहित न्हवता. गुढी पाडव्याची फीस्ट होती. दबाके गुलाबजाम हाणले! 

संध्याकाळी प्रोफ. चहा साठी भेटला, एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आला होता. थंडी मुळे इतकी फाटली, कि आमची फाटून दरवाजा होण्या ऐवजी आमची फाटून कमान झाली होती. नसरापूर फाट्या जवळून जातांना आमच्या कमांनी धड-धाकट आहेत हा निरोप आम्ही एक-मेकांना झारूर कळवतो!    

लोणावळा ते कर्जत ट्रेल

29 July 2010 वेळ: Thursday, July 29, 2010
गेल्या आठवड्यात लोणावळा ते कर्जत ट्रेल पार पडायचा ठरलं. तयारी कसली लागते. एक जोडी कपडे, २ जोडी मोजे आणि कॅमेरा. रेन-कोट तसाही प्रोफेसर आणणार होता. सांगण्यासारखा खूप आहे, पण प्रत्येक्ष अनुभवण्यात जास्ती मजा आहे. 
वाटेत बरेच विनोद घडले, अगदी हातभार अंतरावर शौचास बसलेला माणूस चालण्याच्या नादात दिसला नाही. आणि मग जेव्हा दिसला, तर हास्याच्या उकळ्या राहावल्या गेल्या नाही. 
खंडाळा पार केल्यावर प्लान बदलला. थ्रिल येत नाही म्हणून आम्ही ट्रेल बदलला. ह्या ट्रेल वरून पडत - सावरत आम्ही खोपोलीत उतरलो. ट्रेल मात्र एकदम वसूल होता. आणि रेल्वे पटरीच्या बाजूने नुसतं चालण्या पेक्षा ह्यात लई मजा आली

काही निवडक चेहरे आणि मँप ....

(आधी ठरलेला ट्रेल)

(ट्रेल बदलला पण साधारण ५०० ते ८०० मीटर चा ग्रेडियंट उतरावा लागला.)






 वाटेत रेल्वेचं काही काम सुरु होतं.माज्दुरांना कॅमेरा समोर भारीच मजा आली! 





30 July:
काल खूप लिहायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. बोगदा क्रमांक ४८ पार केल्या नंतर डाव्या हाताला एक विजेचे टॉवर आहे. तिथून खाली जाणारी पायवाट दिसेलच. थोड्या वेळ ती पायवाट भारी वाटली, वाटेत राम फळाचे बरेच झाडं दिसले. पण हाव काही सुटेना. मंकी-हिल उजव्या हाताला सोडून अजून थोडं पुढे गेलो. आता इथून खोपोली गावाचं दर्शन होतं. वरूनच गगनगिरी महाराजांचा आश्रम दिसतो. तोच आमचा अंतिम टप्पा ठरला. आता खाली उतरायची वाट एका झरा-कम-ओढा मधून होती. पावसा मुळे दगडांवर शेवाळ जमलं होतं. पावसाळ्यात झाडी भरपूर वाढली होती. डोक्यावर गर्द झाडांची जाळी होती, आणि पायात वेलांच जाळ. निसरड्या पृष्ठभागावरून चालतांना पायांची कसरत झाली. एका ठिकाणी हेली-पॅड बघून एक क्षणभर वाटलं थोडं पुढे गेल्यावर कदाचित एखादी OTIS ची लिफ्ट असेल. लिफ्ट नाही मिळाली, पण एक पायवाट मात्र मिळाली. आता सरळ आश्रमात बिन घसरता पोहचू ह्याची हमी होती.

इतक्या वेळ झऱ्याच पाणी पिऊन तहान भागवत होतो. आता साक्षात नळातून पाणी येत होतं. आणि बाकडे जास्तीच मऊ वाटत होते. खाली यायला साधारण तास - दीड तास लागला आम्हाला. आता शोध ढाब्याचा. ढाब्यावर कोंबडी वर अडवा हात मारून झाल्यावर. लोणावळा ला पोहचायचं होतं. बस ची वाट बघण्यात कोणाला रस न्हवता. समोरून येणाऱ्या MAXX PICK -UP ला हात केला. लोणावळा पर्यंत आम्ही हवा खात
आलो

इरसाल

वेळ: Thursday, July 29, 2010
गेल्या दोन तीन दिवसांमध्ये बरेच विषय मनात घिरट्या मारून गेले. कुठल्याही विषयाचा संबंध एक-मेकांशी नसल्याने, प्रत्येक लाट एका स्वतंत्र पोस्ट मध्ये उतरवून काढीन.

मलाच नेहमी असे इरसाल लोकं का भेटतात? हा प्रश्न नेमही इतरांना पाडतो, मग मी पण विचार करायला बसलो.

पहिला जरा प्रवासात भेटणाऱ्या लोकांचे किस्से पडतो. ज्या ठिकाणी उघड उघड कानाखाली ओढता येत नाही, अशा ठिकाणी शाल जोडी मारावी!
परवाचाच किस्सा, गाडीत बसलो होतो. साधारण माझ्याच वयाचा पठ्ठ्या आला. खिडकी साठी request  करून बसला. दिसायला बिलकुल मिशी वाला मिस्टर बीन. आपल्याला काय फरक पडतो. बाहेरचं सौंदर्य नाही तर नाही, पुस्तक वाचायला काढलं. गाडी सुरु झाली. तसं शेजारच्या मिस्टर bean नी लई खट-पट्ट करून कुठून तरी earphones पैदा केले. मग फोनला त्या earphones च्या दुसऱ्या टोकाचं टोचन दिलं. मिस्टर बीन तसे जास्ती शहरी बाबू न्हवते. पण "एड्ड्या आपण फुल्टू myatro - स्याक्शुअल. (मेट्रो-सेक्शुअल)"  ; असल्या वर्गात पडत होते. थोड्यावेळाने बीन रावांचं अवडत गाणं वाजू लागलं. कारण त्यांची मान अंगात आल्यासारखी गोल गोल फिरू लागली. असेल म्हंटल head banging चा एक प्रकार. बीन रावांना रॉक गाण्यांची आवड असेल. विचार संपत नाही, तो बीन राव, " ओ रे कांची, काच कि गुडिया. होटो पे बांधी प्रेम कि पुडिया" अशी आरोळी ठोकली. च्या मारी, हे काय होतं? नंतर नंतर त्याच्या वर राग येऊ लागला. स्वतः सुरेल गाणे ऐकत बसलाय, आन आम्हाला बेसुर गाणं सहन करावं लागतंय.


सवारी गाडी मध्ये वेगळाच दुःख असतं. सवारी म्हणजे काय, तर तो चालक एक-एक करून सीट भरेल. लोकांचं म्हणणं असतं, कि लवकर गाडीत ते २०-२५ माणसं भर आन मग सुसाट गाडी सोड. पण असल्या घायीच्या तोंडी बळी जाऊ नका. एखादा तुमच्या शेजारी बसलेला, लसणाचा ठेच्चा किव्वा चण्याची उस्सळ वर ताव मारून आला असला......तर मात्र काही खरं नाही.



मागच्या वेळी प्रवासात ग्रेगरी रोबर्ट्स च शांताराम वाचायला घेतलं होतं. शेजारचे गृहस्थ साठी ओलांडलेले असावे. अधून मधून हळूच वाकून माझ्या पुस्तकातले काही वाक्यांची झलक घ्यायचे, अन मग पुन्हा खिडकी बाहेर काही तरी शोधायचे. थोड्या वेळाने मी पुस्तक मिटलं आणि डोळे मिटणार, इतक्यात शेजारच्या गृहस्थाने - " हे जे पुस्तक तुम्ही वाचताय, ते कशावर आधारित आहे?"
"अजून मी मूळ कथे पर्यंत पोहचलो नाहीये, पण मला वाटतं एका माफिया बद्दल आहे. नंतर तो ते सगळं सोडून...."

"वाह, वाह.....शेवटी एखाद्या गोष्टीतून बाहेर निघणे हीच खरी गोष्ट आहे. आजकाल मी बघतो, लोकं एकाच गोष्टीत गुंतलेले असतात. काम करणारा कामा शिवाय काही बघतच नाही, आणि ऐयाश माणूस ऐश शिवाय काही बघत नाही. माणसाने कसं आयुष्यात balanced असावं. आमचा तसा व्यापार आहे. बेकरी आणि गोळ्या ठेवतो. गोळ्यांचा आमचा कारखाना होता. तो आता भावाला देऊन टाकला. त्याने त्याचा वेगळा हिस्सा मागितला. आपण कशाला कोणाची अडवणूक करून बसा? त्याला कारखाना वेगळा करून दिला. तुमचा नाव काय म्हंटलात ?"
"व्यापाराच्या निम्मिताने खूप लोकांना भेटलो, नवीन काही बघायला मिळालं, पण माणसा जोडायची राहून गेली........... तुम्ही पुण्यात काय करता? वाह छान. तुमचा पायगुण आमच्या घराला लाभू देत एखादवेळी. मी राहायला स्वारगेट पासून १० मिनटाच्या अंतरावर आहे. घरी आपली माणसं आहेतच. तुम्हाला भेटून त्यांना पण आनंद होईल."
- जर तुम्ही अशा एखाद्या गृहस्थाच्या पानात पडलात, तर मात्र धडगत नाही. तुमचा प्रवास संपत का नाही हा राहून राहून प्रश्न पडेल.



एक पठ्ठ्या माझ्याच वयाचा भेटला. चांगला शांत बसलो होतो. सहजच विचारलं "पुण्यात शिकता का?" त्यांने आधी ओळख करून दिली. दिली ते दिली, पण मग अशी काही पिन बसली त्याला. त्याने त्याची कवितांची वही बाहेर काढली. मग फर्रर्र फर्रर्र पानं उलटून एखादी कविता काढायचा, आणि वाचायला द्यायचा. मग अचानक एखादं पान असं असायचं ज्यावर एक व्यंगचित्र, त्याखाली एक स्वाक्षरी आणि एक वाक्य. "अमुक अमुक व्यांग्चीत्राकारांना माझ्या कविता एकदा ऐकवल्या होत्या, तेव्हा त्यांनी माझं एक व्यंगचित्र काढलं. त्यांनी मला कवी म्हणायच्या ऐवजी वी.क म्हणायचं ठरवलं." "त्यानंतर आम्ही त्या श्रीरामपूरच्या कवी संमेलनात परत भेटलो. तेव्हा त्यांनी पुन्हा आठवण दिली - 'काय वी.क कविता काय म्हणते?' " कवितांबरोबर ह्या आठवणी तोंडी लावायला देत होता. मग उतरतांना माझा नंबर मागून घेतला. मला वाटलं कसला फोन करतो हा पठ्ठ्या......पण हा तर missed -call बादशाह निघाला. कधी पण साला एक missed - call मारायचा.



दर वेळी असला नग भेटला कि उगाच मीच तो सर्वाय्वर मँन आहे असा भास होऊ लागतो.

पावभाजी

22 July 2010 वेळ: Thursday, July 22, 2010


हि पावभाजी चाखल्यावर मी मोठ्या गर्वाने स्वतःबद्दल शेखी मिरवू शकतो की पावभाजी बनवण्यात मी कोणालाही मागे टाकू शकतो.

आपला,
(बल्लव) सौरभ


संत्रवाणी - म्हणी

21 July 2010 वेळ: Wednesday, July 21, 2010
|| श्री आळसोबा प्रसन्न ||

"To err is a Human" - by some Erroneous person


"To debug/fix is an Engineer" - Baba Bongs

आपला,
(ज्ञानीबाबा) सौरभ

@ Home in Pune!!

17 July 2010 वेळ: Saturday, July 17, 2010



The other day, I was waiting at the bus stop for my bus early in the morning. It was pouring cats and dogs and like everyone else I was trying to combat the rain with the artillery of just one feeble umbrella. I saw a narrow stream of water by the road-side carrying a small sapling with the flow. I was observing the sapling which was now slowly strumming ahead with the current bearing the heavy pitter-patter of the gushing rain.

And, then suddenly I had a tiny EUREKA moment of my own - I realised that the sapling belonged somewhere else but it had been uprooted due to the pressure of heavy incessant outpour and was forced to shift from its place. It was now going to re-hold roots where it was going to find conducive conditions - a new place with ample water and sunshine to grow. A place which it can make its home. Yes a Home!

A few years back, I had also been uprooted from my Matrubhoomi(Mumbai) like the sapling due to certain reasons that are no longer valid. But staying back was a conscious decision. I did not find the reason to leave strong enough. I had always liked my Karmabhoomi (Pune). A city which gave me my career, my friends and my self worth. A city that I can rightly claim after 3 and half years of forgetting the names of the bridges and confusing them for each other - that I now know in and out of : ).

Pune has rightly acclimatised me to its pulse, pace, places, people and persona. When once I was lonely and lost it gave me a close knit social-circle of friends, family and extended family. Whats exciting is the fact that I have a home of my own here now. And it has only made things easier and better for me!

I owe a lot to Pune - Pune gave me a lot of things - one among it is a brand new life when I felt everything had ended and now it has blessed me with a home to call my own!! I love you Pune - Not by CIRCUMSTANCES but by CHOICE!!!

चिंता (का) करतो महाराष्ट्राची ?

07 July 2010 वेळ: Wednesday, July 07, 2010
(दगडूने काल एक लेख माझ्या ब्लॉग साठी contribute करायचा शब्द दिला होता! इतक्या लवकर लेख तयार करून दिल्या बद्दल आभार आणि शुभेच्छा! दगडूचे इतर लेखन वाचण्यासाठी > dynamic22 < क्लिक करा! )
                       

 




मासाहेब ! मासाहेब !  कुठे आहात तुम्ही ?
काय झाले शिवबा ! का उगा त्राहीमाम करताय ? पुन्हा का ४०० वर्षां पूर्वी
सारखे कासावीस होताय ?  आता आहे ना महाराष्ट्रात सर्व ठीक ?
मासाहेब कसले ठीक?  मराठवाड्यात मराठा नाही, महाराष्ट्रात मराठी बोलायला
मावळा आज लाजतो,  बाई हा  अपशब्द  झाला आहे, जिजाबाई ,  सईबाई , ताराबाई
तर आज घाटी नावे आहेत, आणि.........
शांत राजे; शांत व्हा , हे काही नवीन आहे का ? गेली ३०० वर्षे आपण हेच
पाहत आलोय ना . तुमचा मावळा आता  भेकड, षंढ , पार  नपुंसक झाला आहे ! हे
काय नवीन  आहे का ?
मासाहेब ! असे  तीक्ष्ण उद्गार नका काढू माझ्या मावळ्यांसाठी , ते थोडे
भटकलेत त्यांची वाट.मग शिवबा तुम्ही एकदम असे आज कासावीस का ?
मासाहेब, भीती वाटते. आज रायबा ने खबर आणली आहे , म्हणे दादासाहेब
फाळके यांनी  प्रस्थापित केलेल्या चित्रनगरीत म्हणे आमच्या जीवनावर आता
एक  नाही तर ३-३  चित्रपट काढणार आहेत.
अखेर आली जाग आणि जाण , ज्या शिवबा मुळे  हिंदवी  सुराज्य उभे  राहिले,
दिल्लीचा  तक्त  शाबूत राहिला, हिंदुच्या माना पुन्हा  ताठ  झाल्या, ज्या
 शिवबा मुळे उभ्या महाराष्ट्राने भारत पोसला , अखेर आली  आज त्यांना जाण
खूप उपेक्षा केली त्यांनीतुमची  . आम्ही आज आनंदात आहोत. पण मग तुम्ही का
का असे ?
मासाहेब,  छत्रपतीचा तक्त आम्हाला भुरळ नाही घालू शकला, कर्म हाच होता
ध्यास, तर ह्या चित्रपटावर आम्ही का गर्व शोधू ?. अजिबात  लोभ नाही ह्या
कार्यात, भीती तर काही औरच आहे .कसा ही असला तर अजून महाराष्ट्र  आम्हाला
विसरला नाहीये. भले ५वि  ६वि च्या इतिहासात आमचे धडे आहेत,  जे पुढे
सर्वच विसरतात, पण लक्षात नक्की ठेवतात आम्हाला. आज ही आमच्या नावाचा
अपमान सहन नाही होत त्यांना.  आता तर ३ चित्रपट काढणार  आमचे नाव  म्हणजे
स्वतःची जहागीर आहे , असा समज आहे काही  राजकीय  संस्थांचा,  स्व स्वार्थ
साठी कुठल्या हि थाराला जातात.  ह्या संस्था  वाट पाहत असतात स्वताचे
अस्तित्व  धाखाव्न्या साठी, त्यांन हे चित्रपट  म्हणजे एक सुवर्ण संधी ना
?  आता पासूनच चर्चा चालू आहे, कोण म्हणे तो संजय दत्त  ज्याने ९२ साली
मुंबई मध्ये स्फोट घडवणार्यांना  मदत केली तो आमचे  पात्र करणार पडद्यावर !
राजे ! करून दे कि, त्याने काय तुमचे शौर्य कमी थोड़े का होणार ?
तसे नाही  मासाहेब,  त्याने वा  और कोणी हि करावे आम्हास परवा नाही, पण
ह्या ज्या राजकीय संस्था आहेत त्या हि बाब चालू देतील का ? कोणी  म्हणते
अबू आझमी ला औरंगजेब  करा, शाहरुख ला शाहिस्ता खान , सलमान ला अफझल खान
करा,  ही अशी आता पासून हिंदू मुस्लीम विभागणी सुरु आहे . हेच का आमचे सुराज्य?
शिवबा तुम्ही केले तुमचे कर्तव्य , आता महाराष्ट्र आहे मराठी माणसाकडे.
आपण काही नाही करू शकत.
असे का म्हणता  माँसाहेब ? आमच्या अंगाची   अजून  ही लाही लाही होते,
असे हि विभागणी पाहताना, उद्या हीच मंडळी अख्खा महाराष्ट्र पेटवून लावतील
ह्या चित्रपटा पायी , ह्या संस्था चिथावणीखोर भाषणे करणार, भोळा मावळा
तो, पेटून उठणार आणि सर्वत्र करणार जाळ पोळ, एकूण काय नुकसान माझ्या
महाराष्ट्राचे. माँसाहेब हे आम्ही ४०० वर्षानंतर हि नाही पाहू शकत .
मग घ्या परत जन्म !
कसे घेऊ, प्रत्येक जण म्हणतो शिवाजीने जन्म घ्यावा पण  शेजारच्या घरात.
 आता सर्वच असे म्हणत आहेत, त्यामुळे तो शेजार अस्तिवात येतच नाही , कोणतीच
मराठी स्त्री आमच्या साठी मातृत्व स्वीकारत नाही  आम्हाला गर्भात कोणीच
धारण करून घेत नाही माँसाहेब.
शिवबा असे हताश नका होऊ, श्रींची इच्छा आपणास काय ठाऊक, सर्व ठीक  होईल
असा विश्वास ठेवू.

मला कविता करणं जमत नाय!

02 July 2010 वेळ: Friday, July 02, 2010
मला कविता करणं अवगत नाही. यमक तसे पटा-पट्ट जुळवतो.
औ म्हन्ताल तुमी, थोडं निवांत बसायचं नी मग आकाशाकडे एक नझर टाकून एक ओळ लिवायची.
पण ते तसला काय सुचतच नाय बघा. दगडू ला पटत न्हवता. पाहिलुंद त्याला असाच एक यमक लिहून दाखवलं होतं.

तर हे आहे आमचं जी-टॅाक वर झालेलं बोलणं.


मी: वाह कसलं यमक जुळलं

दगडू: शाबास

आय एम proud ऑफ यु.

मी: आता आणखीन कवितेच्या ओळी सुचायच्या आधी तू विषय बदलतोस का.......मी

चालू होऊ?

दगडू: होजा चालू

मी: तू त्या माझ्या मागच्या शीघ्र कवितेचा नमुना पचवलेला दिस्तोयेस

दगडू: वेल

कातडे जाड झाले

मी:

कातडे जाड झाले, माडाच्या झाडा वर माड आले,

संध्याकाळी सगळे गार झाले....

कोल्हिणीच्या शेपटीला केस फार आले.


सिग्नल-ला बाबा गाडी का थांबते?
उगा खोटे खोटे गेंड्याचे कातडे घालून का येते?

देशील बत्तासे कुटून, जेंव्हा पाकात टाकायला पीठी साखर जाईन मी विसरून


दगडू: ए गप्पे

अलाह..... अलाह उठा ले

मी
:
गप्पे गापे करून गोळी देशील झाडून.....

म्हणून मीच कविता करणे दिले सोडून! "


ह्या कवितेचं नाव - "प्रेम"



मी दगडूला ह्या आधी ऐकवलेली कविता वाचायची हिम्मत असेल तर, निशस्त्र या. डायरी-भर असली यमक ऐकवीन ;)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates