द्रविडी प्राणायाम - दिवस सहावा

04 November 2010 वेळ: Thursday, November 04, 2010
ऑक्टोबर १७:

सकाळी उठलो, आणि एक मिनिट मी कुठे आहे असा प्रश्न पडला! कालचा कमालीचा दिवस आठवला आणि मग खिडकीतून बाहेर बघितलं. रस्ते ओले दिसत होते. मग राजर्षीला हाक़ मारून उठवलं, पाऊस ऐकून तो पण बिछान्यातून तड्कान्न उठला. टी.वी लावला, नीओ स्पोर्ट्सची anchor अर्चना आपली बेछूट अदाकारी बरसवत होती.
"They say the weather in kerala is like the marriage of the fox. You never know what will happen next."
थोड्याच वेळात सामना रद्द केल्याची बातमी राजर्षीला फोनवर मिळाली.


रद्द झालेल्या सामन्याचे फोटो काय काढायचे, म्हणून मग मी कन्याकुमारीला जायचा प्लान केला. पुन्हा एकदा 'गरीब-रथात' स्वार होऊन कन्याकुमारीकडे कूच करू लागलो. हा साधारण ५-६ तासाचा प्रवास होता. ११:०० वाजताची ट्रेन पकडली तर निश्चित्त सूर्यास्ताचे फोटो काढता येतील. पण बंगलोर-कन्याकुमारी 'एक्स्प्रेस'ने माझ्या गणिताचा पार चुथडा केला. ट्रेन मध्ये जॉर्जशी ओळख झाली. कन्याकुमारीला पोहचेस्तोवर सूर्यास्त होऊन गेला होता.

या प्रदेशात नैसर्गिक सौंदर्य मोकळ्या हाताने रंगवलं होतं!


मग राहण्यासाठी मी स्वस्तं जागेचा शोध घेत होतो. इकडे नक्की रामकृष्ण मठ असेल. मला तिकडे राहता येईल.चौकशी केल्यावर मला विवेकानंद केंद्राचा पत्ता सांगितला. तिकडे राहण्याची सोय आहे, ते सर्वात स्वच्छ आणि स्वस्त accommodation आहे. विवेकानंद केंद्रात सिंगल रूम उपलब्ध नसल्याने, मला एक ३ बेड्सची रूम घ्यावी लागली. तरी रूमचं भाडं ४५ रुपये होतं! बाहेर लॉज मध्ये किमान २५० रुपये घेतात. पूर्ण वेळ मी जॉर्जला माझ्या सोबत फिरवत होतो! त्याला पण मजा येत होती. त्याने विवेकानंद केंद्रात खोली मिळाल्यावर निरोप घेतला. तो पण कन्याकुमारीला राहणार होता, पण अचानक त्याने परत जायचा निर्णय घेतला. नेमकं काय घोळत होतं त्याच्या मनात देव जाणे. आजचा दिवस प्रवासातच वाया गेला, रात्री विवेकानंद केंद्राच्या उपहारगृहात जेवण करून मग समुद्र किनाऱ्यावर गेलो. अगदी तुरळक गर्दी होती, छान थंड वारा वाहत होता. रोशणाई मुळे रात्रीच्या वेळी विवेकानंद स्मारक आकर्षक दिसत होतं. मग काही फोटो काढून, सूर्योदय बघण्यासाठी योग्य जागेचा शोध घेतला. उद्या सकाळी लवकर उठून सूर्योदय बघायचा आहे!



आपला,
(फिरता) माचाफुको

3 प्रतिक्रिया

  1. सहावा दिवस हाफडे वाटला रे.. हेहे किडिंग.. चालू दे.. मस्त चाललंय..

    'माचाफुको' चा ही फोटू टाक ना एखादा ;)

  2. अनघा Says:

    :) छान! मला जायचंय एकदा कन्याकुमारीला. तुझा सल्ला घेता येईल आता! नाही का? :)

  3. THE PROPHET Says:

    भारी चालू आहे मित्रा....मी फक्त अधून मधून एव्हढ्यासाठीच कॉमेंटतोय की मला प्रचंड उत्सुकता लागून राहिलीय, खर्‍या आयडेंटिटीची! ;)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates