आज काठमांडू मधल्या लहान - मोठ्या गल्ल्या फिरून यायचं ठरवलं. थामेल
मधली रौनक संध्याकाळी बघण्यासारखी असते. सुरवात परत एकदा गौशाला कडून
करायची होती. पशुपतीनाथचं मंदिर बाय-पास करून सरळ घाटावर जाऊन सकाळचा वेळ
काढावा म्हंटलं. पशुपतीनाथ मंदिर हे बागमती नदी किनाऱ्यावर आहे. मंदिराच्या
मागे घाट आहे. मंदिरात शिव लिंगावर होणाऱ्या अभिषेकचा तीर्थ एका गोमुखातून
बागमती नदीत वाहत जातं. हिमालयातून वाहत येणाऱ्या ह्या नदीत आता
दुनियाभरच्या गोष्टी निर्माल्यच्या नावाखाली येऊन पडतील. नदीचा आणि
प्रदूषणाचा ही पहिली भेट. एका बाजूने एक प्रेत आले. जमलेल्या गोऱ्यांना
"हिंदू क्रिमेशन" म्हणून त्यांच्या गाईडने सांगितलं. थंडीमधे सकाळी सकाळी
वैतागून गाईडला पैसे दिले आहेत म्हणून निघालेली युरोपीयन म्हातारी पण थोडा
रस घेऊन "हिंदू क्रिमेशन" पाहू लागली. बऱ्याच जणांना त्याचा विडियो रेकॉर्ड
करावसा वाटला. त्यात एकाच्या गळ्यात २ भारीतले SLR दिसले. 70-200 mm एल
सिरीजचा वापर एका अंतिम क्रियेचे फोटो काढण्यासाठी उपयोगी पडतांना बघून मला
पण हसू आलं. घाटाच्या ह्या बाजूला कुज-बुज वाढू लागली. कोणाला कशाचं
कुतूहल वाटेल हे सांगणं खरंच मुश्कील आहे. हा माणूस, ह्या "हिंदू क्रीमेशन"
चे फोटो काय म्हणून दाखवणार आहे कोण जाणे. तरी नशीब इथे प्रेत नदीत सोडून
द्यायची पद्धत बंद केलीये.
समोर मंदिरात आरती संपत आली, मी तिथल्या ढोंगी साधूचे फोटो घेतले. एका परदेशी पर्यटकाने २-३ साधू गोळा केले होते. त्यांना पैसे देऊन, फोटोसाठी पोज द्यायला लावत होता. त्याचा गाईड - हूडचं काम करत होता. मी मनात ठरवून ठेवलं, ह्या साधूने आपल्याला पैसे मागितले तर त्याला पैश्यांच्या मायेत अडकू नाही द्यायचं. त्यातल्या एकाने मला विचारलं "which country?" आणि मला globalization ची जाणीव झाली! स्वतः ला नागा साधू म्हणवणारा इंग्रजाळलेला होता. मी त्याच्याशी गप्पा मारत त्याचे फोटो काढत बसलो.
परत जातांना वाटेत एक नागा साधू भेटला. त्याच्याशी बऱ्याच गप्पा रंगल्या. त्याची तपस्या अजून सुरु झाली नव्हती. त्याचे भ्रमण अजूनही सुरु होते. त्याने तपस्या करण्यासाठी एक जागा पण बघून ठेवली होती. "मै पढा-लिखा नही, मगर आंखो से देखकर सब समझ लिया |" त्याच्या कडून बरंच काही समजलं. म्हणे बनारस (वाराणसी) मधे गंगा पोहत पार केली तर स्वर्ग दिसतो. सगळे देव एकत्र बसलेले दिसतात. हा काय नवीन किस्सा आहे? कदाचीत तो रुपकात्मक अलंकार वापरात आहे. खरोखर स्वर्ग नसून, त्यात काही वेगळं कारण असेल. मी माझ्या सोईचा अर्थ लावला. मोघलांच्या हल्ल्या पासून मूर्त्या वाचवण्यासाठी, त्यांचं विसर्जन गंगेत केलं असावं. सगळे देव-देवता जिथे एकत्र येतील तिथे स्वर्ग उभं करणारा हा साधू मनोवेधक वाटला. मी मुक्तीनाथ होऊन आल्याचं कळताच, मुक्तीनाथ बाबाला शालीग्राम देण्याचा विषय काढला. शालीग्राम कधी विकत घ्यायचा अथवा द्यायचा नसतो. तो स्वतः जाऊन वेचावा लागतो. तो त्याच्या प्रवाहात बोलत होता. जे समजलं ते लक्षात ठेवलं. नर्मदेचा विषय निघताच, त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितला. नर्मदेच दर्शन करून आलेल्याचा आशीर्वाद घ्यावा म्हणे. मी पण संकोचत त्याच्या जटाधारी डोक्यावर हात ठेवला. त्याने त्याच्या पिशवीतून कसलीशी पांढरी भुकटी काढली, अन् कपाळाला लावली. मग मी पण त्याचे काही फोटोज घेतले. गप्पांमध्ये बराच वेळ पळाला होता, खैर मला इथे कसलंच वेळापत्रक नसल्याने फरक पडत नाही.
आज भक्तापूर ऐवजी स्वयाम्भुनाथला जाऊन यायचं मनाशी ठरवलं. माय्क्रो पकडली. स्वयाम्भुनाथ हे सगळ्यात जुनं स्तूप आहे. वर पर्यंत रस्ता जातो, पण त्यासाठी वर जाणाऱ्या बसची वाट बघत बसावं लागलं असतं. त्यापेक्षा पायऱ्या चढून लवकर पोहचलो. इथे बरेच चित्रकार होते. बऱ्याच जणांचे स्टुडियो होते. तिथे बसल्या बसल्या हिमालयाचे नजरे त्यांच्या कॅन्वासवर उमटत असतांना बघून मजा वाटली. काठमांडू शहराचा पसारा इथून दिसतो. इथे सोलापूर होऊन आलेले कित्तूर भेटले. ते साठ माणसांच्या गटात, कुठल्याशा travel agency बरोबर आले होते. ते कुठल्याशा travel agency बरोबर आले होते. त्यांनी आपल्या इतर साथीदारांशी ओळख करून दिली. सगळ्यांनी मला रात्री महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जेवायचं आमंत्रण दिलं. रात्रीचे परतीचे वांदे नको म्हणून मी नेपाळी जेवणात सुख मानलं. बाग बाजार पासून चालत थामेलला आलो. चालत जायला वेळ लागतो, मात्र इतकं सगळं बघितल्यानंतर पचवतापण आलं पाहिजे. आपलं चालतांना हे सगळं रवंथ करायला बराच वेळ मिळतो. आता इथले रस्ते नीट समजले आहेत. नकाश्याची गरज पडत नाही. थामेलच्या गल्ल्या तसे फार confusing, पण हळू हळू सवय पडते. चे-गुवेरा, बॉब मार्ली, गन्स अन् रोसेस, लेड - झेप्प्लीन ची चित्रं असलेले ध्वज विकायला ठेवले होते. इथे पण बाजारात फिरतांना खोटं-खोटं हसून "हेलो, कम इन प्लीज" म्हणणारे दुकानदार चुकवत फिरावं.
आज नेपाळी जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. डोळ्यावर झोप आली अन् रूम कडे पाउलांनी रूमची वाट धरली. रूम मधल्या भूताची मात्र आता भीती निघून गेली होती. पडल्या पडल्या झोप लागली.
रूम मधल्या भूताची मात्र आता भीती निघून गेली होती. पडल्या पडल्या झोप लागते.