रजनी भक्तीचा राजमार्ग

19 September 2010 वेळ: Sunday, September 19, 2010
आज रजनी देवा बसवण्याचे नियम लिह्ण्यापेक्षा जरा गप्पा माराव्या म्हणतो. रोज नियमावली पोस्ट करत राहिलो, तर हि भक्ती उर्फ परंपरा थोडी रटाळ वाटेल. 

आता सुरवात आभार मानून करतो. स्टार गोल्ड ह्या वाहिनीने आमच्या विशेष मागणीवरून आज देवाजींचा "शिवाजी - द - बॉस"  दाखवण्या बद्दल, तमाम रजनीकांत भक्त स्टार गोल्डचे आभारी आहेत.

बऱ्याचदा आम्ही देवाजींच्या भक्ती - योगाचा आस्वाद घेत असतांना त्यांच्या महत्तेत बुडून जातो.
नास्तिकांना देवाजींची महत्ता हा थट्टेचा विषय वाटतो, तुम्हाला आज काही माझे विचार मांडतो.
देवाजींची कर्म असे बंधनकारक आहेत, कि हा प्रांत कसा बांधल्या जातो बघा -
आपण देवाजींचे चित्रपट बघतो, संत चीरांजीविंचे, संत नागार्जुन, संत एन.टी राम राव जुनियर ची चित्रपट पण बघतो. जरी देवाजी आणि इतर संत वेग-वेगळ्या भाषेतल्या चित्रपटांमध्ये अभिनय करतात, तरी आपण ह्या सर्व चित्रपटांना साउथ - इंडियन चित्रपट म्हणून ओळखतो. हाच तो माझा मुद्दा! आपल्याला आंध्र, कर्नाटक, तमिळ नाडू सगळा एक कॉम्बिनेशन प्रांत वाटतो. कोणी मद्रासी नाही, कोणी आण्णा नाही. आपल्यासाठी सगळे साउथ इंडियन! सगळे एक! 
आपल्याला बुवा भेद भाव आवडत नाही. राज ठाकरेंना देवाजींची दीक्षा दिल्यास सरकारी मालमत्ता न पेटता आपल्या सेवेत हजर असू शकते.
(** नोट: नागार्जुन, चिरंजीवी हे रजनी देवाचे भक्त आहेत. ह्यांचा उल्लेख संत म्हणूनच करावा. देवाजींनी स्वतः संत नागर्जुनला स्वप्नात दर्शन देऊन आपले I.I.T चे शिक्षण संपवून मग M.I.T - अमेरिका येथून करण्याचा सल्ला दिला.)    

देवाजीचं मानणं आहे कि माणसांना माणसा सारखं वागवा. मानवहित बघून एखादा निर्णय घेतात. एक महान अभिनेता झाल्यावर पण नखभर अहंकार दिसून येत नाही. 
ह्यामागचे कारण असे कि देवाजी आधी carpenter होते मग कुली अन मग कंडक्टर मग अभिनेता आणि सरतेशेवटी देव (ह्याच जन्माबद्दल बोलतोये मी). आता इतके काबाडकष्ट करून आलेला माणूस आपण लोकांना किती जवळचा वाटतो. देवाजींकडून शिकून घेण्यासारखे तसे खूप काही आहे. युवा पिढीसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून तर दिल्याच पण सोबत शिक्षण मोफत देण्यात येतं. देवाजी असे एक दिव्या पुरुष आहेत ज्यांच्याकडे माणुसकी स्वच्छ किरणांसारखी आहे. 

ढगात राहणाऱ्या देवांच्या छुट-पुट लढाई झगड्यात पानं च्या पानं भरली, पण रजनीच्या लढाया छुट-पुट नसतात आणि त्या लढाईची नोंद कागदावर करण्या ऐवजी त्याचा एक सिनेमा काढतात. ह्या मागचं कारण असं कि रजनीशी पंगा घेणारा हा अडाणी जातीचा असणार, अन अश्या अडाण्याला लिहून दिलेलं कसं समजणार? मग ह्या दुश्मनांना चेतावणी देण्याकरिता सिनेमा काढावा, किमान चित्रातून तरी दुश्मनांना अक्कल येईल. हा इतका पूर्व विचार देवाजींनी केलेला असतो. 

आता तुम्हीच सांगा हे सर्व गुण असलेल्या मानव-आकृतीला तुम्ही काय म्हणून संबोधित कराल? 
मला विचारल्यास मी क्षणभरही विचार न करता अचूक उत्तर देईन - देव!!

4 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    न भूतो... न भविष्यती... ^:)^

  2. सौरभ Says:

    best Punch-line >> "देवाजी आधी carpenter होते मग कुली अन मग कंडक्टर मग अभिनेता आणि सरतेशेवटी देव (ह्याच जन्माबद्दल बोलतोये मी)."
    its Larger than Life...

  3. Aakash Says:

    धन्यवाद सौरभ!

  4. Ashwin Says:

    श्रीरजनीकांत यांच्या महत्तेची ज्यास ओळख पटली, त्यास उभ्या जगात काहीही अशक्य आणि असाध्य नाही!! जय हो!!

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates