काल भले ही पुण्यातली रौनक कमी वाटत होती, तरी सूर्यास्त कुठे ही कमी पडला नाही.
पुण्यातली एक संध्याकाळ
30 September 2010
वेळ:
Thursday, September 30, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
|
7
प्रतिक्रिया
|
सिरीयल इथे संपत नाही
25 September 2010
वेळ:
Saturday, September 25, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
सिरीयल इथे संपत नाही, कुंकू नंतर लज्जा येते
कोसंबी संध्याकाळी गातो, तुझ्या पायी मी ते पहिले
सिरीयल इथे संपत नाही..
ते vamp चे बघणे इर्षेचे, ती कुटिल हास्याची माया
कार्यक्रम बघून थकलो आपण, तरी उद्या पुन्हा बघावा
सिरीयल इथे संपत नाही....
ते बोल दुष्ट आणि भडकपणाचे, दिवस बिघडवून गेला
(कुंकू मधल्या) जानकीच्या मूर्खपणा बघून येते मजला दया
सिरीयल इथे संपत नाही
ह्या दुनियेतील अवघ्या घरातील गुणगुणते दुखं आहे
हे संपता संपत नाही रटाळ पण सिरीयलचे
सिरीयल इथे संपत नाही.
(ग्रेस ची माफी मागून)
मधे सुट्ट्यांमध्ये मी टी.वी ला एक्स्पोझ झालो. काय भयंकर कार्यक्रम दाखवतात हो....
कोसंबी संध्याकाळी गातो, तुझ्या पायी मी ते पहिले
सिरीयल इथे संपत नाही..
ते vamp चे बघणे इर्षेचे, ती कुटिल हास्याची माया
कार्यक्रम बघून थकलो आपण, तरी उद्या पुन्हा बघावा
सिरीयल इथे संपत नाही....
ते बोल दुष्ट आणि भडकपणाचे, दिवस बिघडवून गेला
(कुंकू मधल्या) जानकीच्या मूर्खपणा बघून येते मजला दया
सिरीयल इथे संपत नाही
ह्या दुनियेतील अवघ्या घरातील गुणगुणते दुखं आहे
हे संपता संपत नाही रटाळ पण सिरीयलचे
सिरीयल इथे संपत नाही.
(ग्रेस ची माफी मागून)
मधे सुट्ट्यांमध्ये मी टी.वी ला एक्स्पोझ झालो. काय भयंकर कार्यक्रम दाखवतात हो....
एक कुंकू नावाची सिरीयल आई बघते, त्यात मृण्मयी देशपांडे - जानकी नावाची प्रचंड मंद भूमिका निभावतेय.
ह्या जानकीची खासियत म्हणजे, तिला पहिल्या झटक्यात काहीच झेपत नाही.
मग तिची पहिली लाईन - "तुम्ही काय बोलताय मला काहीच काळात नाहीये."
अशा सिरीयल बघतांना आश्चर्य वाटतं. मनोरंजन म्हणून कोणा तिसर्याच्या घरातली लफडी बघण्यात कसला आनंद?
माणसाची आवड इतकी का खालावली?
ह्या सिरीयल पासून मुक्ती म्हणून मग तो कॉमेडी शो लावला.
आजकाल कॉमेडी बघणं म्हणजे एक उदाहरण देतो -
तुम्हाला एक १० चाकू दिले, ह्यात किमान ९ तर बिन धारेचे असणार.
तेवढ्या एका धारवाल्या चाकू साठी उगाच ९ बोथाड चाकू सहन करावे लागतात.
कधी कधी तर १० पैकी १० चाकू बोथाड असतात.......नॉन-सेन्स साला.
त्यात भर म्हणजे २-३ भोचक पोरं असतात कॉमेडी करायला.
ठीक आहे मान्य आहे कि हि पोरं स्टेज-फिअर न बाळगता कार्यक्रम सदर करतात.
पण मी हे मनोरंजन म्हणून का बघावा. कॉमेडी सर्कस नावाच्या कार्यक्रमात एक भोचक पोट्टी - सलोनी.
राहून राहून वाटतं हिला २ चमचे शेंदूर खाऊ घालावं आणि गप्प गुमान तिला वयाला शोभेल असा वाग म्हणावं.
मग येतात गाण्याचे कार्यक्रम. कधी लहान मुलं, तर कधी मोठे लोक. गाण्यांच्या स्पर्धा १२ महिने पाहायला मिळते.
हे भल्या माणसांनो, घर बाहेरची स्पर्धा कमी आहे का? म्हणजे दिवसभराची झुंज गोड करायला, डझनभर गाणाऱ्या माणसांची स्पर्धा बघावी.
सरळ एक ६-६ पोरांना बोलवा आणि एक एक आठवडा फक्त गाऊ देत त्यांना.
कशाला हवी स्पर्धा, आणि कशाला हवे ते एलिमिनेशन.
न्यूज लावा. कृत्रिम रंग असलेला कलिंगड, जबरदस्तीने पिकवलेले आंबे, झेंडूचा रस लावलेलं खरबूज आणि गळ्यात खाजवणारी मोसंबी.
वाह सामान्य ज्ञानात काय भर पडली! हे दाखवून समाधान नाही होत म्हणून मग सिरीयल मधे काय सुरु आहे ते हि दाखवतात.
थोडक्यात "back to square one" आणि आपण तेच द्वेष, इर्षा भडभडून दाखवणाऱ्या मालिका बघत वेळ मारतो.
बाबा तर म्हणतो - बातम्या नसतील तर सरळ तसा एक स्क्रोलर टाकावा - "आज काही विशेष बातम्या नाही"
साले शेवटी सगळे टी.आर.पी मिळवण्याची खटाटोप.
आणि आपण ते का बघतो आपल्याला हि नाही माहिती.
मग अशा परिस्थितीत टी.वी विकायच्या टोकाच्या निर्णयावर पोहचू नका.
मनोरंजनासाठी जाहिराती बघा!
|
8
प्रतिक्रिया
|
आजची पहाट
23 September 2010
वेळ:
Thursday, September 23, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
काल विसर्जनाच्या गोंगाटातून निसटलेली एक पहाट, चंद्राने माहोल तयार केला होता. नेमके ढगांचा कापूस कुठूनसा उडत आला....
तरी, तुम्हा सर्वांना "सकाडी-सकाडी" गुड मॉर्निंग!!
|
6
प्रतिक्रिया
|
आजचा दिवस....
20 September 2010
वेळ:
Monday, September 20, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
आज बझ्झ वर कांचन-ताईचा पोस्ट - "चोरी पे चोरी " वाचत होतो. त्यात शेवटची नचिकेतची प्रतिक्रिया होती - "एक पर्याय असाही आहे की आपल्या पोस्टमधला काही भाग मधूनअधून गूगल सर्च करत रहायचा." सहज मजा म्हणून मी एक - दोन पोस्ट मधले काही भाग गूगल करून बघितले! आश्चर्य - माझेही काही पोस्ट मला न कळवता एका-दोघांनी रिप्रोड्यूस केले होते.
मग मला हसू आलं -
सौरभ म्हंटला कि त्यांना एक मेल कर, आणि कळव.
मनात आलं मेल मध्ये लिहावं - "हम अभी तक जिंदा है"
मग म्हंटल असू देत कशाला उठा - ठेव. कुठलं मोठं साहित्य लिहलं आहे.
पण मग लक्षात आलं कि मी पण सौरभ, केतकी, दगडू, दीप्ती च्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय वाचून भारावून जायचो.
पुढे लिहण्यासाठी हुरूप यायचा.
मग लिहायला काही सुचत नसेल तर एखाद्या किस्स्याला फोडणी टाकून पोस्ट करायचो. (मी मसाला नाही बोललो, फोडणी बोल्लोये हे लक्षात घ्या)
क्यों ना - स्वतःच्याच एखाद्या अश्या पोस्ट च्या प्रतिक्रियेत लिहावं -
"काय टुकार लिखाण आहे"
स्वतःच्याच ब्लोग पोस्ट वर हे लिहायला माझ्या बापाचं नाव करमचंद नाही.
पण स्वतःच्याच एखाद्या पोस्ट चे धिंड काढायला मजा येईल नाही?
मग थोडासा अहंकार कुरवाळत, हळूच एखाधी हास्याची उकळी लपवत थोडी शब्दांची जुळवा जुळाव केली.
आणि किलिक केलं सबमिट.
मला माहिती नाही, कि मी हा पोस्ट का कंपोज करतोये?
कोणाची नावं टाकणार नाहीये, ना कोणाच्या ब्लॉगचे पत्ते. ना कुठले पुरावे, ना रजनी-देवा कडे शिकायत.
रोज एक पोस्ट टाकायचा चास्काच लागलाय जणू.
आज रजनीकांत बद्दल लिहून तेच ते पणा आला, म्हणून विषय-पालट केला.
मगाशी एकाचा रिप्लाय आला -
मग थोडी मेलांची (मेल चं अनेक वचन) देवाण घेवाण झाली.
कोण जाणे कदाचित आमची मैत्री पण होईल.
उद्या पासून त्याच्याही प्रतिक्रिया येणं चालू होईल.
वाट बघतोये रे मित्रा!!
|
4
प्रतिक्रिया
|
"Inception" & "C" Programming
19 September 2010
वेळ:
Sunday, September 19, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
हा चित्रपटाचा रिव्ह्यु नाही. Inceptionचा रिव्ह्यु लिहण्याची सध्यातरी माझी लायकी नाही.
हॉलिवुडचे काही चित्रपट नुसते मनोरंजन किंवा कला ह्यापुरते मर्यादित नं रहाता त्या परिसीमा पार करुन विज्ञानाचा एक अभ्यासपट म्हणुन समोर येतात. तो चित्रपट पाहताना एखाद्याने त्याच्या/तिच्या PHD रिसर्चची थेसिस डिफेन्ड केल्याचा भास होतो. Inception त्यापैकीच एक.
ख्रिस्तोफर नोलान... काय म्हणावं मी. थोर आहेस तु (हे प्रेमाने केलेलं अरेतुरे आहे). मला सर्वात जास्त कौतुक एका गोष्टीचं वाटतं ती म्हणजे, हे लोक एखादी (काल्पनिक/अभुतपुर्व/जटिल) कल्पना करतात आणि ती लोकांसमोर "समजेल अशी मांडतात". अशी कल्पना "मांडणं" हे आणि फक्त हेच खरं कौशल्य आहे. तर ह्याची संकल्पना एकंदर अशी आहे की...
कोणाच्याही डोक्यातली गुपितं त्याला शारीरीक इजा नं पोहचवता त्याच्या स्वप्नांमधे जाऊन, ती त्याची स्वप्न नियंत्रित करुन काढुन घेणं. आणि एवढेच नव्हे तर त्याच्याच त्या नियंत्रित केलेल्या स्वप्नांमधे जाऊन, त्याच्या सुप्त मनामधे आपली कल्पना रुजवणे. बरं आणि हे करताना अश्या पद्धतिने करायचं की स्वप्न बघणाऱ्याला वाटावे स्वप्न आणि कल्पना दोन्ही त्याच्याच आहेत.
पण हे असं का करायच? म्हणजे असं स्वप्नात जाऊन असले उद्योग कशासाठी? कारण - वेळ. भौतिक जगात अनन्य महत्व असलेली - वेळ. ह्या वेळेला तुम्ही थांबवु शकत नाही, ना तिची गती कमीजास्त करता येते. त्यामुळे एखाद्या कामासाठी लागणारा कालावधी कमी असेल तर??? पण मग त्यात एखाद्याची स्वप्न कशी काय मदत करु शकतिल??? हांsss... तर हिच आहे ह्या सिनेमाची स्टोरी.
स्वप्नांमधे (म्हणजे स्वप्न बघताना) एखाद्याचा मेंदु प्रचंड गतीने कार्यरत असतो. त्यामुळे होतं काय की ह्यामुळे वेळ मंदावली जाते. भौतिक जगातील एक सेकंद हा स्वप्नांमधे काही तासांएवढा होतो. मग समजा जर मी स्वप्नात स्वप्न पाहिलं तर??? पहिल्या पातळीवर (पहिल्या स्वप्नात) एका सेकंदाचे काही तास, दुसऱ्या पातळीवर (पहिल्या स्वप्नातल्या स्वप्नात) त्या तास काही दिवस होतिल आणि पुढच्या पातळीवर त्या दिवसांच रुपांतर काही वर्षांमधे... म्हणजे मला एखादं काम काही सेकंदात करणं अशक्य असेल तर मी तिसऱ्या पातळीवरच्या स्वप्नांमधे जाऊन त्यासाठी काही वर्ष एवढा मोठ्ठा कालावधी मिळवु शकतो. शिवाय हि स्वप्न एखाद्याची विचारसरणी/वागणुक पुर्ण बदलु शकतात. त्यामुळे जर मी त्याचं स्वप्न त्याच्या नकळत नियंत्रित केलं (स्वप्नांना सुरुवात आणि अंत नसल्याने ती नियंत्रित करता येऊ शकतात) तर मी त्याला एक पुर्ण नवा माणुस बनवु शकतो. ब्रेनवॉशसारखं वेळखाऊ काम मी अतिशय कमी वेळात करु शकतो. भाsssरी.... बरं हि स्वप्न नियंत्रित करणं म्हणजे काय जॉयस्टिक हातात घेऊन व्हिडिओगेम खेळण्याइतकं सोपं नाही. चित्रपटातल्या कहाणीनुसार तिसऱ्या पातळीवरची स्वप्न (तिसरी पातळी म्हणजे maximum limit) खुप अनस्टेबल असल्याने नियंत्रित करणं खुप कठिण... जवळपास अशक्य. ताळमेळ चुकला तर व्यक्ती स्वप्नातुन बाहेर येईल पण प्रचंड मानसिक धक्का घेऊन किंवा त्याच स्वप्नांमधे कायमची अडकुन जाईल. पण चित्रपटातला हिरो ह्याच्या कैक कैक पार... पाचव्या पातळीवरच्या स्वप्नात जातो.
Inception चित्रपटाची बांधणी अप्रतिम आहे. Open end असलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे मुव्ही पाहुन झाल्यावर तुम्ही चर्चाचर्वण करुन रवंथ करणार हे नक्की.
हम्म्म... पण मी हे सगळं लिहितोय का? पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाबद्दल, तेपण "Inception"बद्दल? कारण मला ह्या चित्रपटाचा कन्सेप्ट "C" Programming सारखा वाटला (to some extend - only time factor is missing). How? well, now to understand what I say, you should at least have basic knowledge of "C" Programming. "C" languageमधे एक "Pointer" म्हणुन कन्सेप्ट आहे. हा एक असा variable आहे जो "memory address" स्टोअर करतो.
उदा.:
int x = 10; //variable 'x' has value 10 stored in it
int *y;
y = &x; //now 'y' is a Pointer, pointing to memory address of 'x'
print x; // output: 10
print y; // output: 0012FEDC
print *y; //output: 10
// *y same as *(&x), also read as value at address of x, which is 10
पण तरी हा फंडा Inceptionशी रिलेटेड कसा?
कारण १:
Inception चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एखाद्याच्या स्वप्नांद्वारे त्याचे सुप्त मन नियंत्रित करुन त्याची मुळ विचारसरणी किंवा व्यक्तिमत्वच बदलता येऊ शकतं आणि होणारा हा परिणाम कायमस्वरुपी असतो.
Pointerने सुद्धा एखाद्या variableची value कायमचीच बदलते. ह्याला scope resolution असंपण म्हणतात.
उदा.:
{ // first scope starts
int x = 10; // value of x in first scope
print x; // output: 10
{ // second scope starts
x = 5; // value of x in second scope
print x; // output: 5
} // second scope ends which discards everything within it
print x; // output: 10
} // first scope ends
वरच्या उदाहरणावरुन तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या scopeमधे मी 'x'ची value बदलली. पण तरी दुसऱ्या scopeमधुन बाहेर आल्यावर 'x'ची value पुन्हा 10च झाली.
हेच जर मी Pointerने केलं तर काय होईल बघा...
{ // first scope starts
int x = 10; // value of x in first scope
print x; // output: 10
int *y;
y = &x;
print *y; // output: 10
{ // second scope starts
*y = 5; // *(&x) read as value at address of x = 5
print x; // output: 5
} // second scope ends
print x; // output: 5
} // first scope ends
आता इकडे मी 'x'ची value बदलली नाही, तर जिकडे स्टोअर केलाय त्या ('x'च्या) memory addressवरची बदलली. त्यामुळे दुसऱ्या scopeमधुन बाहेर आल्यावर 'x'मधे त्या memory addressवरची नविन value असेल.
आता हे झालं बेसिक. Incetionमधे कसं स्वप्नात स्वप्न आणि त्याच्या आत पुन्हा स्वप्न दाखवलय तसंच इकडेपण pointerला pointer आणि त्या pointerचा pointerपण define करु शकता.
म्हणजे पहिल्या levelवरचा pointer एखाद्या variableचा memory address store करतो. (ह्याला हाताळतानाच तोंडाला फेस येतो.)
int x;
int *y;
y = &x;
दुसऱ्या levelवरचा पहिल्या levelच्या pointerचा memory address store करतो.
int x;
int *y;
y = &x;
int **z;
z = &y;
तिसऱ्या levelवरचा दुसऱ्या levelच्या pointerचा memory address store करतो.
int x;
int *y;
y = &x;
int **z;
z = &y;
int ***i;
i = &z;
पण अजुन मला नाही वाटत कोणी तिसऱ्या पातळीवरचा pointer वापरला असेल. कारण programmingमधे पहिल्या levelवरचा pointerच प्रोग्रॅमर्सची level लावायला पुरेसा आहे. दुसऱ्या levelला तर programmersची १००% फें फें उडालेली असते.
कारण २:
चित्रपटानुसार माणसाच्या ह्या स्वप्नसाखळीचे दुरगामी कायमस्वरुपी परिणाम त्याच्यावर होत असल्याने, समजा त्याच्या स्वप्नात काही अघटीत घडलं (समजा तो मधल्याच एखाद्या स्वप्नात मेला) तर पुढच्या आणि मागच्या स्वप्नांचा संपर्क तुटेल आणि तो स्वप्नातुन बाहेर आला नाही तर खऱ्याखुऱ्या जगात तो कोमामधे जाऊ शकतो. तसं झाल्यास बाहेर काढण्यासाठी त्या स्वप्नात किंवा त्याच्या पुढच्या पातळीवरच्या स्वप्नात जाऊन योग्य क्रमाने आणि पद्धतिने स्वप्न संपवणं गरजेचं आहे.
Pointers हाताळतानापण अशी काळजी घेणं गरजेचं असतं. नाहितर त्या pointerचा "Dangling Pointer" होतो. Dangling Pointer म्हणजे असा pointer जो चुकिच्या (वापरात नसलेल्या) memory addressला point करतो. अश्या pointerमुळे अकारण memory space खाल्ली जाते आणि प्रोग्रॅम क्रॅशदेखिल होऊ शकतो.
उदा.:
{ // first scope starts
int *x;
{ // second scope starts
int y;
x = &y;
} // second scope ends, y falls out of scope
// x is now a Dangling Pointer pointing to deallocated memory of y
}// first scope ends
हा तर पहिल्याच levelवरचा होता. अजुन complex pointerअसता आणि मधलाच कोणता pointer गंडला तर तुमचा प्रोग्रॅम बोंबल्लाच समजा. अश्या प्रॉब्लेमला टाळण्यासाठी ज्या scopeमधे pointer define केला त्या scopeमधुन बाहेर येण्यापुर्वी त्याला Nullify करावा.
उदा.:हुश्श्श्श... झेपलं का काही??? नसेल तरी हरकत नाही. मीच पुर्ण गोंधळलेलो लिहतालिहता... ख्रिस्तोफर नोलानने एवढा कठिण विषय इतक्या सहजपणे कसा काय चित्रित केला आश्चर्यच आहे. असो... पण Inception बघा नक्की.
{ // first scope starts
int *x = NULL;
{ // second scope starts
int y;
x = &y;
/* ... */
x = NULL;
} // second scope ends, y falls out of scope
// x is no more a Dangling Pointer
}// first scope ends
आपला,
(Dangling) सौरभ
Posted In
Inception
|
23
प्रतिक्रिया
|
रजनी भक्तीचा राजमार्ग
वेळ:
Sunday, September 19, 2010
| लिहिणारा/री/रे:
Aakash
आज रजनी देवा बसवण्याचे नियम लिह्ण्यापेक्षा जरा गप्पा माराव्या म्हणतो. रोज नियमावली पोस्ट करत राहिलो, तर हि भक्ती उर्फ परंपरा थोडी रटाळ वाटेल.
आता सुरवात आभार मानून करतो. स्टार गोल्ड ह्या वाहिनीने आमच्या विशेष मागणीवरून आज देवाजींचा "शिवाजी - द - बॉस" दाखवण्या बद्दल, तमाम रजनीकांत भक्त स्टार गोल्डचे आभारी आहेत.
बऱ्याचदा आम्ही देवाजींच्या भक्ती - योगाचा आस्वाद घेत असतांना त्यांच्या महत्तेत बुडून जातो.
नास्तिकांना देवाजींची महत्ता हा थट्टेचा विषय वाटतो, तुम्हाला आज काही माझे विचार मांडतो.
देवाजींची कर्म असे बंधनकारक आहेत, कि हा प्रांत कसा बांधल्या जातो बघा -
आपण देवाजींचे चित्रपट बघतो, संत चीरांजीविंचे, संत नागार्जुन, संत एन.टी राम राव जुनियर ची चित्रपट पण बघतो. जरी देवाजी आणि इतर संत वेग-वेगळ्या भाषेतल्या चित्रपटांमध्ये अभिनय करतात, तरी आपण ह्या सर्व चित्रपटांना साउथ - इंडियन चित्रपट म्हणून ओळखतो. हाच तो माझा मुद्दा! आपल्याला आंध्र, कर्नाटक, तमिळ नाडू सगळा एक कॉम्बिनेशन प्रांत वाटतो. कोणी मद्रासी नाही, कोणी आण्णा नाही. आपल्यासाठी सगळे साउथ इंडियन! सगळे एक!
आपल्याला बुवा भेद भाव आवडत नाही. राज ठाकरेंना देवाजींची दीक्षा दिल्यास सरकारी मालमत्ता न पेटता आपल्या सेवेत हजर असू शकते.
(** नोट: नागार्जुन, चिरंजीवी हे रजनी देवाचे भक्त आहेत. ह्यांचा उल्लेख संत म्हणूनच करावा. देवाजींनी स्वतः संत नागर्जुनला स्वप्नात दर्शन देऊन आपले I.I.T चे शिक्षण संपवून मग M.I.T - अमेरिका येथून करण्याचा सल्ला दिला.)
देवाजीचं मानणं आहे कि माणसांना माणसा सारखं वागवा. मानवहित बघून एखादा निर्णय घेतात. एक महान अभिनेता झाल्यावर पण नखभर अहंकार दिसून येत नाही.
ह्यामागचे कारण असे कि देवाजी आधी carpenter होते मग कुली अन मग कंडक्टर मग अभिनेता आणि सरतेशेवटी देव (ह्याच जन्माबद्दल बोलतोये मी). आता इतके काबाडकष्ट करून आलेला माणूस आपण लोकांना किती जवळचा वाटतो. देवाजींकडून शिकून घेण्यासारखे तसे खूप काही आहे. युवा पिढीसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून तर दिल्याच पण सोबत शिक्षण मोफत देण्यात येतं. देवाजी असे एक दिव्या पुरुष आहेत ज्यांच्याकडे माणुसकी स्वच्छ किरणांसारखी आहे.
ढगात राहणाऱ्या देवांच्या छुट-पुट लढाई झगड्यात पानं च्या पानं भरली, पण रजनीच्या लढाया छुट-पुट नसतात आणि त्या लढाईची नोंद कागदावर करण्या ऐवजी त्याचा एक सिनेमा काढतात. ह्या मागचं कारण असं कि रजनीशी पंगा घेणारा हा अडाणी जातीचा असणार, अन अश्या अडाण्याला लिहून दिलेलं कसं समजणार? मग ह्या दुश्मनांना चेतावणी देण्याकरिता सिनेमा काढावा, किमान चित्रातून तरी दुश्मनांना अक्कल येईल. हा इतका पूर्व विचार देवाजींनी केलेला असतो.
आता तुम्हीच सांगा हे सर्व गुण असलेल्या मानव-आकृतीला तुम्ही काय म्हणून संबोधित कराल?
मला विचारल्यास मी क्षणभरही विचार न करता अचूक उत्तर देईन - देव!!
|
4
प्रतिक्रिया
|
श्री रजनि महात्म्य
18 September 2010
वेळ:
Saturday, September 18, 2010
| लिहिणारा/री/रे:
सौरभ
|| ॐ नमो रजनिदेवोः नमः ||
|| श्री आळसोबा प्रसन्न ||
(सौऱ्याभौऱ्या... अरे सगळीकडे रजनि बसतायत आणि तुझ्या ब्लॉगवर त्याचा नामोल्लेखसुद्धा नाही...!!!??? पापम्... पापम्... त्या संकेतस्वामींनी रजनिदेवाच्या आरत्या रचल्या, आकाशने "संपुर्ण चातुर्मासा"प्रमाणे "संपुर्ण रजनिकांत" लिहायचा घाट घातलाय आणि तु... आँsssक थ्थूsss... अरे स्वतःला रजनिभक्त म्हणवून घेतो आणि ब्लॉगवर त्याबाबतित एवढी उदासिनता!!! परम् पापम्... परम् पापम्...)
खाड्ड्ड... (हा मुस्काट फोडल्याचा आवाज नव्हे)
खाड्ड्डदिशी डोळे उघडले...
देवा माफी माफी माफी...
हि घे कॉफी टॉफी... सॉरी सॉरी... हि घे चिंगम कॉफी...
(हुश्श्श... रजनिदेवाचा कोप टळला...)
मला अत्ता कळलं माझा ब्लॉग एवढा दुर्लक्षित का... असो... आता मी वेळ नं दवडता मला साक्षात्कार झालेली रजनिदेवासंबंधिची काही वैश्विक सत्ये इकडे मांडतो आहे. ह्याआधी फेसबुकवर ती झळकावली होतीच. पण आता ती ब्लॉगवर टाकून ब्लॉगची दृष्टच काढतो.
हि वैश्विक सत्य असल्याने वैश्विक (अर्थात इंग्रजी) भाषेत आहेत. रजनिदेवाचा महामंत्र "MIND ITT" वैश्विक असल्याने तोपण इंग्रजीतच आहे.
So what I say...
- Hanumanji ripped his chest and showed Ram and Seeta, Rajani teared his chest and showed complete Ramayana (that too in HD).
- Taj-Mahal is not white because it is made of marble. It was colourful but fainted when Rajini went to see it.
- No one can write autobiography of Rajni, cause his Resume/CV only caused to be the world'd biggest book.
- Rajni used insect killer while Programming, and so his programs are bug free.
- Rajinikant can give pain to Painkillers and headache to Anacin.
- Rajini can make cold to sweat and fire to freeze.
तोवर बोला "MIND ITT" अण्णा... रजनिच्या नावानं "MIND ITT" अण्णा...
आपला,
(रजनिभक्त) सौरभ
Posted In
संत्रवाणी
|
9
प्रतिक्रिया
|
Subscribe to:
Posts (Atom)
