Just singing in the rain
What a glorious feelin'
I'm happy again
Just singin',
Singin' in the rain
आज दिवस भर असंच वातावरण असलं पाहिजे राव. Cafe Paradise ला मनोसोक्त चहा ढोसून घरी आलो. तरी गुडलकचा बन-मस्का-जॅम चुकवला नाही.
पाउस ह्या विषयावर उगाच प्रेम उत्तु जात होतं. चिक्कार लिहावसं वाटत होतं, उगाच रसिकपणा उफ्फाळून वर येत होता. लहानपणी पाउस म्हणजे फक्त आकाशातून पाण्याच्या धारा लागणे. अश्या पावसात नवा रेन-कोट घालून जीवावर आलं असतांना पण शाळेला जायचं. शाळेत नेहमीच्या साच्यातले पावसावरचे निबंध लिहायचे. मनात पावसा बद्दल तसली काही भावना नसली तरी उगाच मास्तरांची छडी चुकवण्या करता काही भौतिक वाक्य ठुसून त्या निबंधाचा कबाडा करायचा.
लीखाणासारखी गोष्ट जी स्वच्छंदपणे झाली पाहिजे, अश्या सहज सोप्प्या क्रियेला मार्कांचं गाजर दाखवून सगळी मज्जा निचोडून टाकलीये. एक-से-एक निबंध रचल्या गेले असते आज पर्यंत. पण हे असंच चालत राहणार. जेव्हा मित्र म्हणजे काय हे माहिती पण नसतं. एखाद्याशी तोंड-ओळख असणे म्हणजे आपण मित्र समजून चालत असतो. अश्या वयात "मित्र" विषय देऊन निबंध लिहायला लावतात. असे कित्येक विषय दाखवून देता येतील..... "शाळा","आई", "प्रवास", "आवडते गुरुजी"
आता २२व्या वर्षी जेव्हा शाळेतल्या एखाद्या मास्तरची आठवण येते, ती पण निव्वळ एखाद्या शाळेत जडलेल्या सवयी मूळे......"अरे, बेस्ट माणूस होता" असा उल्लेख होतो मग.
पैज लाऊन, जेव्हा बगैर तिकीट रेलवेचा प्रवास करतांना, लहानपणी लिहलेला मूळ-मूळीत निबंध आठवतो. तेव्हा तडक असला एखादा निबंध लिहून काढावसा वाटतो, शाळेतील दिवसात नाही लिहता आलं, ब्लॉग वर मात्र बिंदास खरडता येतं.
ह्या भुर्र-भुर्र्त्या पावसात आज बर्याच वर्षांची हुर्र हुर्र ची सर येऊन गेली.