रजनीकांत व्रत आणि त्याचं सोवळं

16 September 2010 वेळ: Thursday, September 16, 2010
हं, काल आपण नमस्कार करण्याची पद्धत आत्मसात केली. 

शंका आणि सूचना प्रतिक्रिया म्हणून नोंद करा. निषेध नोंदवण्यासाठी सिस्टम शट डाऊन करा.

आजचा विषय रजनीकांत ची पूजा करतांना पाळायचं सोवळं घेऊ - 
हे पहा देवाजींना काळा रंग आवडतो, आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान करायला आवडतो. 
तरी पण आरतीच्या वेळी रिक्षावाल्याचा शर्ट (बिल्ला असला तर सोन्याहून पिवळ)
लुंगी > निळ्या, जांभळ्या रंगाची असावी. (चौकड्याची असणं गरजेचं)
गळ्यात पिवळा / लाल रंगाचा रुमाल पाहिजेच. (satin चा असला तर तुम्ही रजनी देवा च्या एक पाऊल जवळ आहात)
गॅागल डोळ्यासमोर नसला तरी रजनीकांत पद्धतीने देहावर झुलत ठेवावा.

 रजनी व्रत करत असाल तर व्रताचे १२ दिवस झग-मग कपडे घालावेत!
अगदी ३ पीस सूट घातला असला तरी, गमछा घेण्यात काही चूक नाही.   
केस रंगवणे हे देवाजींना मंजूर आहे. 

स्वामी संकेतानंद जसे म्हणतात कि अंघोळ करणे व दाढी करणे हे झरुरी नाही. 
त्या बरोबरच काही साहित्य असणं गरजेचं आहे. 
खिश्यात एक माचीस, टूथ-पिक, सिक्का (नाणं) असलीच पाहिजे. 
काना वर बिडी / सिगारेट खोचावी. 
अंगठ्या आणि चेन आपल्या आवडी प्रमाणे घाला. 

रजनीकांत बसवतांना मखर मात्र हिमालयातील हिम आच्छादित शिखर ठेवा. हिमालय हि त्यांच्या आवडत्या जागांपैकी एक आहे बरं का!

रजनीकांत च्या नावाने MIND  IT आण्णा!!

4 प्रतिक्रिया

 1. ajun kay kay yaych baki aahe Baba ;)

  Rajani Mind Itt :)

 2. सौरभ Says:

  करुया उदो उदो उदो... रजनिकांतचा...

 3. Deepti Says:

  lol....आवडलंय आपल्याला हे व्रत....,तसा कठीण नाहीये....पण हे झालं पुरुषांसाठी सोवळं मग बायकांसाठी काही वेगळी सोय आहे का??

 4. Aakash Says:

  ओ तेरी! गल्लत झाली! ताबडतोब आता लगेच खरडतो.

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates