शलौम शाब - ११

10 February 2012 वेळ: Friday, February 10, 2012
आता पर्यंत:
भाग  १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
भाग  ६ | भाग ७ | भाग ८ | भाग ९ | भाग १०

 

तृशिली नदी, हिमालय आता लांब मागे सुटले होते. वेळ हा कधीच पुरा नाही पडत. काही गोष्टी सूक्ष्म असतात म्हणून दिसत नाहीत, अन् काही प्रचंड मोठ्या असतात म्हणून दिसत नाहीत. भेटलेल्या लोकांचे स्वभाव तर कमाल होते. एका परक्या देशात, ओळख ना पाळख तरी आपल्यातला म्हणून घेणारे भेटले की कसलं भारी वाटतं. (वरून तुम्ही ह्या पोस्ट अशुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करत वाचलंत....) सगळेच अनुभव इथे मोजत बसणे रटाळ वाटेल. बरेच अनुभव स्वतःपुरताच असलेले बरे असतात, योग्य वेळी ते प्रत्येकाच्या पुढ्यात येऊन पडतात. वेळेचं महत्व म्हणतात ते हे असावं. ना की तीन तासात १०० मार्कांचा पेपर सोडवणे. आयुष्यात काही गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे म्हणून दहावी - बारावीमधे योग्य वेळात पास व्हावं, पण खरंच किती मुलांना इतिहास, गणित, विज्ञान, नागरिक शास्त्रचा मनापासून आभ्यास करावसा वाटतो? (माझ्या मराठी मधे डझनभर चुका आहेत, मी पण शेवटी पास होण्यासाठी केलेला तो आभ्यास.) वेळेच्या महत्वा पोटी जर सगळे गग्या बनू लागले, तर  Human Evolution मधे ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. हजारो वर्षांनी जर माणसाचे परत माकड झाले तर? Evolution Cycle complete होईल! इकडे हिमालय बघितल्यापासून नझारीयाच बदलून गेलाय.

कधी वेळ  काढावा लागतो, तर कधी वाचवावा लागतो. विज्ञानाच्या मदतीने आता हे सोप्पं होतांना दिसतंय, इतकं सगळं करून पण अनुभव हा वेळेच्या डबीत बसवता आला नाही. अनुभवाने कसलेल्या हातून होणारे ते काम, कला म्हणून ओळखल्या गेलं पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कलाकार असतोच.


सकाळी उठल्या बरोबर बर्फाने झाकलेला हिमालय आता दिसत नसला, तरी हरकत नाही. तो इथेच असेल हे निश्चित. पुन्हा एकदा जनरलच्या डब्यात, वर तापलेला सूर्य. गाडीची सावली पण गाडी बरोबर पळतेय. दिवस सरकतो तसं गाडीच्या नवीन सावल्या दिसतात. मग एक धासू वाक्य जुळलं - "माणसाची पारख त्याच्याकडे बघून नाही, तर त्याच्या सावली कडे बघून करावी. तो उजेडाच्या कुठल्या दिशेला उभा आहे ओळखणं सोपं जातं." वाह मग स्वतःवर खुष होऊन आळस देत जनरल डब्याच्या सह-प्रवाश्यांच्या गप्पांमध्ये रंगलो.

आता परवाची गोष्ट, मित्रांबरोबर चायनीज खायला गेलो होतो. तिथल्या नेपाळी वेटरला "दाई" म्हणून हाक मारली. त्याने एकदम हसून बघितलं. कदाचीत त्याला कोणी त्याच्या भाषेत "दादा" म्हणणारा आज भेटेल वाटलं नसेल.

तुम्ही  कधी निघताय मग?
The only rules that really matter are these: what a man can do and what a man can't do.2 प्रतिक्रिया

  1. अनघा Says:

    तुम्हीं परत कधी निघताय मग ? म्हणजे आम्हांला यायला बरं तुमच्याबरोबर ! चालेल नव्हं ? :)
    सुंदर....फोटो आणि पोस्ट ! तू असा एकटाच आहेस ज्याच्या अशुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करत मी पोस्ट शेवटपर्यंत वाचते !! :) कारण त्यात काहीच वरवरचं, खोटं खोटं, आव आणलेलं नसतं ! :) :)

  2. Machafuko Says:

    नक्की! हेमलकसा, आनंदवन आहे की!
    बाकी, comment वाचून कसलं भारी वाटलं. परत एकदा bag कडे नझर टाकली आणि bag म्हणाली - बरं!! हाहा!! :D

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates