शलौम शाब - १

30 November 2011 वेळ: Wednesday, November 30, 2011
जाग आल्यावर, मी मुंबईत असल्याची जाणीव व्हायला थोडा वेळ घेतला. आज रविवार, अजून निम्मं शहर रविवारची झोप साजरी करत होतं. गेल्या काही दिवसांच्या सवयीने झोपेचं घड्याळ पार बदलून टाकलं आहे. गजर न लावताच ४:०० - ४:३० वाजता जाग येते. एक मोठा मग भरून honey-ginger ग्रीन टी घेऊन बसलो. mp3 player त्याचं काम चोख बजावतोय. मला मात्र काही न करता असंच खुर्चीत बसून वेळ काढत, घेतलेल्या अनुभवांचा आस्वाद घ्यायचा आहे.

परवाच तर निघालो होतो. कोची वरून निघालेली ही ट्रेन बिहारला जाणार होती. हिंदी न येणाऱ्या मल्याळी / तामिळ बंधू हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत असतांना, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थच निघावा. अश्या माहोल मध्ये बरोबर घेतलेलं पुस्तक खाक वाचता येईल, म्हणून वरच्या बर्थ वरून मजा बघत बसलो. पहिला मुक्काम वाराणसी होता.

ह्या जागेला वाराणसी नाव इथल्या दोन नद्यांमुळे पडलं, वरुणा आणि असि. ह्याच नद्या पुढे गंगेला जाऊन मिळतात. वाराणसी बद्दल असं पण ऐकलं होतं की भगवान शंकरने तांडव केल्या नंतर प्रलय आला, पुन्हा मग पृथ्वीचा पुन्हा विकास वाराणसी पासून झाला. अश्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पण ऐकायला मिळतील. स्टेशनच्या बाहेर येताच मागे लागलेले रिक्षावाले, सायकल रिक्षावाले, बसवाले, हॉटेल दाखवणारे कपभर चहापण सुखाने पिऊ नाही देणार. (अनघाताई हसू नका)

आज बनारस फिरायचं होतं. इकडे देऊळ, घाट आणि देऊळ व्यतिरिक्त बनारसी साड्या मिळतात - हे पहिल्या दर्शनी बनवलेलं चित्र. गजबजाट असलेल्या रस्त्यांवर ट्राफिक सिग्नलचा एक खास शोभेची वस्तू म्हणून वापर केला होता. पोलीस हवालदार ऑटो-रिक्षा वाल्याकडून चिरीमिरी घेण्याला प्राधान्य देत होता. ह्या रिक्षांमध्ये समोर ३ (चालक सोडून) आणि मागे ३ ह्या हिशोबाने सवारी घेतात. दुप्पट प्रवाश्यांना बसवल्यावर का नाही पोलीस त्या रिक्षेवाल्याला अडवणार? मग मलाच जाणीव झाली, साला आपण अजून भारतातच आहोत. स्टेशन बाहेरून Godowlia साठी सवारी रिक्षा मिळतात. १२ रुपयात तुम्हाला Godowlia चौकात सोडतील. इथून १० मिनिट चालत गेलात की राजेंद्र घाट.

बारीक सडकेला अगदी लागून थाटलेली दुकानं, सायकल रिक्षांच्या घंट्या (हो एका सायकल रिक्षेला किमान ३ घंट्या असतात!) इथे सायकल-रिक्षा टेक्नो आहेत, ब्रेक खाली २ घंट्या जास्ती बसवल्या असतात ब्रेक दाबला की लगेच घंटी वाजू लागते! ऑटो-रिक्षाचे पीर-पीर वाजणारे हॉर्न, आणि ह्यांच्या पार्श्वभूमीवर आरती आणि मंदिरातल्या घंट्या वाजत असतात.

रस्त्याच्या कडेने चालत असतांना कितीही कडेने चाललात, तरी एखाद्या सायकल-रिक्षाचा धक्का लागलाच पाहिजे. त्या शिवाय तुम्हाला वाराणसी मधून बाहेर पडता येत नाही. आता तुम्ही वाराणसी मध्ये आलाच आहात तर काही गोष्टी करून पाहणं गरजेचं आहे. उदाहरण: बनारसी पान खाणे, पुरी-जलेबी चा नाश्ता, कचोरी आणि लस्सी, मातीच्या भांड्यात चहा पिणे आणि शुगर किक बसे पर्यंत रबडी हाणायची. ह्यात भर टाकायची म्हणून सायकल-रिक्षाचा धक्का तितकाच महत्वाचा आहे.

भटकत भटकत गंगा किनारी असलेले सगळे घाट फिरून झाले. काशी विश्वेश्वर पण बघून झालं. देवळात जाणे तसं पण मला जड जातं, म्हणून मग बाहेरून फिरून सगळं पाहून घेतलं. स्कंद पुराण मध्ये काशी खंड मध्ये ह्या शहराची महिमा रचली आहे. इतिहासातल्या अनेक घडा-मोडी ह्या जागेने अनुभवले आहेत. एस.एल भैरप्पांच्या "आवरण" आणि "सार्थ" वाचल्यानंतर, आज वाराणसीचा अनुभव घेत फिरत होतो. सगळीकडे फिरून झाल्यावर एका ठिकाणी घाटावर निवांत बसून, आजू-बाजूच्या चहल-पहल बघत बसावं. बोटीतून फिरवून आणणारे, मालिशवाले येऊन तंद्री मोडतात. सगळ्यांना नाही म्हणत म्हणत धोबी घाटा जवळ येऊन बसलो होतो, तिकडे विनोद पाटीलशी ओळख झाली. त्याचं वाराणसी मधलं काम आटोपून तो घाट फिरायला आला होता.

जेवतांना त्याने सहज गंमत सांगितली, ज्या हॉटेल मध्ये त्याची राहण्याची सोय केली होती, तिथे त्याला भयाण अनुभव आला. आदल्या रात्री त्याला जाग आली तेंव्हा, लाईट चालू होता. दोन-तीन वेळा त्याने उठून लाईट बंद केला. शेवटी, काय गडबड आहे म्हणून खाली जाऊन रखवालदाराला विचारलं. रखवालदाराने सांगितलं की त्या खोलीत ३-४ महिन्यांपूर्वी एका बाईने पंख्यावर गळफास लावून घेतला होता. तेंव्हा पासून तिथे असे काही किस्से होत असतात. सकाळ पर्यंत पाटील साहेब मग receptionवर बसून राहिले. आता हे सांगण्यामागे कारण तसं खास नाही. ही गोष्ट ऐकून मी विसरून पण गेलो, पण एखादी गोष्ट तुमच्या sub-conscious mind मध्ये कशी जाऊन बसते ते पुढे सांगीन.







नान-सेन्स - १

22 November 2011 वेळ: Tuesday, November 22, 2011


(When things ain't just नान-सेन्स... they are Absolute नान-सेन्स :D)

(नान-सेन्सिबली) Yours,
Saurabh

दिवाळी...

04 November 2011 वेळ: Friday, November 04, 2011
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... Happy Diwali... Happy Diwali...

गुंड्याः अय, बंड्या... काय रे?! कोणत्या दुनियेत राहतोस??

बंड्याः का रे??

गुंड्याः दिवाळी संपली आणि आता शुभेच्छा देतोय्स?!!

बंड्याः अरे हा.. जाऊदे रे. कालच माचाफुकोने दिवाळीचे फोटो एडिट करुन दिले. म्हणुन म्हटलं चला टाकूया ब्लॉगवर. तसंपण बरेच दिवस ब्लॉग सन्नाट्यात होता.

गुंड्याः सन्नाट्यात होता!!!??? आणि आता तु काहीतरी पोस्टुन त्याला सन्नाट्यातुन बाहेर काढतोय्स.

बंड्याः हाऽऽऽ :-)

गुंड्याः बरय. चालू दे.. माझ्यातर्फेपण सगळ्यांना Happy वाली D-वाली.

याऽऽऽय... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी... दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी...




आपला,
(शुभेच्छुक) सौरभ


AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates