रजनीकांत व्रत - प्रसाद आणि नैवेद्य

17 September 2010 वेळ: Friday, September 17, 2010
काल रात्री एक सुखद स्वप्नं पडलं. देवाजींच्या भक्तीत सध्या आम्ही ज्या डुबक्या लावतोये, त्या ओघात एक रजनी मंदिर उभारण्यात आलं. ह्या भव्य सोवळ्यात साक्षात देवाजी स्वतः प्राण प्रतीष्ठानासाठी आले असतांना आमच्या मस्तकावर हात ठेऊन रजनी देवाने आम्हाला आशीर्वाद दिला. ह्या पुढचं मात्र काही आठवत नाही. अचानक डोळ्यांसमोर उजेड पसरला, डोळे उघडले तर अजून बाहेर अंधार होता आणि खोलीचा दिवा बंद होता. 

आज आपण प्रसाद काय असावा - हा विषय छेडू या!

प्रसादात च्युईंग गम असणं जरुरी आहे.
तीर्थ म्हणून फळांचा रस किव्वा दही उत्तम. 
नैवेद्य विशेष करून चिकन अथवा मटणाचे प्रकार असावेत (देवाजींचे आवडते)
देवाजींचे आवडते शाकाहारी पदार्थ असे दिसले नाही कुठे आम्हाला, पण आम्हीच सहमती देतो तुम्ही छानशी बटाट्याची भाजी (वरून कोथिंबीर भुर्काव्लेली) आणि पुरी हा नैवेद्य दाखवावा.
प्रसादाचा आस्वाद घेतल्या नंतर कॉफी नक्की प्यावी. (लहान मुलांनी दूध आणि शराब्यांनी आयरिश कॉफी)
धुम्राकाष्टिका एका वेगळ्या डबीतून पेश करावी, आणि चिलीम वर मजल मारू नये. ताबा ठेवायला शिका.

नैवेद्याच्या ताटा खाली, नुकतंच ठरलेलं भारतीय रुपयाचं चिन्ह पाण्याच्या बोटाने काढावं. (हो ते चिन्ह पण देवाजींच्या नावातील पाहिलं अक्षर लक्षात घेऊन निवडलं आहे)
मग त्या चिन्हावर नैवेद्याचं ताट ठेऊन, त्या भवती पाणी फिरवावं.
"ॐ नमो रजनिदेवोः नमः"  
चा उच्चार करून प्रसाद ग्रहण करावा.
सरते शेवटी चुईंग गम वाटून पूजा गोड करावी.      

2 प्रतिक्रिया

  1. >> हो ते चिन्ह पण देवाजींच्या नावातील पाहिलं अक्षर लक्षात घेऊन निवडलं आहे)

    हे लय लय भारी होतं !!

  2. सौरभ Says:

    फक्कड... देवाजींच्या नावाने चांगभलं...
    (चिंगम च्यांव च्यांव च्यांव च्यांव)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates