पुण्यातली एक संध्याकाळ

30 September 2010 वेळ: Thursday, September 30, 2010
काल भले ही पुण्यातली रौनक कमी वाटत होती, तरी सूर्यास्त कुठे ही कमी पडला नाही.





सिरीयल इथे संपत नाही

25 September 2010 वेळ: Saturday, September 25, 2010
सिरीयल इथे संपत नाही, कुंकू नंतर लज्जा येते
कोसंबी संध्याकाळी गातो, तुझ्या पायी मी ते पहिले
सिरीयल इथे संपत नाही..

ते vamp चे बघणे इर्षेचे, ती कुटिल हास्याची माया
कार्यक्रम बघून थकलो आपण, तरी उद्या पुन्हा बघावा
सिरीयल इथे संपत नाही....

ते बोल दुष्ट आणि भडकपणाचे, दिवस बिघडवून गेला
(कुंकू मधल्या) जानकीच्या मूर्खपणा बघून येते मजला दया
सिरीयल इथे संपत नाही

ह्या दुनियेतील अवघ्या घरातील गुणगुणते दुखं आहे
हे संपता संपत नाही रटाळ पण सिरीयलचे
सिरीयल इथे संपत नाही.


(ग्रेस ची माफी मागून)


मधे सुट्ट्यांमध्ये मी टी.वी ला एक्स्पोझ झालो. काय भयंकर कार्यक्रम दाखवतात हो....
एक कुंकू नावाची सिरीयल आई बघते, त्यात मृण्मयी देशपांडे - जानकी नावाची प्रचंड मंद भूमिका निभावतेय.
ह्या जानकीची खासियत म्हणजे, तिला पहिल्या झटक्यात काहीच झेपत नाही.
मग तिची पहिली लाईन - "तुम्ही काय बोलताय मला काहीच काळात नाहीये."
अशा सिरीयल बघतांना आश्चर्य वाटतं. मनोरंजन म्हणून कोणा तिसर्याच्या घरातली लफडी बघण्यात कसला आनंद?
माणसाची आवड इतकी का खालावली?

ह्या सिरीयल पासून मुक्ती म्हणून मग तो कॉमेडी शो लावला.      
आजकाल कॉमेडी बघणं म्हणजे एक उदाहरण देतो  -
तुम्हाला एक १० चाकू दिले, ह्यात किमान ९ तर बिन धारेचे असणार.
तेवढ्या एका धारवाल्या चाकू साठी उगाच ९ बोथाड चाकू सहन करावे लागतात. 
कधी कधी तर १० पैकी १० चाकू बोथाड असतात.......नॉन-सेन्स साला.
त्यात भर म्हणजे २-३ भोचक पोरं असतात कॉमेडी करायला. 
ठीक आहे मान्य आहे कि हि पोरं स्टेज-फिअर न बाळगता कार्यक्रम सदर करतात. 
पण मी हे मनोरंजन म्हणून का बघावा. कॉमेडी सर्कस नावाच्या कार्यक्रमात एक भोचक पोट्टी - सलोनी. 
राहून राहून वाटतं हिला २ चमचे शेंदूर खाऊ घालावं आणि गप्प गुमान तिला वयाला शोभेल असा वाग म्हणावं.

मग येतात गाण्याचे कार्यक्रम. कधी लहान मुलं, तर कधी मोठे लोक. गाण्यांच्या स्पर्धा १२ महिने पाहायला मिळते. 
हे भल्या माणसांनो, घर बाहेरची स्पर्धा कमी आहे का? म्हणजे दिवसभराची झुंज गोड करायला, डझनभर गाणाऱ्या माणसांची स्पर्धा बघावी. 
सरळ एक ६-६ पोरांना बोलवा आणि एक एक आठवडा फक्त गाऊ देत त्यांना. 
कशाला हवी स्पर्धा, आणि कशाला हवे ते एलिमिनेशन. 

न्यूज लावा. कृत्रिम रंग असलेला कलिंगड, जबरदस्तीने पिकवलेले आंबे, झेंडूचा रस लावलेलं खरबूज आणि गळ्यात खाजवणारी मोसंबी.
वाह सामान्य ज्ञानात काय भर पडली! हे दाखवून समाधान नाही होत म्हणून मग सिरीयल मधे काय सुरु आहे ते हि दाखवतात.
थोडक्यात "back to square one" आणि आपण तेच द्वेष, इर्षा भडभडून दाखवणाऱ्या मालिका बघत वेळ मारतो.
बाबा तर म्हणतो - बातम्या नसतील तर सरळ तसा एक स्क्रोलर टाकावा - "आज काही विशेष बातम्या नाही"

साले शेवटी सगळे टी.आर.पी मिळवण्याची खटाटोप.
आणि आपण ते का बघतो आपल्याला हि नाही माहिती. 
 
मग अशा परिस्थितीत टी.वी विकायच्या टोकाच्या निर्णयावर पोहचू नका. 
मनोरंजनासाठी जाहिराती बघा!  


आजची पहाट

23 September 2010 वेळ: Thursday, September 23, 2010
काल विसर्जनाच्या गोंगाटातून निसटलेली एक पहाट, चंद्राने माहोल तयार केला होता. नेमके ढगांचा कापूस कुठूनसा उडत आला....
तरी, तुम्हा सर्वांना "सकाडी-सकाडी" गुड मॉर्निंग!! 


आजचा दिवस....

20 September 2010 वेळ: Monday, September 20, 2010
आज बझ्झ वर कांचन-ताईचा पोस्ट - "चोरी पे चोरी " वाचत होतो. त्यात शेवटची नचिकेतची प्रतिक्रिया होती - "एक पर्याय असाही आहे की आपल्या पोस्टमधला काही भाग मधूनअधून गूगल सर्च करत रहायचा." सहज मजा म्हणून मी एक - दोन पोस्ट मधले काही भाग गूगल करून बघितले! आश्चर्य - माझेही काही पोस्ट मला न कळवता एका-दोघांनी रिप्रोड्यूस केले होते. 


मग मला हसू आलं - 
सौरभ म्हंटला कि त्यांना एक मेल कर, आणि कळव.
मनात आलं मेल मध्ये लिहावं - "हम अभी तक जिंदा है"

मग म्हंटल असू देत कशाला उठा - ठेव. कुठलं मोठं साहित्य लिहलं आहे. 
पण मग लक्षात आलं कि मी पण सौरभ, केतकी, दगडू, दीप्ती च्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय वाचून भारावून जायचो. 
पुढे लिहण्यासाठी हुरूप यायचा. 
मग लिहायला काही सुचत नसेल तर एखाद्या किस्स्याला फोडणी टाकून पोस्ट करायचो. (मी मसाला नाही बोललो, फोडणी बोल्लोये हे लक्षात घ्या)
क्यों ना - स्वतःच्याच एखाद्या अश्या पोस्ट च्या प्रतिक्रियेत लिहावं -
"काय टुकार लिखाण आहे"
स्वतःच्याच ब्लोग पोस्ट वर हे लिहायला माझ्या बापाचं नाव करमचंद नाही. 
पण  स्वतःच्याच एखाद्या पोस्ट चे धिंड काढायला मजा येईल नाही?


मग थोडासा अहंकार कुरवाळत, हळूच एखाधी हास्याची उकळी लपवत थोडी शब्दांची जुळवा जुळाव केली.
आणि किलिक केलं सबमिट. 

मला माहिती नाही, कि मी हा पोस्ट का कंपोज करतोये? 
कोणाची नावं टाकणार नाहीये, ना कोणाच्या ब्लॉगचे पत्ते. ना कुठले पुरावे, ना रजनी-देवा कडे शिकायत. 
रोज एक पोस्ट टाकायचा चास्काच लागलाय जणू.  
आज रजनीकांत बद्दल लिहून तेच ते पणा आला, म्हणून विषय-पालट केला. 

मगाशी एकाचा रिप्लाय आला - 
मग थोडी मेलांची (मेल चं अनेक वचन)  देवाण घेवाण झाली.
कोण जाणे कदाचित आमची मैत्री पण होईल. 
उद्या पासून त्याच्याही प्रतिक्रिया येणं चालू होईल.

वाट  बघतोये रे मित्रा!!





"Inception" & "C" Programming

19 September 2010 वेळ: Sunday, September 19, 2010
हा चित्रपटाचा रिव्ह्यु नाही. Inceptionचा रिव्ह्यु लिहण्याची सध्यातरी माझी लायकी नाही.
हॉलिवुडचे काही चित्रपट नुसते मनोरंजन किंवा कला ह्यापुरते मर्यादित नं रहाता त्या परिसीमा पार करुन विज्ञानाचा एक अभ्यासपट म्हणुन समोर येतात. तो चित्रपट पाहताना एखाद्याने त्याच्या/तिच्या PHD रिसर्चची थेसिस डिफेन्ड केल्याचा भास होतो. Inception त्यापैकीच एक.
ख्रिस्तोफर नोलान... काय म्हणावं मी. थोर आहेस तु (हे प्रेमाने केलेलं अरेतुरे आहे). मला सर्वात जास्त कौतुक एका गोष्टीचं वाटतं ती म्हणजे, हे लोक एखादी (काल्पनिक/अभुतपुर्व/जटिल) कल्पना करतात आणि ती लोकांसमोर "समजेल अशी मांडतात". अशी कल्पना "मांडणं" हे आणि फक्त हेच खरं कौशल्य आहे. तर ह्याची संकल्पना एकंदर अशी आहे की...
कोणाच्याही डोक्यातली गुपितं त्याला शारीरीक इजा नं पोहचवता त्याच्या स्वप्नांमधे जाऊन, ती त्याची स्वप्न नियंत्रित करुन काढुन घेणं. आणि एवढेच नव्हे तर त्याच्याच त्या नियंत्रित केलेल्या स्वप्नांमधे जाऊन, त्याच्या सुप्त मनामधे आपली कल्पना रुजवणे. बरं आणि हे करताना अश्या पद्धतिने करायचं की स्वप्न बघणाऱ्याला वाटावे स्वप्न आणि कल्पना दोन्ही त्याच्याच आहेत.
पण हे असं का करायच? म्हणजे असं स्वप्नात जाऊन असले उद्योग कशासाठी? कारण - वेळ. भौतिक जगात अनन्य महत्व असलेली - वेळ. ह्या वेळेला तुम्ही थांबवु शकत नाही, ना तिची गती कमीजास्त करता येते. त्यामुळे एखाद्या कामासाठी लागणारा कालावधी कमी असेल तर??? पण मग त्यात एखाद्याची स्वप्न कशी काय मदत करु शकतिल??? हांsss... तर हिच आहे ह्या सिनेमाची स्टोरी.
स्वप्नांमधे (म्हणजे स्वप्न बघताना) एखाद्याचा मेंदु प्रचंड गतीने कार्यरत असतो. त्यामुळे होतं काय की ह्यामुळे वेळ मंदावली जाते. भौतिक जगातील एक सेकंद हा स्वप्नांमधे काही तासांएवढा होतो. मग समजा जर मी स्वप्नात स्वप्न पाहिलं तर??? पहिल्या पातळीवर (पहिल्या स्वप्नात) एका सेकंदाचे काही तास, दुसऱ्या पातळीवर (पहिल्या स्वप्नातल्या स्वप्नात) त्या तास काही दिवस होतिल आणि पुढच्या पातळीवर त्या दिवसांच रुपांतर काही वर्षांमधे... म्हणजे मला एखादं काम काही सेकंदात करणं अशक्य असेल तर मी तिसऱ्या पातळीवरच्या स्वप्नांमधे जाऊन त्यासाठी काही वर्ष एवढा मोठ्ठा कालावधी मिळवु शकतो. शिवाय हि स्वप्न एखाद्याची विचारसरणी/वागणुक पुर्ण बदलु शकतात. त्यामुळे जर मी त्याचं स्वप्न त्याच्या नकळत नियंत्रित केलं (स्वप्नांना सुरुवात आणि अंत नसल्याने ती नियंत्रित करता येऊ शकतात) तर मी त्याला एक पुर्ण नवा माणुस बनवु शकतो. ब्रेनवॉशसारखं वेळखाऊ काम मी अतिशय कमी वेळात करु शकतो. भाsssरी.... बरं हि स्वप्न नियंत्रित करणं म्हणजे काय जॉयस्टिक हातात घेऊन व्हिडिओगेम खेळण्याइतकं सोपं नाही. चित्रपटातल्या कहाणीनुसार तिसऱ्या पातळीवरची स्वप्न (तिसरी पातळी म्हणजे maximum limit) खुप अनस्टेबल असल्याने नियंत्रित करणं खुप कठिण... जवळपास अशक्य. ताळमेळ चुकला तर व्यक्ती स्वप्नातुन बाहेर येईल पण प्रचंड मानसिक धक्का घेऊन किंवा त्याच स्वप्नांमधे कायमची अडकुन जाईल. पण चित्रपटातला हिरो ह्याच्या कैक कैक पार... पाचव्या पातळीवरच्या स्वप्नात जातो.
Inception चित्रपटाची बांधणी अप्रतिम आहे. Open end असलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे मुव्ही पाहुन झाल्यावर तुम्ही चर्चाचर्वण करुन रवंथ करणार हे नक्की.

हम्म्म... पण मी हे सगळं लिहितोय का? पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाबद्दल, तेपण "Inception"बद्दल? कारण मला ह्या चित्रपटाचा कन्सेप्ट "C" Programming सारखा वाटला (to some extend - only time factor is missing). How? well, now to understand what I say, you should at least have basic knowledge of "C" Programming. "C" languageमधे एक "Pointer" म्हणुन कन्सेप्ट आहे. हा एक असा variable आहे जो "memory address" स्टोअर करतो.
उदा.:
int x = 10; //variable 'x' has value 10 stored in it
int *y;
y = &x; //now 'y' is a Pointer, pointing to memory address of 'x'
print x; // output: 10
print y; // output: 0012FEDC
print *y; //output: 10
// *y same as *(&x), also read as value at address of x, which is 10
पण तरी हा फंडा Inceptionशी रिलेटेड कसा?

कारण १:
Inception चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एखाद्याच्या स्वप्नांद्वारे त्याचे सुप्त मन नियंत्रित करुन त्याची मुळ विचारसरणी किंवा व्यक्तिमत्वच बदलता येऊ शकतं आणि होणारा हा परिणाम कायमस्वरुपी असतो.
Pointerने सुद्धा एखाद्या variableची value कायमचीच बदलते. ह्याला scope resolution असंपण म्हणतात.
उदा.:
{ // first scope starts
     int x = 10; // value of x in first scope
     print x; // output: 10
     { // second scope starts
        x = 5; // value of x in second scope
        print x; // output: 5
     } // second scope ends which discards everything within it
     print x; // output: 10
} // first scope ends
वरच्या उदाहरणावरुन तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या scopeमधे मी 'x'ची value बदलली. पण तरी दुसऱ्या scopeमधुन बाहेर आल्यावर 'x'ची value पुन्हा 10च झाली.
हेच जर मी Pointerने केलं तर काय होईल बघा...
{ // first scope starts
     int x = 10; // value of x in first scope
     print x; // output: 10
     int *y;
     y = &x;
     print *y; // output: 10
     { // second scope starts
        *y = 5; // *(&x) read as value at address of x = 5
        print x; // output: 5
     } // second scope ends
     print x; // output: 5
} // first scope ends
आता इकडे मी 'x'ची value बदलली नाही, तर जिकडे स्टोअर केलाय त्या ('x'च्या) memory addressवरची बदलली. त्यामुळे दुसऱ्या scopeमधुन बाहेर आल्यावर 'x'मधे त्या memory addressवरची नविन value असेल.

आता हे झालं बेसिक. Incetionमधे कसं स्वप्नात स्वप्न आणि त्याच्या आत पुन्हा स्वप्न दाखवलय तसंच इकडेपण pointerला pointer आणि त्या pointerचा pointerपण define करु शकता.
म्हणजे पहिल्या levelवरचा pointer एखाद्या variableचा memory address store करतो. (ह्याला हाताळतानाच तोंडाला फेस येतो.)
int x;
int *y;
y = &x;
दुसऱ्या levelवरचा पहिल्या levelच्या pointerचा memory address store करतो.
int x;
int *y;
y = &x;
int **z;
z = &y;
तिसऱ्या levelवरचा दुसऱ्या levelच्या pointerचा memory address store करतो.
int x;
int *y;
y = &x;
int **z;
z = &y;
int ***i;
i = &z;
पण अजुन मला नाही वाटत कोणी तिसऱ्या पातळीवरचा pointer वापरला असेल. कारण programmingमधे पहिल्या levelवरचा pointerच प्रोग्रॅमर्सची level लावायला पुरेसा आहे. दुसऱ्या levelला तर programmersची १००% फें फें उडालेली असते.

कारण २:
चित्रपटानुसार माणसाच्या ह्या स्वप्नसाखळीचे दुरगामी कायमस्वरुपी परिणाम त्याच्यावर होत असल्याने, समजा त्याच्या स्वप्नात काही अघटीत घडलं (समजा तो मधल्याच एखाद्या स्वप्नात मेला) तर पुढच्या आणि मागच्या स्वप्नांचा संपर्क तुटेल आणि तो स्वप्नातुन बाहेर आला नाही तर खऱ्याखुऱ्या जगात तो कोमामधे जाऊ शकतो. तसं झाल्यास बाहेर काढण्यासाठी त्या स्वप्नात किंवा त्याच्या पुढच्या पातळीवरच्या स्वप्नात जाऊन योग्य क्रमाने आणि पद्धतिने स्वप्न संपवणं गरजेचं आहे.
Pointers हाताळतानापण अशी काळजी घेणं गरजेचं असतं. नाहितर त्या pointerचा "Dangling Pointer" होतो. Dangling Pointer म्हणजे असा pointer जो चुकिच्या (वापरात नसलेल्या) memory addressला point करतो. अश्या pointerमुळे अकारण memory space खाल्ली जाते आणि प्रोग्रॅम क्रॅशदेखिल होऊ शकतो.
उदा.:
{ // first scope starts
     int *x;
     { // second scope starts
        int y;
        x = &y;
     } // second scope ends, y falls out of scope
     // x is now a Dangling Pointer pointing to deallocated memory of y
}// first scope ends
हा तर पहिल्याच levelवरचा होता. अजुन complex pointerअसता आणि मधलाच कोणता pointer गंडला तर तुमचा प्रोग्रॅम बोंबल्लाच समजा. अश्या प्रॉब्लेमला टाळण्यासाठी ज्या scopeमधे pointer define केला त्या scopeमधुन बाहेर येण्यापुर्वी त्याला Nullify करावा.
उदा.:
{ // first scope starts
     int *x = NULL;
     { // second scope starts
        int y;
        x = &y;
        /* ... */
        x = NULL;
     } // second scope ends, y falls out of scope
     // x is no more a Dangling Pointer
}// first scope ends
हुश्श्श्श... झेपलं का काही??? नसेल तरी हरकत नाही. मीच पुर्ण गोंधळलेलो लिहतालिहता... ख्रिस्तोफर नोलानने एवढा कठिण विषय इतक्या सहजपणे कसा काय चित्रित केला आश्चर्यच आहे. असो... पण Inception बघा नक्की.


आपला,
(Dangling) सौरभ

रजनी भक्तीचा राजमार्ग

वेळ: Sunday, September 19, 2010
आज रजनी देवा बसवण्याचे नियम लिह्ण्यापेक्षा जरा गप्पा माराव्या म्हणतो. रोज नियमावली पोस्ट करत राहिलो, तर हि भक्ती उर्फ परंपरा थोडी रटाळ वाटेल. 

आता सुरवात आभार मानून करतो. स्टार गोल्ड ह्या वाहिनीने आमच्या विशेष मागणीवरून आज देवाजींचा "शिवाजी - द - बॉस"  दाखवण्या बद्दल, तमाम रजनीकांत भक्त स्टार गोल्डचे आभारी आहेत.

बऱ्याचदा आम्ही देवाजींच्या भक्ती - योगाचा आस्वाद घेत असतांना त्यांच्या महत्तेत बुडून जातो.
नास्तिकांना देवाजींची महत्ता हा थट्टेचा विषय वाटतो, तुम्हाला आज काही माझे विचार मांडतो.
देवाजींची कर्म असे बंधनकारक आहेत, कि हा प्रांत कसा बांधल्या जातो बघा -
आपण देवाजींचे चित्रपट बघतो, संत चीरांजीविंचे, संत नागार्जुन, संत एन.टी राम राव जुनियर ची चित्रपट पण बघतो. जरी देवाजी आणि इतर संत वेग-वेगळ्या भाषेतल्या चित्रपटांमध्ये अभिनय करतात, तरी आपण ह्या सर्व चित्रपटांना साउथ - इंडियन चित्रपट म्हणून ओळखतो. हाच तो माझा मुद्दा! आपल्याला आंध्र, कर्नाटक, तमिळ नाडू सगळा एक कॉम्बिनेशन प्रांत वाटतो. कोणी मद्रासी नाही, कोणी आण्णा नाही. आपल्यासाठी सगळे साउथ इंडियन! सगळे एक! 
आपल्याला बुवा भेद भाव आवडत नाही. राज ठाकरेंना देवाजींची दीक्षा दिल्यास सरकारी मालमत्ता न पेटता आपल्या सेवेत हजर असू शकते.
(** नोट: नागार्जुन, चिरंजीवी हे रजनी देवाचे भक्त आहेत. ह्यांचा उल्लेख संत म्हणूनच करावा. देवाजींनी स्वतः संत नागर्जुनला स्वप्नात दर्शन देऊन आपले I.I.T चे शिक्षण संपवून मग M.I.T - अमेरिका येथून करण्याचा सल्ला दिला.)    

देवाजीचं मानणं आहे कि माणसांना माणसा सारखं वागवा. मानवहित बघून एखादा निर्णय घेतात. एक महान अभिनेता झाल्यावर पण नखभर अहंकार दिसून येत नाही. 
ह्यामागचे कारण असे कि देवाजी आधी carpenter होते मग कुली अन मग कंडक्टर मग अभिनेता आणि सरतेशेवटी देव (ह्याच जन्माबद्दल बोलतोये मी). आता इतके काबाडकष्ट करून आलेला माणूस आपण लोकांना किती जवळचा वाटतो. देवाजींकडून शिकून घेण्यासारखे तसे खूप काही आहे. युवा पिढीसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून तर दिल्याच पण सोबत शिक्षण मोफत देण्यात येतं. देवाजी असे एक दिव्या पुरुष आहेत ज्यांच्याकडे माणुसकी स्वच्छ किरणांसारखी आहे. 

ढगात राहणाऱ्या देवांच्या छुट-पुट लढाई झगड्यात पानं च्या पानं भरली, पण रजनीच्या लढाया छुट-पुट नसतात आणि त्या लढाईची नोंद कागदावर करण्या ऐवजी त्याचा एक सिनेमा काढतात. ह्या मागचं कारण असं कि रजनीशी पंगा घेणारा हा अडाणी जातीचा असणार, अन अश्या अडाण्याला लिहून दिलेलं कसं समजणार? मग ह्या दुश्मनांना चेतावणी देण्याकरिता सिनेमा काढावा, किमान चित्रातून तरी दुश्मनांना अक्कल येईल. हा इतका पूर्व विचार देवाजींनी केलेला असतो. 

आता तुम्हीच सांगा हे सर्व गुण असलेल्या मानव-आकृतीला तुम्ही काय म्हणून संबोधित कराल? 
मला विचारल्यास मी क्षणभरही विचार न करता अचूक उत्तर देईन - देव!!

श्री रजनि महात्म्य

18 September 2010 वेळ: Saturday, September 18, 2010
|| ॐ नमो रजनिदेवोः नमः ||
|| श्री आळसोबा प्रसन्न ||

(सौऱ्याभौऱ्या... अरे सगळीकडे रजनि बसतायत आणि तुझ्या ब्लॉगवर त्याचा नामोल्लेखसुद्धा नाही...!!!??? पापम्... पापम्... त्या संकेतस्वामींनी रजनिदेवाच्या आरत्या रचल्या, आकाशने "संपुर्ण चातुर्मासा"प्रमाणे "संपुर्ण रजनिकांत" लिहायचा घाट घातलाय आणि तु... आँsssक थ्थूsss... अरे स्वतःला रजनिभक्त म्हणवून घेतो आणि ब्लॉगवर त्याबाबतित एवढी उदासिनता!!! परम् पापम्... परम् पापम्...)

खाड्ड्ड... (हा मुस्काट फोडल्याचा आवाज नव्हे)
खाड्ड्डदिशी डोळे उघडले...
देवा माफी माफी माफी...
हि घे कॉफी टॉफी... सॉरी सॉरी... हि घे चिंगम कॉफी...
(हुश्श्श... रजनिदेवाचा कोप टळला...)

मला अत्ता कळलं माझा ब्लॉग एवढा दुर्लक्षित का... असो... आता मी वेळ नं दवडता मला साक्षात्कार झालेली रजनिदेवासंबंधिची काही वैश्विक सत्ये इकडे मांडतो आहे. ह्याआधी फेसबुकवर ती झळकावली होतीच. पण आता ती ब्लॉगवर टाकून ब्लॉगची दृष्टच काढतो.

हि वैश्विक सत्य असल्याने वैश्विक (अर्थात इंग्रजी) भाषेत आहेत. रजनिदेवाचा महामंत्र "MIND ITT" वैश्विक असल्याने तोपण इंग्रजीतच आहे.

So what I say...
  • Hanumanji ripped his chest and showed Ram and Seeta, Rajani teared his chest and showed complete Ramayana (that too in HD).
  • Taj-Mahal is not white because it is made of marble. It was colourful but fainted when Rajini went to see it.
  • No one can write autobiography of Rajni, cause his Resume/CV only caused to be the world'd biggest book.
  • Rajni used insect killer while Programming, and so his programs are bug free.
  • Rajinikant can give pain to Painkillers and headache to Anacin.
  • Rajini can make cold to sweat and fire to freeze.
अत्तापर्यंतच्या समाधीसाधनेचे फळ म्हणुन हि सत्य पंचमहाभूतांकडुन आमच्या पंचेंद्रियास जाणवली. जसजशी हि तपश्चर्या अधिकाधिक तीव्र होईल तसतशी जास्त रजनिसत्य समोर येतिल आणि त्याचे खुले ज्ञान तुम्हालादेखिल करुन देण्यात येईल.
तोवर बोला "MIND ITT" अण्णा... रजनिच्या नावानं "MIND ITT" अण्णा...

आपला,
(रजनिभक्त) सौरभ

रजनीकांत व्रत - प्रसाद आणि नैवेद्य

17 September 2010 वेळ: Friday, September 17, 2010
काल रात्री एक सुखद स्वप्नं पडलं. देवाजींच्या भक्तीत सध्या आम्ही ज्या डुबक्या लावतोये, त्या ओघात एक रजनी मंदिर उभारण्यात आलं. ह्या भव्य सोवळ्यात साक्षात देवाजी स्वतः प्राण प्रतीष्ठानासाठी आले असतांना आमच्या मस्तकावर हात ठेऊन रजनी देवाने आम्हाला आशीर्वाद दिला. ह्या पुढचं मात्र काही आठवत नाही. अचानक डोळ्यांसमोर उजेड पसरला, डोळे उघडले तर अजून बाहेर अंधार होता आणि खोलीचा दिवा बंद होता. 

आज आपण प्रसाद काय असावा - हा विषय छेडू या!

प्रसादात च्युईंग गम असणं जरुरी आहे.
तीर्थ म्हणून फळांचा रस किव्वा दही उत्तम. 
नैवेद्य विशेष करून चिकन अथवा मटणाचे प्रकार असावेत (देवाजींचे आवडते)
देवाजींचे आवडते शाकाहारी पदार्थ असे दिसले नाही कुठे आम्हाला, पण आम्हीच सहमती देतो तुम्ही छानशी बटाट्याची भाजी (वरून कोथिंबीर भुर्काव्लेली) आणि पुरी हा नैवेद्य दाखवावा.
प्रसादाचा आस्वाद घेतल्या नंतर कॉफी नक्की प्यावी. (लहान मुलांनी दूध आणि शराब्यांनी आयरिश कॉफी)
धुम्राकाष्टिका एका वेगळ्या डबीतून पेश करावी, आणि चिलीम वर मजल मारू नये. ताबा ठेवायला शिका.

नैवेद्याच्या ताटा खाली, नुकतंच ठरलेलं भारतीय रुपयाचं चिन्ह पाण्याच्या बोटाने काढावं. (हो ते चिन्ह पण देवाजींच्या नावातील पाहिलं अक्षर लक्षात घेऊन निवडलं आहे)
मग त्या चिन्हावर नैवेद्याचं ताट ठेऊन, त्या भवती पाणी फिरवावं.
"ॐ नमो रजनिदेवोः नमः"  
चा उच्चार करून प्रसाद ग्रहण करावा.
सरते शेवटी चुईंग गम वाटून पूजा गोड करावी.      

स्त्रियांसाठी रजनी-व्रताचे सोवळे

वेळ: Friday, September 17, 2010
दीप्ती ने उचित प्रश्न उचलल्या मुळे आज हा पोस्ट कालच्या पोस्टचं extension म्हणा. 

स्त्रियांसाठी रजनी व्रताचं सोवळं -
लहान मुलींसाठी: 
लांब पायघोळ लेहंगा, दोन वेण्या, कपाळावर अंगारा, आणि व्रताचे १२ दिवस मोठ्या समजूतदार म्हातारीच्या तोंडचे वाक्य फाड फाड बोलत राहणे. (लहान मुलींसाठी इतकाच सोवळं पुरे) 

मुलींसाठी (वय वर्ष १८ ते २८):
तोकडे कपडे! स्कर्ट मात्र बेंबी खाली घालणे. (तुमच्या रुंदीचा विचार करू नका. (स्ट्रेच मार्क्सचा पण विचार सोडा)
अर्धा चेहरा झाकल्या जाईल असा गॅागल घालणे (दिवस असो कि रात्र)
कानात काना पेक्षा मोठी झुमके. वागणूक मात्र अगदी अल्लड असावी.
थोडक्यात कल्पना आलीच असेल. आणखीन लिहायची गरज मला वाटत नाही.

तरी तुम्हाला असले तोकडे कपडे घालणं लईच वंगाळ वाटत असेल, तर 
चक्क-मक्क साडी, कडक तकडबंद वेणी आणि पैंजण, बांगड्यांची कमी पडू नये. 
हा पोशाख वय वर्ष ४० पर्यंत घालू शकता. 
चेहऱ्यावर मात्र विनम्रता ओथंबून वाहणारी असावी. 
काही झालं (बरं-वाईट) कि रजनीकांत समोर डोळ्यात अश्रू आणून हात जोडून नमस्कार करणे. 

४० च्या पुढील स्त्रियांनी चक्क मक्क साड्या नेसण्याची हौस विसरून, सोबर साड्या नेसावया. 
आणि लहानग्यांवर रजनी भक्तीचे संस्कार करावे :)

तसं पाहता स्त्रियांसाठी काही कडक नियम नाहीयेत, पण तरी तुम्हाला त्यात काही भर टाकायची झाली तर जरूर टाका. 
पण वर दिलेले नियम मिनिमम requirement आहे.

रजनीकांत व्रत आणि त्याचं सोवळं

16 September 2010 वेळ: Thursday, September 16, 2010
हं, काल आपण नमस्कार करण्याची पद्धत आत्मसात केली. 

शंका आणि सूचना प्रतिक्रिया म्हणून नोंद करा. निषेध नोंदवण्यासाठी सिस्टम शट डाऊन करा.

आजचा विषय रजनीकांत ची पूजा करतांना पाळायचं सोवळं घेऊ - 
हे पहा देवाजींना काळा रंग आवडतो, आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान करायला आवडतो. 
तरी पण आरतीच्या वेळी रिक्षावाल्याचा शर्ट (बिल्ला असला तर सोन्याहून पिवळ)
लुंगी > निळ्या, जांभळ्या रंगाची असावी. (चौकड्याची असणं गरजेचं)
गळ्यात पिवळा / लाल रंगाचा रुमाल पाहिजेच. (satin चा असला तर तुम्ही रजनी देवा च्या एक पाऊल जवळ आहात)
गॅागल डोळ्यासमोर नसला तरी रजनीकांत पद्धतीने देहावर झुलत ठेवावा.

 रजनी व्रत करत असाल तर व्रताचे १२ दिवस झग-मग कपडे घालावेत!
अगदी ३ पीस सूट घातला असला तरी, गमछा घेण्यात काही चूक नाही.   
केस रंगवणे हे देवाजींना मंजूर आहे. 

स्वामी संकेतानंद जसे म्हणतात कि अंघोळ करणे व दाढी करणे हे झरुरी नाही. 
त्या बरोबरच काही साहित्य असणं गरजेचं आहे. 
खिश्यात एक माचीस, टूथ-पिक, सिक्का (नाणं) असलीच पाहिजे. 
काना वर बिडी / सिगारेट खोचावी. 
अंगठ्या आणि चेन आपल्या आवडी प्रमाणे घाला. 

रजनीकांत बसवतांना मखर मात्र हिमालयातील हिम आच्छादित शिखर ठेवा. हिमालय हि त्यांच्या आवडत्या जागांपैकी एक आहे बरं का!

रजनीकांत च्या नावाने MIND  IT आण्णा!!

रजनी देवाला नमस्कार कसा करावा

वेळ: Thursday, September 16, 2010
आज खरंतर टी.व्ही  वरच्या फाजील कलाकारांची मस्ती आणि त्यांना आदर भावनेने त्यांना जमू शकणारे इतर धंदे सुचवणारा ब्लॉग लिहणार होतो. 
पण रजनी देवाजींची आज्ञा झाली, "घेतलेलं काम असं सोडू नकोस" ताबडतोब ड्राफ्ट डिलीट करून टाकला मग!

तर आजचा विषय रजनीकांत देवाजींना नमस्कार करायची शैली कशी असावी. 
थोरा-मोठ्यांचा आणि पोर-टोरांचा विचार करता, नमस्कार - देवाजींच्या शैलीचा ठेवणीतला कठीण जाईल. सर्वांना जमेल असं नमस्कार! 
अशा पद्धतीने रजनी देवजींना नमस्कार करावं - 
उजव्या हातच्या तर्जनी व अंगठ्यात डाव्या कानाची पाळी धरून, जिभेचा टोक चावून, मग तसाच हात खाली घेऊन हृदयावर ठेऊन हलकेच वाकून नमस्कार!!

हि झाली कृती, पण आता तुमचे भाव डोळ्यातून दिसले पाहिजे! जाऊन एखाद्या मनसे च्या वाढीव कार्यकर्त्याला राज "साहेब" म्हणतांना बघा. हेच भाव डोळ्यात आणायचे आहेत हे लक्षात येईल. 
नमस्कार करायची काळ वेळ नाही. अगदी देवाजींच्या नावाचा उचार कानावर पडताच नमस्कार करण्याची प्रथा आम्ही पडली आहे. अगदी स्वमुखातून जरी देवाजींच्या नावाचा उच्चार झाला तरी पण. 
वंदन म्हणून उडती चुम्बंने, सलाम, डोळे मिचकावणे किव्वा धुम्र-काष्टीकेच / चैतन्य कांडीचे प्रज्वलन चालेल. 

अखेरीस आपले वंदन पाठवलेले आहे!! 

रजनीकांत बसवायच्या मागची श्टोरी

14 September 2010 वेळ: Tuesday, September 14, 2010
गणपती बसले!
गोंगाटाचे दिवस आले!
आता गणपतीच्या नावाखाली रस्त्यात मांडव उभे करता येतात. लाउड-स्पीकर पण सुरु ठेवता येतो. 
रहदारीचा किस्साच उदास होतो. असो.....मला काय चुगली करायची नाही. पण माझं म्हणणं आहे कि थिल्लरपणा करायचाच आहे, तर ते पण चाखत-माखत का?
संपूर्ण आस्वाद घेऊ यात कि! 

मग रजनीकांत बसवायची आयिड्या आमच्या डोक्यात फुलली. 
प्रोफ. सौरभ, संकेत ने आता हि आयिड्या पिकवायला घेतली. 
एखादा कार्यक्रम करायचाच तर मग काही कमी नको पडायला. 
तुम्हाला पण काही सुचत असेल तर नक्की सुचवा.

काम भरपूर आहे, रजनी देवाचे भक्तीगीतं मिळवण्या पासून पोथी आणि कथा लिहण्यापर्यंत.
स्वामी संकेतानंद ने पुढाकार घेऊन आरती रचली आहे. 
ज्या सपाट्याने रजनीदेवा मराठी ब्लॉग विश्वात झळकतायत,
तुमच्या घरी रजनीकांत बसवण्याची वर्गणी मागायला आलेली पोरं बघून दचकू नका.
स्वामी संकेतानंद च्या creativity चा आस्वाद घेण्यासाठी क्लिक करा

घडामोडी काही थांबणार नाही, लिहावं तितकं कमीच असेल.
पण एक गोष्ट निश्चित्त - आता मांडवाच्या मागे लपून पत्ते कुटायची गरज नाही! 

वर्सोवा बंदर - फोटो

वेळ: Tuesday, September 14, 2010
खूप दिवस झाले, पहाट बघितली नाही. 
घरून सहज निघालेला मी, वर्सोव्याला जाऊन पोहचलो.

परत येतांना फोटोज बरोबर एक-दोन कोळींशी ओळख घेऊन आलो.
एकाने मग "गरवायला दर्यात" मला न्यायची ऑफर दिली. 
मला पण समुद्रात मासे मारी करायला जायची इच्छा होतीच! 










रजनीकांत आरती - संकेत ची कमाल!

13 September 2010 वेळ: Monday, September 13, 2010
काल रात्री संकेत भौ ला रजनीकांत बसवायची कन्सेप्ट सांगितली, नेमकी रजनी देवाची आरती वर आम्ही अडकलो. संकेतने लगेच आरती ची जवाबदारी घेतली!
आज लॉग-इन  केलं तर संकेत भौ ने धृपद तयार केलंच होतं!
मराठी आरती अजून तयार होत आहे. सध्या हिंदी आरती गोड मानून घ्या!
रजनी देवाचे चित्रपट तरी कुठे मराठीत आलेत? (राजसाहेब हा तुमच्या साठी इशारा नाहीये, कृपया दुर्लक्ष करा)
(रजनीकांत चे चित्रपट मराठी मध्ये डब झाले तर प्रभात ला प्रीमियर शो बघण्यासाठी मी पहिला असेन! :p )

तर हि आहे रजनी देवाची आरती!


जयदेव  जयदेव  जय  रजनीकांता |
गुंडों  का  तू  फोड़े  हैं  माथा .. जयदेव  जयदेव ||१ ||


दस  गुंडों  को  तुने  एक  ऊँगली  से  धो  डाला
गरीबो  की  ज्योति  और  जुल्मियो  की   ज्वाला
तेरे  जलवे  से  कोई  नहीं  बच  पाता ||२||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

तेरे  पैरोंमे   तूफानों  की  आहट..
तेरे  गॅागल्स  में  स्टाइल  की  चाहत
लाचारों  का  तू  ही  जीवनदाता ||३||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

एक  गोलीमे  तुने  दो  गुन्ड़ोंको  मारा
तेरे  सामने  तो  यमराज  भी  हारा
तेरे  करिश्मे  और  कोई  न  कर  पाता ||४||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

सिगरेट  की  कांडी से  तुने  की  माया
५  फीट  उछालके  होंठोमे दबाया
सिगरेट  के  धुएं  से  हर  विलेन   मर  जाता ||५||
जयदेव  जयदेव....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव

निशदिन   रजनीजी  मन  में  हैं  प्यारे ..
फ़िल्में  उनकी  हर  दुःख -दर्द  दूर  करें 
तन  रोमांचित  हो  जाता, मन  धुल  जाता ||६||
जयदेव  जयदेव.....
जयदेव  जयदेव जय  रजनीकांता..
जयदेव  जयदेव


जो  यह  करे  रजनीजी  की  पूजा
कहत  संकेतानंद  स्वामी ,
भजत  संकेतानंद  स्वामी
जीवन  धन्य  हो  जाता ...
जय जय जय रजनीकांता ||७||

जयदेव  जयदेव  जय  रजनीकांता
गुंडों  का  तू  फोड़े  हैं  माथा 
जयदेव  जयदेव ..


आणि सरते शेवटी एक जय घोष पाहिजे!
रजनीकांतच्या नावाने.....  MIND IT  अण्णा  !!!

P .S .: आता संकेत भौ ची पण थोडी माहिती - लिहायचा लई कंटाळा हाय ह्यास्नी. पन लिवलं कि मग > बुंग!
           संकेत च्या ब्लॉग ला भेट देण्यासाठी इकडे क्लिक करा - मन मंजुषा


रजनी योग!

12 September 2010 वेळ: Sunday, September 12, 2010
आज एक रजनीकांत चा dialogue सुचला!
ह्याचा आगा पिच्छा हे केवळ माझे सर्व रजनी भक्त-बंधू आहेत!

"अबे ए अपने body के हर पुर्ज़ेपे LEFT, RIGHT और CENTRE मार्किंग करवा ले. क्योंकि, मैंने तेरे टुकड़े करने के बाद, तेरे लोगों को तेरी body इकट्ठा करने / जोडने में दिक्क़त नहीं होनी चाहिए!"
- सुप्पर स्टार रजनीकांत


आम्ही जास्तीत जास्त रजनीकांत चे dailogue फ्रेम करू शकतो, पण शब्द निवडणे हे रजनी-देवा वर अवलंबून आहे!

तसेच ह्या वर्षी आम्ही रजनीकांत बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तयारी कुठे हि कमी पडू देणार नाही. पण सोबतच काही नियम आणि सय्यम हि पाळू!
वेळच्या वेळी माहिती पुरवल्या जाईल, फोटो आणि प्रसादासाठी थोडा धीर बाळगा :)

कुठे काही चुकला असेल तर माफ़ करा!

अजून एक संध्याकाळ

10 September 2010 वेळ: Friday, September 10, 2010
फोटो काही खूप अप्रतिम जमला असं नाही, पण खूप दिवस झाले काही टिपलं नाही.
रंग एकदम आकर्षक-रीत्ये जुळून आल्यासारखे वाटले, आणि शटर उडाला!

THANK YOU!

06 September 2010 वेळ: Monday, September 06, 2010



This is a poem dedicated to all who have helped me to hold myself together in my “Not so good days”.

I just want to say a big
THANK YOU

For standing strong - through the arid desert of my testing times
When life was not calling my name
And with every breath – my beaten soul was drifting far away

For infusing life blood
When every ounce of energy had drained
In a longing that was never to be mine

For wiping my weary eyes
When the harmful sandstorms of blames
Brought tears to their dreamlessness

For keeping hope afloat
When every promise drowned in dismay
Killing me for innumerable times

For keeping the candle burning
When the sadness seemed to last for eternity
Even on long dark star-less nights

For bringing back my lost smile
When the meaning of happiness had altered
And I had forgotten the cheerier side of life

For helping me believe in myself
When for days I quit to be me
Because I was afraid of non-conformity

For making my days special
When I waited for all the occasions
Worthlessly for someone to come back

For talking to me tirelessly
When pain didn’t accord me sweet sleep of peace
And tore my dreams into a thousand splinters

For helping me regain the spring in my step
When I couldn’t stand on my own feet
Defeated and desolated by myself

For tracing back my extinct worth
When I was rendered worthless
Good for nothing by the one who was closest of all

For being my support system
When I needed someone to understand and appreciate me
And not judge me by my short-comings

For understanding my failure
When everyone pointed fingers
And did not bother to be considerate

For helping me recover
When I could not get over the mirage of my loss
And kept wandering in search of a respite

Really, thank you for this and everything else
But more importantly……

For Welcoming me back with open arms,
When I thought I had nowhere to go
And it took a while for me to realize that I had finally come back home….


- By Me!

बाजी

वेळ: Monday, September 06, 2010
ब्बारं... आता तुम्हाला "बाजी मारणे" हा शब्दप्रयोग कसा रुढ झाला माहितीये का??? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... मी तुमची भाषापरीक्षा घेत नाहिये. पण "शल्य बोचणे" ह्या शब्दप्रयोगाची व्युत्पत्तीकथा ऐकून "बाजी मारणे" हा शब्दप्रयोग कसा जन्मला ते आठवलं आणि राहवलं गेलं नाही म्हणून सांगावसं वाटलं. बरय हे सांगण्यासाठी मी जास्त पकवत नाही. मी खाली जो दुवा देतो आहे त्यावरचा लेख आवर्जुन वाचा.

http://www.loksatta.com/lokprabha/20090515/cover.htm

ठळक नोंदी:
  • अपराजित कामगिरीने पराक्रम, विजय अश्या शब्दांना नविन ओळख देणारा - बाजी.
  • जगाच्या इतिहासातील एकमेव अजेय योद्धा - बाजी.
  • १७२८ मधील पालखेडची लढाई म्हणजे 'मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी'. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यसक्रमात हि लढाई आजही अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. असा चाणाक्ष युद्धनीतीज्ञ - बाजी.
  • सर्वात वेगवान घोडदळ असणारा योद्धा - बाजी.
  • पोख्त, प्रामाणिक, सत्यवचनी, द्रष्टा, मातब्बर, हळवा पण स्वतःबद्दलच्या चुकीच्या ओळखीच्या ग्रहणाने झाकोळलेला असा - बाजी.

आपला,
(बाजीस कुर्निसात) सौरभ

शल्य

04 September 2010 वेळ: Saturday, September 04, 2010
तुम्हाला कधी शल्य बोचणे/टोचणे, शल्य राहणे असला अनुभव आलाय का? मला सांगा शल्य बोचायला/टोचायला तो काटा आहे कि रहायला दुःखाला समानार्थी शब्द आहे? आयला मग हे शल्य म्हणजे मॅटर हाय काय? वेल, नसेल माहित तर मग तुम्हाला खालचा फाफटपसारा वाचावा लागेल....

डॉक्टरचा सहज फोन आला. २०-२५ मिनिटं शिस्तीनुसार आम्ही एकमेकांना पकवलं. मग फोन ठेवता-ठेवता...
डॉक: चल मग, ठेवतो. बोलू नंतर. जय श्रीराम.
मी: जय नकुल-सहदेव.
डॉक: हे काय??? नकुल-सहदेव का???
मी: आता तु जय श्रीराम बोल्लास, मी जय श्रीकृष्ण बोल्लो असतो. नेहमीची नावं झाली ती. म्हटल कोणा वेगळ्याचं नाव घेऊ. तसंपण नकुल-सहदेवांना कोणी विचारत नाही. ह्या नकुल-सहदेवांचा काही रोल होता का रे महाभारतात?
डॉक: हो, मग काय. कर्ण ह्यांच्यामुळे हरला.
मी: ऑ... काय सांगतोयस???
डॉक: हो. नकुल-सहदेव माद्रीची मुलं. शल्य माद्रीचा भाऊ, म्हणजे ह्यांचा मामा. महाभारताची लढाई झाली तेव्हा शल्य त्याचं सैन्य घेऊन पांडवांच्या मदतीला निघाला. पण तो वाटेत असताना शकुनीने डाव रचला. त्याने त्याच्यासाठी महाल बांधला. त्याची आणि त्याच्या सैन्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली. शल्याला माहित नव्हतं कि हे सगळं शकुनीने केलय. त्याला वाटलं कि युधिष्ठीराने हा सगळा पाहुणचार केला. युधिष्ठीराला तो थॅंक्यू म्हणायला गेला तेव्हा युधिष्ठीर बोल्ला की मी हे काही केलं नाही, मला काही माहित नाही. नंतर त्याला समजल की हे सगळं दुर्योधन आणि शकुनीने केलय. क्षात्रधर्मानुसार एखाद्याचं आदरातिथ्य घेतल्यावर तुम्ही त्याचं देणं लागता. शल्याने दुर्योधनाचं आदरातिथ्य घेतल्याने त्याने  दुर्योधनाला विचारलं की तुला ह्या बदल्यात काय पाहिजे? दुर्योधन शल्याला म्हणाला, तु तुझ्या सैन्यासह पांडवांविरुद्ध लढायला मला मदत कर. आता शल्य त्याच्या बहिणीच्याच मुलांविरुद्ध कसा लढेल? तेव्हा तो दुर्योधनाला म्हणाला, मी तुला माझं सैन्य देतो पण नकुल-सहदेव माझे भाचे आहेत. मी त्यांच्याविरुद्ध लढणार नाही. हवंतर मी तुझं सारथ्य करतो. श्रीकृष्णानंतर सारथ्य करण्यात जर कोणी पारंगत असेल तर तो शल्य होता. अर्जुनाला टक्कर देणारा धनुर्धारी कर्ण होता. अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण, म्हणुन कर्णालापण श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी मिळावा म्हणुन दुर्योधनाने शल्याला कर्णाचं सारथ्य करायला सांगितलं. शल्य तयार झाला. पण शल्याने कर्णाची वाट लावली. सारथ्याचं काम असत की तो ज्या योद्ध्याचं सारथ्य करतो त्याला प्रोत्साहित करायचं, जसा श्रीकृष्ण अर्जुनाला करायचा. पण शल्य कर्णाला घाबरवायला बघायचा. त्याला नेहमी टाकूनपाडुन बोलायचा. कर्णाला तसापण शाप होताच. जेव्हा त्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्याला त्याची विद्या वापरता येणार नाही. त्याला काही आठवणार नाही, त्याच्या मनात भिती असेल. कर्णाला डिमोरलाईझ करण्याचं सगळ्यात मोठ्ठ काम शल्याने केलं.
म्हणुनच मराठीत शल्य बोचणे/टोचणे/राहणे म्हणतात ते ह्यावरुनच.
मी: (फुलऑन आश्चर्यचकित!!! बोलेतो भौचक्का!!!) क्कॉय बोलतो...
डॉक: हो, कारण शल्याने मानसिक खच्चीकरण केलं.

तर आता तुम्हाला समजलं असेलच शल्य बोचणे/टोचणे/राहणे हा शब्दप्रयोग बोलीभाषेत कसा आला. त्यामागे एवढं मोठ्ठं रामायण... सॉरी महाभारत घडलं.

अवांतर:
मी: ते ठिकाय. पण ह्यात नकुल-सहदेवांचा काय संबंध???
डॉक: अरे, आता नकुल-सहदेव शल्याचे भाचे म्हणुन तो त्यांच्याविरुद्ध लढला नाही. आणि त्यांच्यामुळेच कौरवांच्या साईडने असुनपण पांडवांच्या फायद्याचं केलं.
मी: हम्म्म्म्म... इनडायरेक्ट रिलेशन. कॉम्प्लीकेटेड आहे.
पुढे आमच्या महाभारत ह्या टॉपिकवर बराचवेळ गप्पा झाल्या. डॉक्टरला महाभारत हा इतिहास असल्याचा पुर्ण विश्वास आहे. मला ते खरंखोटं ठरवण्याचा विवाद करण्यात रस नाही. महाभारत हे एका ऋषिने कोणा राजाला ऐकवलं होतं. राजाचं नाव आठवत नाही, पण डॉकने त्या ऋषिचं नाव सौती असल्याचं सांगितलं आणि सौतीने जे सांगितलं ते म्हणजे 'महाभारत'. व्यासांनी जे लिहलं ते 'जय' म्हणुन, ज्यात ३२,००० ओव्या आहेत/होत्या. पुढे त्यात अनेक ऋषिमुनींनी त्यांच्यात्यांच्या ओव्यांची भर टाकली, ज्यामुळे त्या ओव्यांची संख्या १ लाखाच्या आसपास गेली. ह्यामुळेच आणि भाषांतर करताना भावार्थ समजुन नं घेता शब्दार्थ समजुन घेतल्याने महाभारतातल्या (रामायणातल्यासुद्धा) अनेक घटनांची तर्कसंगती लावणं निव्वळ अशक्य आहे.

आपला,
(शल्यविशारद) सौरभ

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates