Being Seriousss...

21 December 2010 वेळ: Tuesday, December 21, 2010
एकदम सन्नाटा... नीरव गडद शांतता... इतकी की टाचणी पडली तरी कानठळ्या बसाव्यात... अश्यावेळी फक्त एकच आवाज ऐकू येतो...

सोsss हमsss
सोsss हमsss
सोsss हमsss

काही क्षण असेच ती अनैच्छिक क्रिया ऐकण्यात जातात... बेसावध...

अचानक एक दिलासा देऊन जाणारी जाणिव होते. मी जिवंत आहे. माझे श्वास चालू आहेत. पण... पण पुढचा श्वास ऐकू नाही आला तर.... मणके गोठवत जाणारी भिती थरकाप उडवत पुर्ण अंगातून सळसळते...

आणि खरच पुढच्या क्षणाला तसच होतं. श्वास ऐकू येईनासा होतो....

कारण......


तुमची समाधी भंगलेली असते. तुम्ही तंद्रीतुन बाहेर आलेले असता... ज्यासाठी श्वास चालू आहे ते जगण्यासाठी.... तो फिर नाच्च्यो.... धत्तरतत्तर धत्तरतत्तर... अपडी पोडे पोडे पोडे... च्यायला काय राव... अरे भाय कितना सिरिअस... काय चाल्लय काय... और कायको... कशाला डोक्याची काशी घालून घेताय. सध्या सगळीकडे गंभीर-गंभीर माहोल आहे. म्हटलं... आपणपण थोडं सिरिअस झालं पाहिजे. आणि मला त्या साथिची लागण झाली. आपण लय सेंसेंटिव... (कोण???) सेंसिटिव्ह... पण माझ्यासाठी हे असले विचार आणि नाकातला शेंबुड एकसारखेच. झाली सर्दी माझ्यापण डोक्याला. धत्ततिच्या... लगेच डोकं शिंकरलं... I mean आपटलं... नाय ठोकलं(???)... झटकलं(!!!)... हाड हाड... केलं काय तरी... भ्यॅक्क... ओकलो (शेंबुड ओकला???) आपलं... शिंकरलो इकडे सगळं. आता फ्रेश येक्दम. साला सिरिअस होता येत नाय राव मला. गंभीर बाब है की ही.

सो... श्श... शॉ.. ऑ... हाsssक्ष्च्छीsss....

आपला,
(शेंबडा sorry गंभीर) सौरभ

8 प्रतिक्रिया

 1. >> साला सिरिअस होता येत नाय राव मला. गंभीर बाब है की ही.

  हेहे सौरभबाबा.. झक्कास :)

 2. भानस Says:

  :)

 3. अनघा Says:

  बुवा, तुम्हीं नकाच होऊ सिरियस! नाहीतर मग आमची गाडी घसरली कि हसतखेळत पुन्हां रुळावर कशी येणार?! :D

 4. सौरभ Says:

  @हेरंब: जरा वांदे आहेत रे त्या बाबतीत. ;-) धन्यू.

  @भानस: :-) keep smiling always

  @अनघा: तुम्हाला वाटतं का मी सिरिअस होईन असं??? don't be serious, be sincere... आणि आता नाही घसरणार कधीच तुमची गाडी रुळावरुन. :-)

 5. Aakash Says:

  Bawaaa >:D< aajaa ajjaa dil nichode!!

 6. परम पूज्य सौरभ महाराज कि जय !!!!

 7. THE PROPHET Says:

  अवघड आहे एकंदरित! :P

 8. सौरभ Says:

  @आक्या: आज्जा आज्जा दिल निचोडा...

  @श्रीराज: बालक, ऐसेही जयजयकार करते रहो और ज्ञान पाते रहो. =))

  @बाबा: अरे, अवघड नाय... तंद्री लाव, बघ, एकदम सोप्पय. ;)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates