रजनी देवाला नमस्कार कसा करावा

16 September 2010 वेळ: Thursday, September 16, 2010
आज खरंतर टी.व्ही  वरच्या फाजील कलाकारांची मस्ती आणि त्यांना आदर भावनेने त्यांना जमू शकणारे इतर धंदे सुचवणारा ब्लॉग लिहणार होतो. 
पण रजनी देवाजींची आज्ञा झाली, "घेतलेलं काम असं सोडू नकोस" ताबडतोब ड्राफ्ट डिलीट करून टाकला मग!

तर आजचा विषय रजनीकांत देवाजींना नमस्कार करायची शैली कशी असावी. 
थोरा-मोठ्यांचा आणि पोर-टोरांचा विचार करता, नमस्कार - देवाजींच्या शैलीचा ठेवणीतला कठीण जाईल. सर्वांना जमेल असं नमस्कार! 
अशा पद्धतीने रजनी देवजींना नमस्कार करावं - 
उजव्या हातच्या तर्जनी व अंगठ्यात डाव्या कानाची पाळी धरून, जिभेचा टोक चावून, मग तसाच हात खाली घेऊन हृदयावर ठेऊन हलकेच वाकून नमस्कार!!

हि झाली कृती, पण आता तुमचे भाव डोळ्यातून दिसले पाहिजे! जाऊन एखाद्या मनसे च्या वाढीव कार्यकर्त्याला राज "साहेब" म्हणतांना बघा. हेच भाव डोळ्यात आणायचे आहेत हे लक्षात येईल. 
नमस्कार करायची काळ वेळ नाही. अगदी देवाजींच्या नावाचा उचार कानावर पडताच नमस्कार करण्याची प्रथा आम्ही पडली आहे. अगदी स्वमुखातून जरी देवाजींच्या नावाचा उच्चार झाला तरी पण. 
वंदन म्हणून उडती चुम्बंने, सलाम, डोळे मिचकावणे किव्वा धुम्र-काष्टीकेच / चैतन्य कांडीचे प्रज्वलन चालेल. 

अखेरीस आपले वंदन पाठवलेले आहे!! 

1 Responses to रजनी देवाला नमस्कार कसा करावा

  1. sanket Says:

    हाः हाः हाः.. कर दिया तुने post. आता हा नमस्कार प्रसिद्ध होऊ देत.

    रजनीकांतजींच्या नावाने.. MIND IT अण्णा !!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates