राम लीला - शिवाजी पार्क

02 October 2011 वेळ: Sunday, October 02, 2011

ग्रीन रूम मध्ये जाण्यासाठी कोणी जास्ती आढे-वेढे न घेता सोडलं.
आत माहोल एकदम मजेदार होता. दुपारचा चहा न मिळाल्याने शंकर भगवान थोडे अस्वस्थ होते. मेक अप सुरु झाला, तसं सगळे आप आपल्या character मध्ये घुसले. जसा चहावाला आला, त्याला देव-देवतांची बोलणी खावी लागली, एकाने तर वेळेवर चहा न आणल्यास शाप देण्याची धमकी पण दिली.

ही ग्रीन रूम, खूप आधुनिक न्हवती. एक मोठा आरसा, त्याच्या २ बाजूला १०० वाट चे दोन बल्ब.
लिपस्टिक ऐवजी लाल पोस्टर कलर वापरात होते. इकडे कोणीच व्यावसायिक कलाकार नाही. राम-लक्ष्मण ह्यांची भूमिका गोपाल-गोविंद करत होते. गोपाल-गोविंद बंधू सुनिधी चौहान बरोबर sound artist म्हणून काम करतात. रावणचं मथुरेत कापडाच दुकान आहे. नवरात्री म्हणून, रामायणाचा प्रचार करण्याच्या हेतूने हे सगळे एकत्रित येतात.




रावणाचा किरदार करणाऱ्याने मला आणि कल्पक पाठक (हिंदुस्तान टाईम्स) बोलवून, "इस देश को चलाने वाला सरदार सबसे बडा चोर हैं|" हा सूर पकडला. कल्पक पाठकला त्याचं हे वाक्य आपल्या पेपर मध्ये लिहण्याच आव्हान ही दिलं. मनात म्हंटल, हिंदुस्तान टाईम्स वर येईल की नही माहिती नही, पण ह्या माणसाला आपन ब्लॉग वर +१ देणार!

0 प्रतिक्रिया

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates