एक हॉर्मोनचा शोध

07 December 2010 वेळ: Tuesday, December 07, 2010
 
मी अत्यंत फुकटचंद रिकामटेकड्या डोक्याचा आहे असं नाही. पण सालं सुचतंच असं कि मग ते पोस्ट करायची खाज, पोस्ट केल्या शिवाय जात नाही.

CAUTION: सभ्य भाषेची अपेक्षा ठेऊ नका.

तर ह्या वेळी बाब अशी आहे, मी मधे एक स्वखर्चात एक रिसर्च केला. रिसर्च म्हणजे नेमका काय केलं -
विविध लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले. माणूस घरी असतांना, कार्यालयात असतांना, खरेदी करतांना, हागल्या-पादल्याला त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा केले.
आश्चर्य म्हणजे एक नवीनच हॉर्मोन माझ्या नजरेस आला!
मी त्या हॉर्मोनचं नाव मग : "आई घाल्या हॉर्मोन" ठेवलं. 
हा हॉर्मोन विशेषकरून माणसं रस्त्यावर गती पकडू लागल्यावर रिलीज होतो.
तसं पाहता, ह्या हॉर्मोनचं प्रमाण काही ठराविक नसतं, पण रक्तात मद्य, भिनलं असतांना हॉर्मोनचा असर जास्ती होतो.

नेमकं हा हॉर्मोन रिलीज होतो म्हणजे काय होतं ते बघा :
लोकांना आपण "रायडर" असल्याचा भास होतो. (आता मी कुठे म्हणतो कि तुम्ही बेजावाब्दारपणे गाडी हाकता)
.....थोडक्यात लोकं "रीतसर" गाडी चालवतात.

रिक्षावाल्यांमध्ये हा हॉर्मोन मुबलक प्रमाणात मिळतो, बस चालक ह्या होर्मोंचे बूस्टर आपल्या तंबाखू बरोबर मळून घेतात. (हो आम्ही अश्या बस चालकांची पीक कलेक्ट करून हे बोल्तोये.) अजून आमचा अभ्यास ग्लोबल झाला नसला, तरी आम्ही दावा करू शकतो कि तिसर्या दुनियेतल्या सगळ्या देशात हा हॉर्मोन आढळत असावा.

ह्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असतां आम्हाला समजला कि ते लोक आमच्या बापाचं काही खात नसल्याने असं होतं. म्हणूनच सगळ्यात जास्ती उत्तरं,"तुझ्या बापाचं खातो का?" ह्या category मध्ये नोंदवल्या गेले.

हॉर्मोन रिलीज होण्याचा आणि बुडाखालच्या गाडीचा काही मात्र संबंध नाही. माणूस हायाबुसा वर बसलेला असो, किंवा सनी झिप वर. आपल्या मागे कोणाचा हात आहे, ह्या वरून हायपर किव्वा हायपो सिक्रिशन ठरतं. नंबर प्लेट वर महाराजांचा उल्लेख असेल तर त्याच्या हॉर्मोन लेवेल थोड्या जास्ती असण्याची शक्यता असते. पण जर नंबर प्लेट वर "डॉली, मोनाली, जानू, आशिक, mom says no girls" असं काही लिहला असेल, आणि रायडर ने मर्क्युरी चा गॉगल "टाकला" असेल, तर हॉर्मोन चा विचार करूच नका; आधी गाडीची चावी काढा, handle lock करून गाडी main stand वर लावा. तुमची चूक नसतांना कशाला गाडीचा inssurance क्लेम करायचा?

शेवटच्या टप्प्यात आम्ही काही landing gear मध्ये गाडी चालवणार्यांना विचारलं. अजून आमच्या अंगाचे काही भाग सुजलेले आहेत, आणि डोकं बधीर!

  

7 प्रतिक्रिया

 1. भानस Says:

  हा हा... तू पण ना सौरभ, काय काय किडे करशील. ऎनालिसिस मात्र परफेक्ट. शेवटून दुसर्‍या परिच्छेदात बरीच बुडे हाणलीस की तू... :D

 2. सौरभ Says:

  अरे... भानस ताई, हाहाहा... हे माझे किडे नाहित... lol हे सगळं ऍनालिसिस आकाशने केलय. :)

 3. भानस Says:

  आता हा आकाश कोण रे? आणि तो तुझ्या ब्लॊगवर काय करतोय?? बाकी किडे झकास आहेत. :)

 4. सौरभ Says:

  अरे.. आकाश आणि केतकी माझे खासम्खास मित्रमैत्रिण. आमच्या तिघांचे ब्लॉग आम्ही ह्या एका ब्लॉगलिंकवर एकत्र केलेत. इकडे तिघांच्या ब्लॉगवरच्या पोस्ट एकत्रितपणे वाचता येतिल. :)

 5. भानस Says:

  yaa... मी पण यडचापच, :D. नंतर सगळ्यात वरची ओळ वाचली. :)

 6. Aakash Says:

  हे हे! धन्यवाद भानस ताई!

 7. THE PROPHET Says:

  लई भारी ऍनॅलिसिस! :D

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates