मेंढा तसं एक भारतातील इतर गावांसारखा गाव, गडचिरोली पासून ३० एक किलोमीटर वर मेंढा आहे. बस अगदी आतपर्यंत येत नाही. कंडक्टरला "लेखा" जवळचा मेंढा मात्र लक्षात ठेऊन सांगा. ते काय आहे, जवळ पास २-३ मेंढा नावाची गावं आहेत.
असो, ह्या गावाबद्द आधीपण ऐकलं होतं. इकडे १९८७ पासून consensus democracy practice केली जातेय. सर्व अडचणींचा इलाज एकत्रित येऊन हे गावकरी करतात.
हे गावकरी म्हणजे गोंड राज्याची प्रजा आहे. मूळ व्यवसाय ह्यांचा शेती आहे. मराठी बोलता येते.
हे गावकरी म्हणजे गोंड राज्याची प्रजा आहे. मूळ व्यवसाय ह्यांचा शेती आहे. मराठी बोलता येते.
चरणदास आणि सदुभाऊने आमचं स्वागत केलं. इकडे नमस्कार करायची एक वेगळीच पद्धत आहे! आधी हात मिळवण्यासाठी दोन्ही हात पुढे करावे, आणि समोरच्याचे हात धरून (शेक न देता) नमस्कार करतात. दोघांनी मिळून आमची खूब मेहमान नावाझी केली. मग गाव फिरतांना सदु आम्हाला माहिती पुरवत होता. सदूच्या खांद्यावर एक शबनम पिशवी पण होती. त्यात एक वही, आणि काही कागद होते. एका ठिकाणी त्याने बोलता बोलता त्याच्या वहीत कसली तरी नोंदपण केली. गावकरी तसे आप-आपसात गोंडी बोलत. आता माझापण कान गोंडी भाषेला रुळला, थोडीफार मला समजू लागली होती. मिहीरला हि भाषा काही नवीन नव्हती. गावातल्याच एका घरात मग आमची जेवायची पण सोय झाली. जेवतांना सदु सांगत होता, कोणी गृहस्थ आले असतांना त्यांनी आपली सहानुभूती दाखवली. पण त्यांना त्याचा कसलाच खेद नाहीये. उलट शहरातले लोक रोज एकाच ताटात जेवतात, आम्ही रोज नवीन ताटात जेवतो!!
शिक्षणाचं महत्व पटलेली हि लोकं आहेत. ह्यांची मुलं आता आपल्याला काय जमत ह्याचा अनुमान घेऊन आपला धंदा निवडतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावात न कोणी आमदार, न कोण खासदार. बरोबरच आहे तसं ह्यांचं. सालं एकदा का आपण त्या "लोचटाला" निवडला, कि आपली देशाप्रती जबाबदारी संपली? जितकं पेराल, तितकाच उगवेल ना? मग तुम्ही एक दिवस काढला, आणि बदल्यात तुम्हाला एक रांगत पुढे जाणारा देश बघायला मिळतो!
गावात एक गोटुल उभारलाय. बऱ्याच बैठकी, कार्यक्रम इकडेच होतात. सुरवातीला गोटुल बांधतांना झालेला किस्सा ऐकून मज्जा आली.
"फोरेष्टवाल्यांना गोटुल बांधणं मान्य नसल्याने त्यांनी नोटिश पाठवली." मग ते गोटुल पाडलं, त्यावर थंड रित्या गावाने निषेध नोंदवत अजून १२ गोटुल उभे केले. पडलेल्या प्रत्येक गोटुलचं उत्तर १२ गोटुल उभारून द्यायचं असा गावकऱ्यांनी ठरवलं. शेवटी एकदाचे फोरेष्टवाल्यांनी हात टेकले. तसं सर्वांमध्ये एकी आहे, आणि विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी एक स्वतंत्र pannel आहे. गांधीवादी विचार असलेल्या ह्या गावाला आजवर ना तिथल्या नक्षलवाद्यांचा त्रास झाला, ना सरकारकडून.
"फोरेष्टवाल्यांना गोटुल बांधणं मान्य नसल्याने त्यांनी नोटिश पाठवली." मग ते गोटुल पाडलं, त्यावर थंड रित्या गावाने निषेध नोंदवत अजून १२ गोटुल उभे केले. पडलेल्या प्रत्येक गोटुलचं उत्तर १२ गोटुल उभारून द्यायचं असा गावकऱ्यांनी ठरवलं. शेवटी एकदाचे फोरेष्टवाल्यांनी हात टेकले. तसं सर्वांमध्ये एकी आहे, आणि विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी एक स्वतंत्र pannel आहे. गांधीवादी विचार असलेल्या ह्या गावाला आजवर ना तिथल्या नक्षलवाद्यांचा त्रास झाला, ना सरकारकडून.
"दिल्ली, मुंबईत आमचीच सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार"
गावात एखादी समस्या असेल, तर तिचं समाधान गावकरी मिळून करतात. अश्यातच गावासाठी एक शाळा उभी केलीये, एक गेस्ट हाउस, रस्त्याच्या कडेचे दिवे, आणि आपण आपल्या गल्लीतला दिवा काम नसेल करत तर पालिकेला २ शिव्या घालून दुर्लक्षच करतो. कधी फावला वेळ असेल तर एखादा खरमरीत पत्रपण लिहतो (हि पत्रं आपला frustration काढायला लिहल्या सारखे असतात!).
मोहल्ला मिटिंग |
रोज संध्याकाळी मोहल्ला मिटिंग असते, ग्रामसभेमध्ये मोहल्ला मिटिंगमध्ये ना सुटलेले विषय फोडले जात. गावात आज एक मध गोळा करून, गळून, बाटलीत सील करण्याकरता लागणारी सामग्री आहे. गावातील skilled workers बांबू पासून शोभेच्या वस्तू बनवतात. unskilled workers मात्र उद्बत्तीला लागणाऱ्या काड्या काढतात. देवाजी काकांनी हे चित्र साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज मेंढा लेखा बरोबरच आजूबाजूची पण बरेच गावं पुढे होऊन consensus democracy अंमलात आणत आहेत.
आतापर्यंत गाव फिरवून दाखवणारे सदुभाऊ आणि चरणदास अगदी गाडी मिळेपर्यंत हायवेवर थांबले. मे महिन्यात चरणदासचं लग्नाचं आमंत्रण आहे!
धनोरा बाजार:
आपला,
(मेंढाळलेला) माचाफुको