Scribbler at work

03 December 2009 वेळ: Thursday, December 03, 2009
बर्‍याच वर्षांपूर्वी नागेश बनून लिहलेली एक गोष्ट आज दिसली. अचानक जुन्या आठ्वणी परत एकदा वाहू लागल्या.....
ब्लॉग वर टकावस वाटले.
Ctrl +C आणि Ctrl+V दबायला किती वेळ लागतो......
काही अभिप्राय असतील तर झरूर लिहा.



चेस
||1||

"सिद्ध्या हे काय? काय खेळलाय्स तुला तरी कळतंय का? अरे बेट्या फुकट खेळायचा म्हणून खेळू नकोस. चल फाजील पणा पुरे झाला, व्यवस्थित खेळ."
"अबे काय करू? बिडी मारायची जाम तलफ होऊ रायलीये, साला आणि तू पटकन गेम संपवत पण नाहीस."

"अरे पाप्या मग खालच्या गल्लीत-ल्या पोरं-बरोबर गोट्या खेळ ना!"
"नाय मला पॉकेट टेन्निस खेळायची सवय नाही रे!"


"चल पुरे कर, हे घे आता!"
"साला हा कधी सुधारणार", मी हळूच मनातल्या मानता पूट-पुटलो
"काय करणार रे? स्वभावच असा आहे!" सिद्ध्या
"आयला ह्याच्या मारी ह्याला कसे ऐकू गेले?", परत मनातल्या मानता.
सिद्ध्या एक भुवई वर घेत, आणि एखाद्या गवय्या-या ने सूर लावावा तसा हाव भाव करत , “ बस्स क्या भाई? तू कहे और हम ना माने?"

"बरं काय खेळ-लास?"
" काही खास नाही, NB2!"
"अबे हा तर ट्रिपल फोर्क पडला आपल्या वर! आता काय?"
आज सिद्ध्या ने लय जोर बसवला होता.
"चला आता अहिंसा बघवत नाही मला, हे घे!"
"सल्ल्या नेपोलियन च्या पोटी जन्मा का नाही घेतलास? तुझ हेच नाही आवडत मला, तू दंगली पेटवल्यास की मग सगळ्या प्लॅन्स चा बोऱ्या वाजवतोस."

"अरे मग आणखीन काय करणार?" वाक्या संपे पर्यंत सिद्ध्यने बघितले की आता निम्म्या होऊन जास्ती सैन्याची कत्तल होणार. आणि 5 सेकंदात, माझ्या मूव्झ सकट पुर्ण खुनी युध स्वताह: पार पाडले.

"चल मग आता तुला खेळायचाय" सिद्ध्या.

"हे घे!"
ढेकर दबावा तसा आवाज़ काढला आणि तोंडाचा चंबू करत त्यातून हवा सोडत पुरर्रर्र आवाज केला.

सिद्ध्या, "काय फरक नाही पडत मला. हे घे."
चान्स बघत मी परत दुसऱ्या दंगली पेटवायच्या हालचाली केल्या!
सिद्ध्या गालातल्या गालात हसला, त्याला लक्षात आला, आता ह्या नेपोलियन चा हिटलर होणार, तरी ह्याने तिकडे दुर्लक्षा केला!
मी आपला डोळ्यातून रक्ताच्या ओकार्‍या करत आणखीन एक डाव टाकला!
आणि सिद्ध्यला म्हणालो, आता बहुतेक 50 मूव्झ ची वेळ येणार.
सिद्ध्या कंदिलाची वात वाढवत म्हणाला, "मला नाही वाटत असं, घे!”
आणि मी खाली बघतो तर मी क्लियर चेक मेट झालो होतो!

"भेंडी सल्ल्या हा कुठून आला?"
सिद्ध्या, "तुझ्या दंगलीत वाचलेला हा एक बिशप!"

"वा पठ्ठ्या गुड रे! भीड लेका!"
म्हणत दोघा पण उभे झालो, आणि पटा-पट्ट कपडे चढवत पान-पट्टी वर पळालो.
खाली पान पट्टी बंद. अबे किती वाजले? दोघांनी पण मोबाईल स्क्रीन बघितला.

माझ्या मोबाईल वर शून्य दोन-शे उमटले होते! 0200
"फट्टू भूक लागली बे!"
"चल पहिले Swargate ला जाऊ, तिकडून स्टॉक घेऊ."
"बोक्या मला भूक लागलीये."
"साल्या तुझ्या मुळे गेम इतका वाढला, त्या तुझ्या मशीन चा फोन आला नसता तर त्यात तू एक तास वाया घालवला नसतासा. "
"अबे सकाळ पासून मशीनशी काही बोलणं झालं न्हव्ता, तुला कोणी मशीन पट्ली नाही म्हणून मला खिज़वू नकोस रे! "
"चला पुरे",
"काय खायचाय बोल?"
"आरे सकाळच्या पोळ्या आहेत!"
"किती?"
" त्या खेकडी ने 20 केल्या होत्या. आमच्या पोळी-वाल्या बाई च्या चालीला नज़र-अंदाज़ ना करता सिद्ध्यने तिला खेकडी नाव ठेवले होत!"
"हा बस्स! मग असा करू, स्वारगेट वरून बिड्या उचलू. "
"आणि काय तूप-साखर पोळी खाणार का?"
"नाय रे तिकडून 5 आलु-बोंडे उचलून घेऊ. म्हणजे पोळ्यान-बरोबर भाजी झाली!"
"तुझ्या कडे किती आहेत?"
"25 आहेत. तुझ्या कडे?"
"माझे मीटर डाउन आहे रे, इकडून तिकडून चिल्लर निघतील तेवढेच."
"चल फक्त बिड्या आणू! आणि घरी गेल्यावर काय खायच ते बघू."




||2||

E4 .E5
Nf3 Nc6
Bc4 Bc5
giuoco piano
पुढची मूव कुठली येते बघू थांब.

Pg6
हा सटकलाय का? उगाच . . ओपनिंग वरून किंग्स इंडियन डिफेन्स का टाकतोये?

जाऊ देत, बघू सल्ल्याच्या मनात काय चाललाय…….
मी त्याचा Nf6 पिन करायला माझा बिशप बाहेर काढायचा निर्णय घेतला.
च्या-आईला हात उचलल्या जात नाहीय. चार भिंतीच्या मध्ये आपल्याला कोणी तरी बांधून ठेवलाय. एकदम गर्मी जाणवतेय, हवेतली उष्णता अचानक वाढलीए. तसच स्वस्थ बसवत न्हव्ते. आता काही हिसके देऊन हात मोकळे केले. उभा राहून हात – पाय मोकळे केले. आता बंदिस्त नसलो तरी अस्वस्थता जाणवत होती. दूर कुठे तरी आरडा-ओरडा एकू येत होता. कसली तरी हाणा-मारी चालू होती. चालताना नेहमी सारखा कंफर्टेबल वाटत न्हवत. विज़री च्या मागच्या खिशातून सिगरेट चा पाकीट काढायला गेलो, तर मागचा खिसाच गायब.
नाही हे काही तरी वेगळा वाटते. माझी जीन्स इतकी कशी जिरली?
मग कुठे माझा लक्षा कपड्यांकडे गेला……..
हा जोकर ड्रेस कुठून मिळवला? हे काय कैद्या सारखे काळे-पांढरे चट्टे-पट्टे वाले कपडे?
आता मी आजू-बाजूला पण लक्ष दिला. एक गोष्ट लक्षात आली की ह्या चारी भिंती काळ्या-रंगने रंगवल्या आहेत. ह्या भिंतीच्या एका फटी-तून बघितला तर इंग्लिश अल्फॅबेट्स मधला “सी” दिसतो.

आधीच अश्या गोंधळ-ले-ल्या अवस्थेत, आणि वरून हा लोकांचा कल्ल-कल्लाट. आता परत डावीकडच्या कोपऱ्यातून बघितला तर काही लोक दिसली. पण ह्यांच्यात काही हाता-पायी होत न्हव्ती. हे बघून एक गोष्ट क्लियर झाली, की आपण अजून ही पुण्यात आहोत!

तरी हे असा का होताय? ही कसली जागा?
तितक्यात माझ्या समोरची भिंत बरीच सरकली! आणि मी उडी मारून बाहेर पडणार तितक्यात, त्या भिंती च्या ऐवजी एक पांढरी भिनतं आली!


मी आपला एका कोपर्यात गप्प बसलो, बघू काय होताय ते!


परत माझ्या उजवी-कडची भिनतं पुढे सरकली. मी वाट बघत होतो, की आता ह्याच्या बदल्यात पांढरी भिंत येईल, पण असे काहीच झाले नाही. मी पालीकडे गेलो.
बाहेर बघतो तर काय –
सगळ्या इमारती पासून गाड्या-पर्यंत सगळे ब्लॅक अँड व्हाईट!
बघा तो B/W. भांडणाऱ्या लोकानं-मध्ये पण एक गंमत होती. हे भांडणं गोऱ्या आणि काळ्या मध्ये होत. पण हे काळे, नकटे न्हव्ते.
भांडण्याचा कारण काही कळ्ण्याचा स्कोप न्हव्ता, साले फक्त एक-मेकांना मारायच्या धमक्या देत होते. म्हणजे आपण अजून ही सदाशिव पेठे-त आहोत!

मग अचानक एक गाडी आली आणि ह्या सगळ्या लोकांना घेऊन गेली. अचानक रस्ते साम-सुम झाले! रस्ते ओळखीचे न्हव्ते, तरी आपल्याला आपला रस्ता शोधता येईल.
दिवसा सारखा उजेड न्हव्ता, ना रात्र झाली होती.
लांब लांब पर्यंत एक झाड दिसत न्हवत.
फिरता फिरता ज़रा मोठा रस्ता दिसला, म्हणून तिकडे वळलो!

पहिला पाउल पण टाकला नसेल तर पायात एक धमाका झाल,
आज काल काय रस्त्यांवर पण लँड माइन्स टाकतात की काय?
मग मी आपला सरळ चालत राहिलो. तरी अधे मध्ये काही लोक दिसत होते.
पण हे सगळे लोक मुखवटे, टोप्या घालून का फिरत होते?
असा ही नाही की काही खास मुखवटे होते, एकदम बाबा आदम च्या जमान्यातून आणले होते.
(आपण नक्की जुन्या बज़ाराच्या दिषेने चाललोये!)तितक्यात समोर एक माणूस येऊन थांबला, तो पण कदाचित अंदाज़ घेत असावा, पण ह्याचे कपडे ज़रा तरी बरे होते, मी तर तसल्या कापड्यांना टेकसास कपडे म्हणेन!
“का हो हा रस्ता कुठे जातो?”
ह्या माणसाने अगदी निर्विकार पणे माझ्या कडे एक कटाक्ष टाकला, आणि परत इकडे तिकडे बघू लागला.
“ओ, दादा मी तुमच्याशी बोलतोए, चूयिंग गम खात नाहीये.”
तरी हा काही सांगे ना.
साला भाव खातोए, म्हणून मी पुढे निघालो.

दूर तिकडे एक माणूस झोकांड्या खात येताना दिसला. (नक्की रात्र व्हायला आलीये!)

जवळ आला!
हा बेवडा न्हवत. ह्याने कुठे तरी बे-दम मार खाल्लाय!
असल्या जखमा मी कधीच पहिल्या न्हवत्या. त्याला ना चाकू ने मारले होते, ना गोळी ने. दगडाने ठेचाव तशी अवस्था झाली होती. जखमे-व.र माती चे पॅच-वर्क होते. त्याच्या अंगाचा तो रक्ताळ्लेला वास आता माझ्या नाकात घुसखोरी करत होता. आजू बाजूला घोंगावणाऱ्या माश्यान मुळे हैराण, काही असो, पण त्याला अश्या अवस्थेत सोडून जाणे हे गैर ठरेल, म्हणून मी त्याच्या कडे सरसावलो. मला बघून त्याने असे काही हाव-भाव केले, जसा काही मी त्याच्या चिते वर गोड शिरा बनवून खाण्या-साठीच आलोए. मी त्याला काही विचारणार, तोच काही लोका आले, आणि त्याच्या गळ्यात फास लावले. त्याला फरफटत-तत रस्त्यांवरून घेऊन गेले. त्यांच्या डोळ्यात एकाच ज्वाला होती. हात ज़री स्वच्छं दिसत असले, तरी त्या फासाचा दोर रक्ताच्या लोण्यात बुडवल्या सारखा होता.
ह्यांच्या बरोबर ‘नड-ण्यात काही अर्थ न्हवत. तरी जाता जाता एकाने माझ्या कडे बघितले. त्याच्या डोळ्यात तो गढूळ पणा न्हवत. त्याच्या डोळ्यात शांता आकाश दिसत होता. त्याने डोक्यावर एक मुखुट चढवला होता! पण हा मुकुट सोनेरी न्हवत, ना चंदेरी. एक वेगळाच टच होता त्यात. साधा काळ्या-रंगाचा हा मुकुट. त्यात मला एक ''Don Quixote’ दिसत होता.
जाता जाता त्याने माझ्यावर एक वाक्या फेकला, “सरळ जात राहा, पालीकडे पोचलास तर आपली परीस्थती सुधारेल, when you want something the whole universe conspires in helping you to achive it"
"

मी त्याच्या कडे एकदम चमकून पाहिले, ज्या शैलीत त्याने . मधला हे वाक्या फेकले, हा मला कसा ओळखतो? आणि माझ्या पुढे जाण्याने काय बदलणार होते? साली आख्खी दुनिया तर मतलबी आहे. मी पुढे गेलो नाही तर कोणी दुसरा जाईल. उप्पर वाल्याला काय फरक पडणार आहे? ठीसुळ पाया असलेला हा समाज. आणि ह्याच समाजातला एक प्राणी मला सांगतो, की फक्त तूच पुढे जाऊ शकतोस, तूच आपली परिस्थिती सुधरवु शकतोस.

मी समोर बघितला. तोच मंद उजेड, वाऱ्याची एक साधी झुळुक पण नाही. पण दूर डावी-कडे एक भक्कम इमारत दिसत होती. क्षण भर मी पण वाहून गेलो. पण मग त्या Alchemist च्या चेल्याची आठवण झाली. जाउन तर बघू एकदा, काय होईल ते होईल. तितक्यात मागून आणखीन 2 जाणा आले, माझ्या कडे लक्षा ही ना देता, भर-धाव वेगाने पुढे गेले. मी तरी रेंगाळत चाल-लो होतो. ह्या घाई च्या मरण्यात काय ठेवलाय तेच कळत्त नाही. आणि मग आठवते कसा आपण आपल्या आयुष्यातले ते बारीक बारीक क्षण गमावले.

--तो पावसाचा पहिला थेंब आपण छत्री वर झेलुन लांब भिरकावून टाकतो, तोच थेंब कधी हातात घेऊन बघा, भिजू-द्या तुमचा नवा कोरा शर्ट. शर्ट मिळेल पुन्हा, पण तो थेंब मग गवसणार नाही. पावसाळ्या-- उन्हाळ्याच्या मधल्या काळात आउटिंग ला निघून बघा. त्या ढगा-आडाचा सूर्य आपल्या नग्न डोळ्याने बघा, गॉगल चे रंग त्यात मिसळू नका. कधी म्हातारीच्या झाडा खाल्ली थांबून त्याच्या शेंगा फोडून, सगळ्या म्हाताऱ्या हवेत भिरकावून बघा. कॉलेज च्या वाटेवर असलेल्या त्या पेट्स-शॉप मध्ये लटकावलेल्या पिंजरयातला सोनेरी पक्षी बघा, खैर त्या पक्ष्या-ला स्वताह:-होऊन पिंजऱ्यात राहणं आवडत नसेल. पण आपण का मुद्दाम पिंजऱ्यात बस्तोए?

मगाशी सुसाट पुढे-गेलेले दोघे ही भिनतं अडवत होते. मला बघताच आरडा ओरडा करून मला जवळ बोलावून घेतले. मी तिकडे जाताच, म्हणे "पटकन आत जा."
“तुम्ही दोघे माझ्या साठी इकडे आलात?’
अरे इकडे परत सील पडला असता, तर अवघड झाल असता रे………..”
“पण इतका काय सीरियस झालय?”
“तुला माहिती नाही का? वजीर साहेब तुझी वाट बघतायत पालीकडे ‘

वजीर? सी1? ब्लॅक अँड व्हाईट दुनिया? जखमी लोक………
ही कुठली दुनिया आहे? इकडे मी कोण? माझा ध्येया काय?
मी ह्यांना इतका महत्त्वाचा का वाटतो? ह्या मागे ह्यांचे काही वैयक्तिक हेतू तर नक्कीच असतील. माझ्या ह्या निशध्येय चालण्याला काही फळ मिळेल असा वाटत न्हवत. हे सगळे आडवे-तिडवे शब्दा डोक्यात घेऊन मी पुढे चालत होतो.

विचारांच्या ओघात, माझ्या आजू बाजूची गर्दी कधी वाढली ह्याचा भान राहिला नाही. एकदम आजू-बाजूच्या धिंगण्या मुळे मी भाना-वर आलो. सगळे माझ्या कडे कौतुकने धावत येत होते, त्या गर्दीच्या मागे मला तो Don Quixote रूपी Alchemist चा चेला दिसला. त्याच्या ओठांवर एक विजयी हास्य फुलत होते. त्या गर्दी ने मला उचलून घेतला, त्यांचे हात काप्सा सारखे मउ होते, त्यात काही दिखावा जाणवत न्हवत. त्यांच्या खांद्यावरच मला पण 'Don Quixote' बनवण्यात आले, तोच मुकुट, तसेच कपडे.
ही कसली शरियत होती? आणि हे कसला बक्षीस?
त्या . च्या चेल्यानने माझे प्रश्ना ओळखले, जवळ घेत, तो माझ्या बरोबर थोडा पुढे चालत आला. पुढे एक कठड्यावर बसवत, माझ्या कडे एक स्मित-हास्य भिरकावून म्हणाला, आता तू पण वजीर झालास. मगाशी तुला सांगायला वेळ न्हव्ता, पण आता सगळे समजावून सांगू शकतो.”


आता पर्यन्त तुला तुझा ध्येय माहीत न्हव्ता, पण जे काही तू केलस ते आम्हाला अपेक्षित होतच. तरी ह्या चेस बोर्ड वर तू एक प्यादा म्हणून जन्म घेतलास, आणि आता काही क्षणा पूर्वी एका वजीराचा मान मिळवलास. प्रत्येकाचा एक वैषीष्ठ आहे. तू ज़री प्यादा असलास तरी काय झाले. तू नसता तर आता बराच काही आतासारखे नसते. कदाचित आपली पोसिशन दुर्बळ असती आणि पांढऱ्याची विन्निंग पोज़िशन. “ So always remember: whenever you feel frustrated with your work, just think about the job without you. there you will spot the importance of 'I'."“ तुझा एकत्र राहण्याचा स्वभाव उत्तम आहे, आता नोटीस केलास का? तुझयाच . चे इतर . पण वजीर का नाही बनले? फक्त फरक होता, ते पहिले पासून एक-मेकात गुंतून बसले. तू सुरवाती पासून थोडा आलिप्त असल्या मुळे पुढे सरसावलास, आणि पुढे टीमवर्क मुळे तू आणखीन काही पुढचे पाउल टाकलीस But hence forward remaining together and working out your progress would prove your sucess!

जा आता, You have to work out our victory!

||3||

मला आता आकाश साफ दिसत होते. सूर्योदय होत होता. पक्ष्यांचा किल्ल-बिल्लाट. आणि समोरच गुलमोहरांचा बहरलेला झाड! बहुतेक सिद्ध्या आणि मी काल रात्री चेस खेळत, बाल्कनीत झोपलो होतो.

टेबल वरच्या चेस बोर्ड वर आदल्या रात्रीचा अर्धवट गमे राहिला होता. मी ब्लॅक साइड कडून Pc6 खेळ-लो. तिकडे काळा वजीर माझ्या कडे बघून हळूच हसला!



-- नागेश

4 प्रतिक्रिया

  1. सौरभ Says:

    I had deja-vu feeling while I was reading this story... ही गोष्ट नक्कीच मी कुठेतरी वाचली आहे, लक्षात नाही आता. आठवायचा प्रयत्न करतोय तरी आठवत नाही. असो. काय बोलू मी समजत नाही. स्किझोफ्रेनिऍक धाटणीच्या गोष्टींमधे शक्यतो एकप्रकारचा मनोविकार दिसून येतो. पण ह्यात तसलं काही नाही वाटत. You have beautifully told the very important principle in our life to identify "I". Irrespective of how one comes into existence and what condition he/she is in, need to move forward and achieve the glory. mind blowing... The medium of Chess is used too effectively. Damn... I never thought these small things in our day to day life could teach the philosophy in a easy way...
    Its not only a story... its a lesson I would say...
    Loved it... simply great...

    Aakya this is a very very strong script, deserve to be filmed. Dude, we can create a short film...

  2. सौरभ Says:

    aare one more thing,the words "when you want something the whole universe conspires in helping you to achive it" remind me of a dialog in Om Shanti Om... "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है... कहते है किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने की कोशिश में लग जाती है"... these are very wise words & fits very well in the story...

  3. Aakash Says:

    Hey thanks for the comment! There have been a lot of spelling mistakes, i'll try to reduce them in my next post.

    ......"when you want something the whole universe conspires in helping you to achive it"

    its quoted from "The Alchemist" by Paulo Coelho.

  4. Deepti Says:

    :)once again good one!!! i read this story before!!! keep it up...:)

AKS | Entries (RSS) | Comments (RSS) | Designed by MB Web Design | XML Coded By Cahayabiru.com | Distributed by Deluxe Templates